विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2024

सरदार दरेकर घराणे

 


सरदार दरेकर घराणे⚔️
⚔️⚔️
तळटीप:-सदर सदर लेख लिहिण्यासाठी घेतलेलं परिश्रम लक्षात घेता तसेच यातील नोंदीसाठी कोणत्याही तरेकर मंडळींना संपर्क साठी अडचण येणार नाही म्हणून यातील नंबरासह पोस्ट शेअर करावी एवढीच विनंती....
मराठ्यांच्या इतिहासात हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य याची सेवा करताना जे अनेक घराणे उदयाला आले त्यापैकी एक घराण म्हणजे दरेकर घराणं होय. खालील लेखात अस्सलपत्रातील नोंदी संदर्भसह दिले असून त्याचे सविस्तर वृत्तांकन केलं आहे यात पुणे, सातारा व कोकणातील दरेकर घराण्यातील नोंदी असलेल्या सरदारांचा उल्लेख आला आहे खरतर १८मे २०२४ रोजी छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या जयंती निमित्त हा लेख टाकण्याचा मानस होता पण वेळेअभावी पूर्ण झालं नसल्यामुळे आज टाकत आहोत
🌞श्री🌙
छत्रपती शाहू
चरणी तत्पर दरेकर घराणे निरंतर
सदर लेखक पत्रात उल्लेख आलेल्या सरदारांची नावे क्रमवार पद्धतीने व नात्यावर आधारित दिले असून याची नोंद घ्यावी. मराठ्याच्या इतिहासातील अशा कर्तबगार आणि वीर घराण्याच्या इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न छोटासा असुन यातील काही दुरस्ती असतील तर संदर्भ सह संपर्क करावे
काही लोक म्हणतात जल स्वतःच्या दोन पिढ्यांचा इतिहास माहिती नसतो त्याने इतिहास सांगूच नये पण ज्यांना स्वतःच्या आडनावच खात्री नाही त्यांना इतिहास बद्दल बोले नये
दरेकर सरदार यास वेगवेगळ्या कालखंडात छत्रपती सातारा महाराज कडून दिलेल्या मोकासा व महाल मोकासा यादी⛳⛳
मौजे सेडवली
मौ. क्षत्रपाल
भोगाव
मौजे कोढवी
तरवली
भोगावी
मौजे पैठण
कोतवाल खुर्द
पालचल
भोगावी चिकणे
मौजे पलवे
मौजे वाहाली
ताईघाट
सोनदरी
भोसरे
सिवरे
वर्दी
बाकी
घावरी
मौजे चिखली
मौजे देवसर
मौजे धावली
देवली
मौजे दरे
पांगारी
करवली (फरवली)
मौजे वेळूत
सहजपूर
गाडोली
निलंगे
सुलतानपुरे
पानगाव बारा बिवीचे
कुभारडे
चिंचोली
मानगाव
सेरी खुर्द
हरदापूर
उचाट
आरव
वाखवटी
कांदट
बामणोली
कलंबगाऊ
जाऊली
सरदार दरेकर यास वेगवेगळ्या कालखंडात छत्रपती सातारा महाराज यांच्याकडुन मोकासा देण्यात आलेले गावांची यादी
तळटीपा :-यातील काही गावे आज अस्तित्वात नाहीत
अथवा सापडते नाही त
🚩🚩 सुलबाजी दरेकर पाटील अबंळेकर🚩🚩
कसबा पुणे व पर्वती गावातील शिवेचे तंटा पुढे आले त्यात कसबा पुणे येथे गोतसभात मजालस करण्यात आले त्यात सुलबाजी दरेकर पाटील अबंळेकर म्हणून उल्लेख आढळतो...
आषाढ वद्य १० दशमी गुरुवारीं पर्वती व पुणें याच्या शिवेस वाट आहे. पुण्याहून कात्रजेस जावयाची असे. तिची कटकट पडिली. ती मनास आणून टाकली. हजीर मजालसः--
कित्ता पा। कित्ता पा।
१ केसे। सखदेव कमावीसदार, २ अंबळेकर पाटील
का। पुणें. १ सुलबाजी दरेकर
३ देशमूख १ हिरोजी जगथाप
१ जगोबा ----------
_______________
🚩🚩 सुभानाजी दरेकर🚩🚩 हे आंबिळेकर दरेकर घराण्यातील छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात सेनापती धनाजीराव जाधव यांच्या लष्करी दिमंतात होते सदर पत्र१७०९मधील असुन यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सातारा येथे राजधानी सह मराठे साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केले होते . हे सरदार सरंजामदार आंबिळेकर सयाजीराव दरेकर यांचे वडील होय.
७ /१८
श्री. शके १६३० चैत्र वद्य ८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम संवत्सरे चैत्र बहुल अष्टमी भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशाहुछत्रपति स्वामी यांणी राजमान्य राजश्री मोरो प्रल्हाद यासि आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मांकडे सरदेशमुखीच्या मामलियास फडणीस पाहिजे. त्यासी, रुद्राजी केशव हुजूर उमेदवार होते. लिहिणार, कामाचे मर्दाने देखोन त्यासि फडणीसीचा कार्यभाग सांगितला असे. याचे हातें फडनीसीची सेवा घेत जाणें. यासी वतन सालीना, देखीलं चोकर, होन पा। ६०० साहासे रास करार केले असेत. इ॥ पैवस्तगीपासून वजावाटाव दंडकप्रमाणें वजा करून उरलें वतन शिरस्ताप्रमाणें पावणें. वतनाचे मोइनप्रमाणें चाकर हाजिर करून लेहवितील, त्या दिवसापासून चाकराचा हक पावीत जाणें. यासी जमान त्रिंबककाकाजी. जमेनिवीस, सुभानाजी दरेकर, दि॥ राजजी सेनापति, हुजूर घेतला असे. बहुत काय लिहिणें ?
मर्यादेयं
राजते
_______________
🚩🚩 सरदार सयाजीराव दरेकर🚩🚩
छत्रपती छत्रपती थोरले शाहू महाराजांनी कृपाळू होऊन सयाजीराव दरेकर आंबेडकर यांना सरांजमी दिल्याचा उल्लेख या पत्रात आला आहे मराठ्यांच्या इतिहासात स्वामी हा शब्द छत्रपतींसाठी वापरला जातो
५१५ /६
श्री.
राजश्री अंबाजी व्यंबक यासी आज्ञा केली ऐसीजेः--
राजश्री सयाजी दरेकर याजवरी स्वामी कृपाळू होऊन त्याचा सरंजाम त्यास करून दिल्हा असे. * तुह्मांस कळावयाकारन लिहिल अस.
________________
🚩🚩 छत्रपती ताराबाई राणी सरकार यांच्या चरणीशी खंडेराव दरेकर यांच्या विनंती🚩🚩
एखाद्या घराण्यातील कुलाचार हा किती उच्च कोटीचा असतो हे त्या घराण्याचा कुलाचार व धर्मविधी कार्य करणारे पुरोहित गुरव, जगंम यांच्या राजसत्ता व धर्मसत्ता तील अधिकारवरून ठरतो खालील दोन्ही पत्रात असलेले दीक्षित घराणं याबद्दल अगोदर आपण सविस्तर माहिती घेऊ कारण छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपती रामराजे गादीवर आल्यावर छत्रपती रामराजे व पेशवे यांच्यात दुरवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा सदर पत्रातून छत्रपती ताराराणी सरकार बाळाजी पंडित प्रधान यांनी आठवणे दिसतात यावेळी वेदोसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित यांनी श्रमसहस करून छत्रपती व पेशव्यांमधला गैरसमज व दुरावा दूर करून एक ओपन केल्याचं उल्लेख मातोश्री आईसाहेब ताराराणी सरकार यांनी या पत्रात उल्लेख केला आहे आणि सदर दीक्षित बद्दल काही रक्कम व त्याची कुटुंब चालवले पाहिजे म्हणून हुकूम पेशव्यांना दिला आहे पहिला पत्रातून महाराणी ताराराणी सरकार पत्रातील उल्लेखातील सदाशिव दीक्षित यांचा उल्लेख खालील दुसरा पत्राची आला आहे आणि दोन्हीही पत्र हे 1759 सालातील आहेत यावेळी सयाजीराव पुत्र खंडेराव दरेकर यांनी आईसाहेब छत्रपती ताराराणी सरकार यांना आपले वडील सयाजीराव दरेकर यांच्या निधनानंतर थोरल्या शाहू महाराजांनी सदर सदाशिव दीक्षित यांचे वडील बाबदेवभट दीक्षित यांना बहुदा समाधीच्या पूजा आर्ची साठी आहीरवाडा येथे 85 बिघा जमीन इनाम दिली होती छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपती रामराजे महाराजांच्या काळात सदर परंपरा खंडित झाली असावी यामुळे सदर इनाम नूतनीकरण करून द्यावी अशी विनंती पत्र खंडेराव दरेकरांनी मातोश्री छत्रपती ताराराणी सरकार यांच्या चरणी शी केले आहे सदाशिव बट दीक्षित यांचा उल्लेख मातोश्री ताराराणी सरकार यांनी वेदोसंपन्न असे केला आहे यावरून या दीक्षित घराण्याची महत्त्व नमूद करणं गरजेचं वाटलं कारण सयाजीराव दरेकर यांचे स्मृती त छत्रपती थोरले शाहू महाराजांनी इनाम दिले आहे वंशपरंपरागत दरेकर घराण्यातील कुलाचार या दीक्षित घराण्याकडे असावे तसेच पानगाव येथील सरलष्कर दर्याबाई निबांळकर घराण्यातील कुलाचार सांगणार दीक्षित घराणे पानगाव च्या पांढरीत आज पण आहे
लेखांक ११३/११
श्री.
१६८० वैशाख वद्य १.
श्रीमंतमहाराज मातुश्री आईसाहेब यांणी राज्यमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसीजे- चिरंजीव शाहूबाबा यांसी कैलासवास जालियानंतर, साहेबांत व तुम्हांत कितेकांनी नानाप्रकारे विकल्प घालून राज्यांत बखेडे केले. येविशी वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांणी श्रमसाहस करून, साहेबांचे व तुमचे एक लक्ष करून, बंदोबस्त केला. त्यावरून, साहेब यांजवर कृपाळू होऊन हे कुटुंबछळ, स्नानसंध्यादि षट्कर्मे आचरोन आहेत, यांचे प्रपंचाचा खर्च भारी यास्तव यांचे चालविलिया श्रेयस्कर, व हे पंधरा सहस्त्र रुपयांचे द्यावे, ऐसे साहेबी चित्तांत आणून तुम्हांस हे आज्ञापत्र सादर केले असे. तर वेदमूर्तीस पंधरा हजारांचे इनाम गांव स्वदेशी लाऊन देऊन यांस व यांचे पौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. जाणिजे. छ १५ माहे रमजान, सु।। समान खमसैन मया व अलफ. बहुधान्यनाम संवत्सरे. बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा.
श्री लेखन शुध.
लेखांक ११४विनंति/११
श्री. नक्कल
१६८० पौष शुध्द ७. तीर्थस्वरूप राजश्री आबा वडिलांचे शेवेसी-
येथून हस्ताक्षर ताराबाईचे.
अपत्ये खंडेराव दरेकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. तीर्थरूप सयाजीबाबा कैलासवासी झाले ते समई अहीरवाडी येथील जमीन बिघे ८५ मळा-सुधां वेद।स्त्रसंपन्न कैलासवासी बाबदेवभट दीक्षित ठकार यांसी इनाम दरोबस्त करून दिली आहे. तेणेपो करार करून मौजेमजकुरीची जमीन पानथळासुधां वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार यांचे स्वाधीन करून तेथील अनभवून सालदरसाल स्नानसंध्या करून राहतील. पूर्वीपासून वडिलावडील यांचे आपल् चालत आले आहे. पहिली जमीन पानथळा बिघे ८२ व किता जमीन कोरडवाहा बिघे ८३ येकून बिघे पांच पेशजी दिली. ते यांसी अगत्यरूप दिल्हे पाहिजे. यांचे वंशपरंपरंने चालवावे. शके १६८० सोळासे आइसी, बहुधान्यनाम संवत्सरे, पौष शु।। ७ सुक्रवार. हे विनंति.
_______________
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे9049760888
________________
🚩🚩तानाजीराव दरेकर हवालदार कि महिपतगड🚩🚩
सदर पत्र हे नानासाहेब पेशवे यांनी १७५०मध्य दिवाणातून लिहिले आहे कारण खेड तालुक्यात आबंडस गाव भार्गवराम स्वामींनी इनाम असुन तो महिपतगड हवालदार तानाजीराव दरेकर यांनी सरकारी वसुली किल्लाच्या खर्चासाठी केले असे दिसते व सदर गाव कडून महसुल परत करण्यासाठी आज्ञापत्र दिले आहे हे तानाजीराव दरेकर हे कोकणातील दरेकर घराण्यातील असावेत असे एक नोंदी वरून दिसते.........
४२/६ श्री ३ नोव्हेंबर १७५०
भार्गवरावस्वामी.
राजश्री तानाजीराव दरेकर हवालदार व कारकून के॥ महिपतगड गोसावी यासी.
आज्ञापत्र
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ सदाशिव चिमणाजी आशीर्वाद व नमस्कार. सुहुर सन इहदे खमसेन मयाव अलफ मौजें आंबडस ते॥ खेड हा गांव श्री यांकडे इनाम आहे. ऐसें असतां तुह्मी तेथील वसूल सालगुदस्ता व सालमजकुरीं कांही घेतला आहे, ह्मणून विदित जालें. तरी पेशजीपासून इनाम चालत आहे. तेथील उसूल घ्यावयास प्रयोजन नाहीं. या उपरी तेथील जो वसूल घेतला असेल तो फिराऊन देणें. फिरोन त्या गांवचे वांटेस नच जाणें. जाणिजे. छ १४ जिल्हेज. आज्ञाप्रण.
श्री.
राजा शाहू नरपति
हर्ष निधान
बाळाजी बाजीराव प्रधान.
_________________
🚩🚩मानसिंग दरेकर🚩🚩
हे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या सरदार सयाजीराव दरेकर यांचे व सरलष्कर खंडेराव दरेकर यांचे भाऊ आहेत सदर पत्र हे कामवीसदार मल्हार तुकडे यांनी बाजीराव पेशवे यांनी लिहिलेले आहे
२६३
तीर्थरूपा राजश्री राऊ आणि ला राजश्री आपा स्वामीचे सेवेसी
अपत्ये मल्हार तुकदेव कृतानेक सांां नमस्कार विनंती उपरी. स्वामीच्या आसीर्वादेकरून ताा छ २० जमादिलीवलपरियंत कुषल असो विशेष. राजश्री मानसिंग दरेकर सयाजी दरेकर याचे पुत्र याचे चाकरीविसी स्वामीस विनंती केली. स्वामीनी आज्ञा केली कीं पुणियास गेलियावर आज्ञा करून. त्यावरून स्वामीचे सेबेसी पाठविले आहेत. माारनिले आपलें सविस्तर वर्तमान विदित कारतील. स्वामीनी याजवरी कृपा करून यास चाकरीस ठेविले पाहिजे. माारनिळेचे वडील यानी पुरातन स्वामीची सेवा केली आहे. स्वामीवेगले याचे कोण्ही उर्जित कोण्ही करणार नाहीं. याचा मामला बहुत आफ्तर जाला आहे. स्वामीनी यास आगत्य चाकरीस ठेऊन सेवा घेतली पाहिजे. राजश्री रामाजीपंत कारकून पाठविले आहेत यास आज्ञा केली म्हणिन स्वामीचे सेवेसी येतील. विदित जाले पाहिजे. सेवेसी श्रुत होये विज्ञापना.
_______________
संतोष झिपरे 9049760888
________________
🚩🚩 दरेकर घराण्यातील दिव्या 🚩🚩
आबिंले येथील दरेकर घराण्यातील भावकीतील वादविवादात सरदार पिलाजीराव दरेकर यांचे काळात जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरात गोत बसला भोवरी येथील पाटील यांनी सदर दिव्या निवड करण्यासाठी भोवरीतील गोत उपस्थित होते यावेळी सासवड येथील जगताप देशमुख सासवड देशपांडे यांवेळी गोतसभात बसवला होता या यावेळी दिव्य करण्या च्याप्रसंगी दोन्ही दरेकर मंडळीने माघार घेतली असल्याचे दिसून येतो यावेळी कढईतील दिव्य करण्यात येणार होता ज्यात उकळतं तेल अथवा पाणी टाकून वस्तू काढल्या जात होते आणि यात जो खरा ठरेल त्याची बाजू शक्ती घेतली जात असेल यावेळी भाऊबंदकीतील वाघ दिव्यावाटे ने सोडवता आपसात केल्यामुळे केल्यामुळे दरेकर घराण्यातील एकोप्यास वाढ झाल्याचे दिसते इतिहासात अशी जर मी उदाहरण खूप कमी आहे की दिव्य करताना दिव्याला उपस्थित असलेले दोन्ही मंडळी एकदिलाने पाठीमागे जातील किंवा माघारी फिरते यामुळे या दिव्यास इतिहासात अन्याय सारंग महत्त्व आहे
शुद्ध १२ मंदवारी अबळेकर दरेकर याचें दिव्य पिलाजी दरेकराच्या भांडणाबाबत घ्यावयास राजश्री नारोपंतनाना व देशमुख देशपांडे गेले. रविवारीं दिव्याचें साहित्य करून जेजूरीस श्रीच्या कासवावरीं होमास आरंभ केला. पुढें होमादिक कर्म जाल्यावरी कढई ठेवावी तों भोंवरगांवचे गोत व देशमुख देशपांडे भानगडीस पडोन, दिव्याचा मजकूर राहून दोघांची समजाविषी केली.
______________
🚩🚩सरदार दादजी दरेकर🚩🚩
सरदार दादजी दरेकर हे हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी पानिपतच्या रणभूमीवर धारातीर्थी पडली मुळात या ठिकाणी दरेकर घराणे सयाजीराव दरेकरांपासून सरंजा जामी असल्यामुळे दरेकर घराण्यातला जमाव पाणीपथावर मोठ्या संख्येने होतात पण सदर दरेकर घराण्याची सरदार म्हणून दादजी दरेकर यांचा उल्लेख एकच सापडतो याची नोंद घ्यावी
________________
🚩🚩 पिलाजीराव दरेकर🚩🚩
सदर पत्रातील हकीकत असे की सयाजीराव दरेकर यास भोसरी येथील मोकासा असून त्यांचे कुटुंब या ठिकाणी स्थायिक झालेलं होतं यावेळी भाऊ भाऊबंदकीतील वादाचा पडसाद दरेकर मंडळींच्या लष्करी कार्याची दिसून येतो असं खालील नोंदीवरून दिसते कारण सयाजीराव हे भोसरी येथे असल्याने खालील पत्रात राजश्री याचा अर्थ छत्रपती असा अर्थ असावा सयाजीराव दरेकर यांचे पुत्र अर्थात मानसिंगराव दरेकर होय. त्यांनी दोन दोनशे रुपये घेऊन गुजरी पाठवलं यावेळी यावेळी पिलाजीराव दरेकर पळून पेशव्यांकडे आले
यावेळी या पत्रात उल्लेख आलेले गर्डीकर हे छत्रपती सातारकर महाराज यांच्या खाजगी कडील गरडी या गावचे साळुंखे घराण आहे यावेळी छत्रपतींच्या कडून बाळाजी बहिर्जी साळुंखे या ठिकाणी आल्याची नोंद यात आहे तर यातील शंभर रुपये स्वामींचे असल्याने ती त्यांनी पेशव्याकडून घेतले
पिलाजी दरेकर याजवर सयाजी दरेकर याच्या पुत्रानीं राजश्रीपासून दोनशें रुपये मसाला करवून हुजरे पाठविले. पिलाजी पळोन पेशवियापाशीं आला. यांचा निरोप घेऊन गांवांतून बाहेर गेला. मुले माणसें काढिलीं. हुजुरियांनी बायकोपाशीं मसाला सदरहूप्रों। घेतला असे. गराडकरांसही मसाला राजश्री स्वामीचा शंभर रु॥ होता त्याणीं मसाला देऊन पेशवियांकडे आले. पेशवियांनी पेशजी मनसुबी केली आहे ते कागदपत्र देऊन सटवोजी संभाजी जगदाळे हुजुर पाठविले. तेथें बाळोजी बहिरजी आहेत. पेशवियांनीं निमे रु॥ कदमी घेतली आहे. हुजूर काय मजकूर होईल तो पाहावा१८
________________
🚩🚩सरलष्कर हणमंत राव दरेकर🚩🚩
सदर पत्र हे १८०७ मधील असुन या पत्रातील सरलष्कर खंडेराव दरेकर पुत्र सरलष्कर हणमंतराव दरेकर यांच्या बद्दल माहिती मिळते. यातील त्यांनी तत्कालीन लोणार परगणा तील म्हणजे आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील खारकुंडा येथील लष्करी खर्चासाठी मोकासा व तिजाई देण्यात आले आहे. नारायण राव पेशव्यांच्या काळात त्यांनी सरलष्कर पद देण्यात आले. आजही त्या भागात दरेकर मडंळी आजघडीला आहेत असे समजते कारण पाठीमागे बुलढाणा जिल्ह्यातील दरेकर आमच्या संपर्कात आले होते पण सदर पत्रातून तेथील कामवीसदार यास मोकासा व तिजाई देऊ नये म्हणून उल्लेख आहे कारण सरलष्कर दरेकर घराण्यात भोसरी कर सयाजीराव दरेकर यांच्या लष्करी सरंजाम बद्दल उल्लेख असलेल्या पत्र या ठिकाणी या लेखात देत आहे त तसेच खंडेराव दरेकर यांनी सरलष्कर पदी नियुक्ती नंतर वडील सयाजीराव दरेकर यांनी असलेले सरंजाम भोसरी कर मानसिंह दरेकर यांनी होते असे समजते. सगळे माहिती येथे देणे शक्य नाही
पत्रांक ४०५/१०
श्री. १७१८ ज्येष्ठ-कार्तिक
मा। अनाम देशमुख व देशपांडे पो। लोणार यांसी:--
चिमणाजी माधवराव प्रधान. सु।। सबा तीसैन मया व अलफ, परगणें मजकूर येथील निमे मोकासा व तिजाई खारकुंडा श्रीहणमंतराव दरेकर सरलष्कर याजकडे फौजेचे बेगमीस सरंजाम पेशजीपासून आहे त्याप्रमाणें करार असे. तरी, सालमजकुरापासून रा। नारायणराव विश्वनाथ दिवाण व फडणीस नि।। सरलष्कर यांजकडील कमावसदारांसी रुजू होऊन परगणें मजकूरचा निमे मोकासा व तिजाई खारकुंडाचा अंमल सुदामत प्रों सुरळीत देणें. सरलष्कर यांजकडे न देणें
_______________
🚩🚩सरलष्कर बळवंतराव दरेकर🚩🚩 छत्रपती घराण्यातील तसेच भारतातील विविध मराठा सरांना आमदार घराण्यातील नातेसंबंध विषय आलेल्या नोंदीत सदर बळवंतराव यांचा उल्लेख सरलष्कर बळवंतराव दरेकर असा येतो हे नोंद पाठीमागच आमच्या सोशल मीडियावर मी टाकले आहे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक
संतोष झिपरे
९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...