विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 July 2024

*!!!झाशीची राणी भाग-१५!!!*


 *!!!झाशीची राणी भाग-१५!!!*
गव्हर्नरचे आज्ञापत्र ऐकुन राणी साहेबांचा चेहरा धगधगत होता.डोळ्यात अंगार पेटला होता.संतापाने त्या म्हणाल्या,एलिस हे काय केलेस?तुम्ही ब्रिटिश स्वतःस काय समजता?आमचच खाऊन आम्हालाच देशोधडीला लावतां? गोड बोलुन गळ्यावर सुरी चालवता?अनेक महाल घशात घालुनही समाधान होत नाही?एकएक कलम म्हणजे अन्यायाची परिसीमाच!अहो एलिस ! तुमच्याच तर साक्षीने दत्तकविधान झाले होते ना?आमचे राज्य बेवारस झाले असे कसे म्हणुं शकतां?सलामाईची भाषा करुन उलटलात एलिस आपण!दरबारी लोक संतापाने उभे राहिले.एलिसभोवती इंग्रजी सशस्र सैनिक उभी होती.कापर्या आवाजात शेवटचे कलम वाचु लागला... आठवे कलम...या सर्व कारणांनी राणी साहेबांचा दत्तकनामा अस्विकार झाला. झाशी राज्य ब्रिटिश भारतात सामिल केले गेले.कॅप्टन एलिस झाशीचे शासक म्हणुन नियुक्त झाले. यापुढे झाशीचे राज्य आणि जनता ब्रिटिशांच्या अधिन आहे.
ऐलिसने हे वेदनामय वाचन कसे बसे पुर्ण करुन दुःखाने म्हणाला,राणी साहेब!क्षमा करा!दरबार सुन्न झाला.तोच पडद्याआडुन गगनभेदी आवाजांत राणी साहेब गर्जल्या...मै मेरी झाँशी नही दूंगी! माझी झाशी कालत्रयी देणार नाही... कदापी नाही...कदापी नाही....
महाराणीच्या गर्जनेने सगळा दरबार थरकला.एलिसला ब्रिटिश सैन्याने संरक्षणात बाहेर काढले.मोरोपंतांच्या हाती जाहीरनामा फडफडत होता.त्या चवताळुन बाहेर येऊन जाहीरनाम्याचे तुकडे तुकडे केले.दामोदरला छातीशी कवटाळुन ओरडल्या...हा या राज्याचा वारस आहे.बघतेच कोण अन् कसं नामंजूर करते.अरे एलिस,नामर्द माणसा आतां तुमच्याबरोबर संघर्ष चालु झाला. संध्याकाळी दरबार भरवण्याची आज्ञा देऊन आपल्या कक्षाकडे निघाल्या.तानु मावशी व इतरजण त्यांच्या मागुन.... त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि राणींच्या डोळ्यात होता फक्त अंगार.. ठिणग्या...संताप...
प्रजेवर जणुं वज्राघात झाला.ठीक ठीकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला. सगळीकडे दहशतीचे वातावरण!शहरभर दवंडी पिटुन झाशी ब्रिटिश साम्राजात विलिन झाल्याची घोषणा करण्यांत आली.राणींचा जयजयकार करीत किल्ल्याकडे निघालेल्या प्रजेवर चाबुक ओढल्या गेले.त्यांना कैद करण्याचा सपाटा लावला.तहसील कचेरीत जाहिर नाम्याच्या प्रति पाठवण्यांत आल्या. जहागिरीवर जप्ती आणण्याचे काम आतां एलिसपुढे होते.वसुलीचा आकडा काढणे,जहागिरदारांच्या याद्या करणे ही महत्वाची कामे एलिसला उरकावयाची होती.या कामाला त्याने सुरुवातही केली. परंतु,राणीसाहेबांविषयी त्याला खुप आदर होता,त्यांना त्रास होऊ नये या भावनेपोटी राणीसाहेबांचा तनखा,दागिने जडजवाहीर,कर्जाचा हिशोब या बद्दलचा विचार अत्यंत सहानुभुतिपुर्वक व्हावा अशा आशयाच्या सुचना त्याने गव्हर्नर कडे पाठविल्या.त्यांना भरपूर तनखा, सन्मानाची वागणुक मिळावी यासाठी एलिस प्रयत्नशील होता.
त्यानंतरचे दिवस म्हणजे रोज मरणा ला सामोरे जाण्याइतके दुःखद होते. किल्ल्यावर ब्रिटिशांची गस्त बघणे जड जात होते.राजे गंगाधरांच्या नाट्यशाळे तील सर्व चिजवस्तु एका खोलीत बंदिस्त झालेले त्यांना बघवत नव्हते.तानुमावशी! हेच जर दैवात आहे हे जर आधी माहित असतं तर आम्ही स्वामींना दुखवलं नसतं मनूबाई!त्यावेळी योग्य तेच केलय!आतां त्या दुःखापेक्षा इतर दुःखे.....
मावशी आमच्याच सैनिकांना आम्हाला बोलावतां येणार नाही.त्यांची शस्रास्र,गणवेश जमा करण्याचा हुकुम मिळाल्यावर काल आम्हास भेटण्यास आल्यावर,त्यांना धीर देत म्हटले,हे वाईट दिवसही जातील.आम्ही स्वस्थ बसणार नाही.पण सध्या चढाई करणे म्हणजे जाणुनबुजुन आगीत उडी टाकण्यासारखे होईल.वेळ आली की,आपल्या तलवारी चे पाणी दाखवु,क्षोम करु नये.नगारा चामराचं चिन्ह असणारा ध्वज ऊतरवुन तिथे युनियन जॅक लावला गेला तेव्हा आमचा जीव किती कासावीस झाला असेल?आम्ही हाक देऊ तेव्हा मात्र नक्की या.यावर सर्वजन एका आवाजात म्हणाले,आपणासाठीच जगणार,हे प्राण आपल्यासाठीच गहाण आहे.इंग्रजांना कापण्यासाठी हात फुरफुरत आहेत. कोणत्याही क्षणी बोलवा...
बिठूरची मंडळी त्यांच्या विवंचनेत, त्यांचाही आठ लाखाचा निर्वाह भत्ता नामंजुर झाला.गेल्या चार वर्षाचे ३२ लाख देतो म्हणुन तोंडाला पाणं पुसलीत. सगळी कागद घेऊन विलायतेला गेलेला अजिमुल्ला हात हलवत परत आला,पण रशियाशी झालेल्या युध्दात फ्रांस व इंग्रज पराभूत झाल्याची वार्ता मात्र घेऊन आला,म्हणजे इंग्रजसुध्दा पराभूत होऊ शकतात ही वार्ताच प्ररणादायक होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...