विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 July 2024

*!!!झाशीची राणी भाग-१४!!!*

 


*!!!झाशीची राणी भाग-१४!!!*
झाशीचे प्रधानमंत्री राधारामचंद्र चौकशी करायला एलिसकडे येऊन म्हणाले,राणीसाहेब अस्वस्थ असुन अन्न पाणीही त्यांना जात नाही.सतत आपल्या निर्णयाची वाट बघत आहेत.प्रधानसाहेब मीही मान्यतापत्राची आतुरतेने वाट बघत आहो.मला जेवढे शक्य तेवढे प्रयत्न केले आहे व करत आहे.भारतीय राज्यांचा दत्तक अधिकार इस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरर्सनी नऊ नंबरच्या डिस्पॅचच्या १६ व १७ परिच्छेदानुसार उघडपणे स्विकृत केला आहे.आभार मानुन व नमस्कार करुन प्रधानमंत्री किल्ल्याकडे रवाना झाले.अन् त्याचवेळी गव्हर्नर डलहौसीचे पत्र हाती पडले.पत्र वाचता वाचता एलिसचा चेहरा काळवंडला.झाशीवर अन्याय होत होता व एलिस कांहीच करुं शकत नव्हते याचेच त्यांना जास्त दुःख,खेद वाटत होते
पत्रात स्पष्ट लिहिले होते की,टेहरी, ओरछा जसे स्वतंत्र राज्य आहेत तसे झाशी राज्य कधीही नव्हते.रामचंद्रांनी कांही वर्षे राज्य केले,परंतु त्याच्या विधवा पत्नीने घेतलेला दत्तक राजनैतिक कारणास्तव अवैध ठरवला होता.आतांही न्यायसंग उत्तराधिकारी नसल्यामुळे झाशी राज्य ब्रिटिश साम्राजात सामील करुन घेऊन तसा अमंल बसवावा.ब्रिटिश अधिकृत जिल्ह्यांच्या मध्यभागी झाशी असल्या मुळे तिथुन बुंदेलखंडावर राज्य करणे शासनव्यवस्था अधिक उन्नत व सुनियंत्रित करणे शक्य होईल.राणी साहेबांस उचित वार्षिक तनखा दिल्या जाईल.या पत्रासोबतच मालकन साहेबांनी एलिसला घोषपत्राद्वारे सुचना दिल्या.झाशीच्या सैनिकांना दोन महिन्या चे वेतन देऊन सेवामुक्त करावे. कर्मचार्यांना शक्यतोवर त्याच कामावर राहु द्यावे.झाशीमधे तीन व कडेरामधे दोन कंपनी सैन्य ठेवावे.झाशीत सिंधिया काँटिजेंटची सहावी संपुर्ण तुकडी ठेवावी.सीपरीचे कॅप्टन हॅन्सी ५०० सैनिक,दोन तोफा व घोडदळाची तुकडी घेऊन येतील.झाशीच्या संरक्षणार्थ हेन्सिचे सैन्य,इन्फेंट्रीची पुर्ण तुकडी,अश्व दल,तोफा राहतील.राणीसाहेबांच्या निर्वाहभत्याचा निर्णय योग्यवेळी कळवला जाईल.झाशीचा दत्तकनामा अस्विकार करण्यांत येत आहे.झाशीचे राज्य ब्रिटिश भारतात सामील केले आहे.
मेजर एलिस हे झाशीचे शासक म्हणुन नियुक्त केले.झाशीची जनता आतां ब्रिटिशांच्या अधिन आहे.आणि शासक म्हणुन कॅप्टन एलिस...
ऐलिस हे पत्र वाचुन अतोनात दुःखी झाला.झाशीचे राज्य बळकावणे हा राणी वर उघड उघड अन्याय होता.त्याला मिळालेले अधिकारच त्याला टोचत होते. पण तोही हुकुमाचा ताबेदार!हा खलिता दरबारात पोहचविण्याचे कडु काम त्याच्यामाथी आले होते.कर्तव्य तर पार पाडणे भाग होते.झाशीच्या संघर्ष पर्वास सुरुवात होणार होती.तसा निरोप एलिसने किल्ल्यावर पाठवला.
दुसरा दिवस उजाडला.काय होणार दरबारात?काय आहे झाशीच्या नशीबी?सगळेजण अस्वस्थ होते.मनुबाई मोरोपंतांना म्हणाल्या, पिताजी!आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढु पण माझी झाशी कदापी देणार नाही.आम्हास पुढील प्रांत बरा दिसत नाही.नजरबाजां च्या वार्ता बर्या नाहीत.इंग्रजांची रक्त पिपासा घाव घालुन नष्ट करण्याच्या योजना तयार कराव्या लागतील.राणींना संताप आवरत नव्हता.सारा दरबार सजवुन सुसज्य,सुंगधमय करण्यांत आला.राणी लक्ष्मीबाईंनीसुध्दा माफक श्रृंगार करुन पांढरी शुभ्र साडी पांढर्या कपाळावर पांढरा चंदनी टिळा त्यांच्या वैधव्याची दुःखद आठवण देत होती. दामोदरास जवळ घेऊन राणीसाहेब पडद्याआड बसल्या.
दरबार भरला.सेवकवर्ग अस्वस्थ पणे कामं करीत होते.उत्सुकता,हुरहुरतेने सगळेजणं कॅप्टन एलिसची वाट बघत होते.आणि जड अंतःकरणाने,जिन्याच्या पायर्या चढतांना एलिसचे हातपाय गळुन गेले.गव्हर्नरचे आज्ञापत्र वाचून दाखवण्याचे कडु कार्य त्याला अतिशय जड वाटत होते.झाशीचे मिळालेल्या विशेष अधिकाराचा त्याला बिलकुलच आनंद वाटत नव्हता.आज आपल्या कडुन फार मोठा अन्याय होणार याच भावाने ग्रस्त मटकन आपल्या आसनावर बसला.सर्वांनी आपापले आसन ग्रहण केल्यावर दरबार सुरु झाला.
एलिस गव्हर्नरचा खलिता वाचत होता.आणि सारा दरबार थक्क होऊन ऐकत होते.एकएक कलम म्हणजे जणुं शब्दांचे बाँब गोळेच होते.राणीसाहेबांच्या लक्षात आले की,आपण मेहनत घेऊन १५-२० दिवस अभ्यासपुर्ण माहिती गोळा करुन दत्तकमान्यतेसाठी दिलेले पुराव्यासाठी दिलेली माहिती व्यर्थ गेली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...