विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2024

छत्रपती भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा संगम जिथे झाला ते #शकुंतलेश्वर मंदिर

 

#









छत्रपती
भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा संगम जिथे झाला ते #शकुंतलेश्वर मंदिर🔥🔥
#शाहू महाराज व #संभाजी महाराज या उभयतांसही पोटीं पुत्रसंतान नाहीं याजमुळें चिंता करीत होते. त्यास ताराबाईस पुत्र #शिवाजीराजे व राजसबाईस #संभाजीराजे हे दोघे पुत्र राजारामसाहेबाचे. त्यास, शिवाजीराजे यांस एक पुत्र रामराजे व कन्या दर्याबाई, दोवें जहालीं. त्यास संभाजी राजे यांची स्त्री जिजाबाई यांचे भयास्तव ताराबाईंनी लांबविला. तो कोणास न समजे अशा रीतीनें जागा जागा देशांतर करून काल हरणें होता. तो बारा चवदा वर्षांचा होऊन #तुळजापुराजवळ पानगांवीं येऊन नारोजी भुत्याकडे होता. त्यास शाहूहाराजांस वेथा होऊन चारसा महिने वेथिस्त होते. त्या दिवसांत नारोजी भुत्या यास रांडपोर नव्हतें. शंभर रुपये कुणगा होता. आपलें म्हातारपण यास्तव त्या मुलांस अंतस्ते सांगितलें. तेव्हां त्या मुलानें आपलें अंतरंग सांगितलें कीं मी शिवाजी राजे यांचा पुत्र. तेव्हां त्या मुलाची हेटाळणी करूं लागला. त्यास शिवाजीराजे यांस दर्याबाई कन्या, पुत्र हा रामराजा, दोघें जाहलीं होतीं. त्यास पुकार होतां होता दर्याबाई निंबाळकरांचे घरी दिली होती तिजला बारशीस खबर गेली. तिनें माणसे पाठवून घरी नेऊन चौकशी करून ठेविलें. तें वर्तमान शाहूमहाराजांस व ताराबाईस कळलें. तेव्हां बातमीस नेहमी खंडेराव #न्यायाधीश पाठविले. व नानासाहेबींही बातमीस कारकून पाठविले. त्याजवर शाहूमहाराजांनी शके १६७१ शुक्ल नामसंवत्सरी मार्गशीर्ष वद्य तृतीयेस कैलासवास केला. तेव्हां फौज पाठवून बारशीपानगावाहून राजारामास आणून, नानासाहेब आदिकरून सर्व सरकारकून व सरदार सामोरे जाऊन आणून, सुमुहूर्ते राज्याभिषेक करून, राज्यावर बसवून नजरा व मुजरे केले.
________________
छत्रपती थोरले शाहू १५डिसेबर१७४९रोजी मृत्यू झाले. दुसरेच दिवशीं महाराणी ताराबाई साहेब यांनी पाच हजार फौज देऊन लवाजमा सह बापूजी
खंडेराव चिटणीस, महादोबा पुरंदरे बाबूजी नाईक बारामतीकर, , चिंतो विनायक, लिंगोजी अनंत, इद्रोंजी कदम सापकर असे प्रमुख गृहस्थ छत्रपती रामराजास रामराजास आणण्यासाठीं पानगांवास कृष्णाबाई ऊर्फ दर्याबाई साहेब निंबाळकर यांच्या घरी रवाना केले. बरोबर फौज, कारखाने, शागीर्दपेशा, वस्त्रे, जवाहीर, हत्ती-घोडे असा मुबलक सरंजाम दिला. पानगांवास यापूर्वी सर्व व्यवस्था भगवंतराव अमात्य व दर्याबाई निंबाळकर पाहत होती. आपल्या हातची खूण म्हणून ताराबाईनें स्वतःची अंगठी रामराजास पाठविली. तुळजापुरचे गोंधळीं रामराजाची वरदास्त ठेवीत, त्यांस पांच हजार रुपये इनाम देऊन ही मंडळी छत्रपती रामराजा व दर्याबाई यांस घेऊन परत निघाली. ता. २६ डिसेंबरला त्यांचा
दत्तविधान झालें नाहीं.
मुक्काम कृष्णाकांठीं वडूथजवळ झाला. पेशवे सामोरे जाऊन भेटले,🚩🚩 आईसाहेब ताराबाई साहेब खालीं वडूथ शहरांत तेरा दिवस होती, त्यांची छत्रपती रामराजाशीं पहिली भेट कृष्णाउत्तरतीरी शकुंतेश्वराचे मंदिरांत विधिपूर्वक झाली.🚩🚩 नंतर नगर प्रवेशाचा मुहूर्त मिळेपर्यंत आरळें नजीक मुक्काम केला. लोक सामोरे जाऊन भेटले. सरदार वगैरेंच्या भेटी होऊन म्हसवें येथे आले. मध्यंतरी २० डिसेंबरला सदाशिवरावभाऊ साताऱ्यास आला, त्यानें वडुथावर महाराजांची भेट घेतली. तेराव्याचे मोठें जेवण उरकल्यावर गुरुवार पौष शु० ८ ता० ४ जानेवारी स. १७५० च्या मुहूर्तानें सकाळीं रामराजानें नगर-प्रवेश केला आणि त्याच दिवशीं राज्यारोहण समारंभ झाला.
रामराजाचे दत्तविधान म्हणून झालेच नाहीं. दत्तक देणारा व घेणारा कोणी नव्हते. तर 'मध्यग्रह दत्तक विधीनें नवीन राजा स्वीकारण्याची व्यवस्था धर्मशास्त्रांत सांगितली आहे, तीही रामराजासंबंधानें घडली नाहीं...
_____________
ते तेथें जाऊन रामराजास घेऊन छ २६ मोहरम रोजी (२६ डिसेंबर १७४९) वडूथाजवळ कृष्णेचे ठिकाणी आले. इतक्यात महाराज वारल्याची बातमी पुण्यास गेल्यावर भाऊसाहेबही छ २० मोहरम रोजी (२० डिसेंबर १७४९) पुण्याहून निघाले. महाराज वारल्याची खबर लागतांच वडुथावर राहिले होते, त्यांची भेंट तिसरे प्रहरी दिवसास झाली, व पुढें छ ६ सफर रोजीं (४ जानेवारी १७५०) साता-यास येण्यास मुहूर्त होता त्या दिवशीं मुहूर्तानें शहरांत दाखल झाले. तेव्हां श्रीमंतांनी ८८९ रुपयांचा पोषाख महाराजांस केला. त्याच दिवशी ह्मणजे पौष शु॥ ८ (४ जानेवारी १७५०) सहा घटिका दिवसास राज्याभिषेक झाला..
-----------------
26 डिसेंबर 1749 रोजी छत्रपती रामराजे हे सातारा मार्गावर असताना वडूज येथे आले यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराज निधन झाल्याचं वार्ता त्यास कळाले तसेच त्यांच्यासोबत वरील लेखात उल्लेख असल्याप्रमाणे लवाजमा आहे म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज यांचे सातारा गादीच्या युवराज पदाचा मान यावेळी त्यांना मिळाला होता किंवा जाहीर झाला होता यामुळे आपल्या ला दत्तक घेणारे #छत्रपती_थोरले_शाहू_महाराज यांचे निधन झाल्यामुळे त्यांना वडूथ सोडता आले नाही कारण तत्कालीन काळात राजघराण्यातील अथवा मातब्बर घराण्यातील मंडळीत जर घरातील करता किंवा वडील वाढल्यास त्या सुतुकातून उठून त्या घराण्यातल्या कर्त्या माणसाने घेऊन पुन्हा दिनचर्या सुरू केली पाहिजे ही प्रथा होती तसेच छत्रपती रामराजे हे तत्कालीन काळात #मराठा साम्राज्याचे होणारे छत्रपती होते यामुळे आपसूक त्यांना तेरा दिवस सुचक पाळणा हे अगत्य होतं यावेळी यावेळी महारणी तारा राणी सरकार सोडून सातारकर छत्रपतींच्या घराण्यात कुणीही करता पुरुष अथवा स्त्री उरली नव्हती कारण छत्रपती शाहू महाराजांच्या तीन पत्न्या या त्यांच्या हयातीतच वारल्या तर सकवार बाई साहेब या सती गेल्या तर रघोजीराजे भोसले नागपूरकर हे नागपूर परिसरात असल्याने त्यांचाही वापर या ठिकाणी दिसून येत नव्हता तर फत्तेसिंह बाबा यांनी या दत्तक विधानातून पूर्वीपासूनच अंग काढून घेतल्याने आणि ते सकवार बाई साहेब व सगुनाबाई साहेबांच्या विचाराने राहणारे असल्याने छत्रपती शाहू महाराजांवर निष्ठा ठेवून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही यामुळे युवराज फत्तेसिंह भोसले यांची भूमिका ही अलगद बाजूला गेली याउलट महानताराणी साहेब या रामराजे यांच्या आधी असल्याने तसेच मराठ्यांच्या या भावी छत्रपती चे सुतुक काढून पुन्हा साताऱ्यात घेऊन येण्यासाठी त्यांना वडूज येथे येणे अगत्य होतं छत्रपती घराण्यातील दुहिमुळे पंतप्रतिनिधी व पेशवे यांनीही बघायची भूमिका घेतली होती आणि सर्वच अधिकार हे महारणी तारांसाहेब यांच्या कडे एकवटल्यामुळे तसेच घराण्यातील कर्त्या स्त्री असल्यामुळे त्यांनी आपल्या नातवाच्या भेटीसाठी प्रस्थान केले व छत्रपती रामराजे व महारणी यांची भेट कृष्ण काठी असलेल्या शकुंतलेश्वर मंदिरात श्री शंभू महादेवाच्या देवळात झाली व भोसले यांच्या तीन पिढ्यांच्या संगम या ठिकाणी झाला असेच म्हणावे लागेल यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराजांचा तेरावे वडूज येथे करण्यात आलं आले व राजाराम महाराजांचे सुतुक निघाल्यानंतर त्यांनी सातारा कडे प्रस्थान केले असे उपलब्ध संदर्भातील कागदपत्रातून दिसून येते तसेच वडूच्या या वडूथच्या या शकुंतेश्वराच्या मंदिरात साताऱ्याचा गादीचा वारस कोण आहे हे प्रत्यक्ष दयाबाई साहेब सोडून व भगवंतराव अमात्य सोडून कोणाशी माहिती नव्हते आणि या राजाला बघण्यासाठीच प्रत्यक्ष पंचक्रोशी ही आई असावी असा कयास बांधण्यास जागा आहे कारण जवळजवळ मराठ्यांची 40 हजाराची फौज या ठिकाणी आपल्या धन्याच्या स्वागतासाठी व धन्याला बघण्यासाठी आली होती ही तत्कालीन विविध सरदारांच्या उपस्थितीनुसार दिसून येते यावेळी नागपूरकर हे बंगालमध्ये लढाईवर अडकल्यामुळे त्यांची उपस्थिती या ठिकाणी नव्हती बाकी मराठा दौलतीतले सर्वच मान्यवर सरंजमदार सरदार व वतनदार वडू तेथे आपल्या धन्यास बघण्यासाठी व धन्याला मुजरा झाडण्यासाठी उपस्थित होते हे विशेष त्यामुळे वडूज येथील शकुंतलेश्वर मंदिर हे जसं जेजुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शहाजीराजे सरलस्कर व राजमाता जिजाऊ यांच्या भेटीसाठी तीर्थक्षेत्र म्हणून निवडले होते तोच प्रकार महानतारणी यांनी शकुंतुलेश्वर मंदिराची महत्व इतिहासात नमूद झाला आहे पण सदर इतिहास किंवा या शकुंतश्रीच्या मंदिरातील भेटीबद्दल मराठ्यांच्या इतिहासातील कागदपत्र आजवर कोणीही मांडणी केलेली नाही हे विशेष भविष्यात याबद्दल आणखीन विस्तृतपणे लिहिणारे पिढी पुढे येईल याबद्दल खात्री आहे यामुळे वडूज येथील शकुंतलेश्वर मंदिराचे महत्त्व इतिहासात अनन्य साधारण आहे
तळटीप:- सदर लेखात सुरुवातीला आलेले हे राजाराम महाराजांच्या आगमनाच्या वेळचे तत्कालीन उपलब्ध संदर्भात लेखन जसेच्या तसे शब्दांकित केले आहे. याबद्दल गैरसमज नसावा संदर्भ साधने मधील उल्लेख तीन लेखात आहे त तसेच दिले आहे
सदर लेख व माहिती संकलन संतोष झिपरे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...