विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 August 2024

पंढरपूर🚩

 




पंढरपूर🚩
संताजी घोरपडे सेनापती देवदेवतांचे संरक्षणास देवाचे मुर्तींना परकीय शत्रू पासुन किंवा स्वकीयांकडून त्रास होऊ नये, इजा पोचू नये, यासाठी मराठा दौलतीचे सेनापती म्हणून सदैव जागरूक राहून अशांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी जागरूक असत. पंढरपूर विठ्ठलाच्या मुर्तीस मोगलांच्या कडून इजा पोहचू नये म्हणून संताजी घोरपडे यांचे पत्र -
राजश्री सरबगजी कारकूनांनी दि ।। पागा गोसावी यासी
अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्री संताजी घोरपडे सेनापती व नमस्कार सु ।। सीत तिसैन अलफ मौजे देगाव ता मोहोळ येथे श्री च्या मुर्ती पंढरपूराहून ताम्राच्या गलबल्या समयी आणून ठेवीत असता तियेसी आमदप्तरकीच्या मुळे मौजे मजकूरास तुमचा उपद्रो लागतो तरी आपले कुल लोकास ताकीद करुन जरा आजार लागो न देणे. मौजे मजकूराची खंडणी करुन ऐवज राजश्री देवाकडे देऊन गाव राजश्री गोपाळ विठ्ठल बडवे यांचे हवाली केले आहे. आसियास तुम्ही कोन्ही त्या गावासी खंडणी अगर घासदाणा उपद्रो न करणे मौजे मजकूरीचे विषी गोपाळ विठ्ठल बडवे हे येऊन तुम्हास सांगत जातील त्याचे पारिपत्य करीत जाणे असे न करिता मौजे मजकूरास कोन्ही आजार देईल म्हणवून त्याचा मुलाहिजा होणार नाही ऐसे बरे समजोन वर्तणूक करणे. फिरोन बोभाटा येऊ न देणे. जाणिजे. हे विनंती.
- त्या पत्राची तारीख होती
- २४ जुलै १६९५
संदर्भ - सोलापूर जिल्ह्याचा इतिहास - गोपाळराव देखमुख
साभार - रवि शिवाजी मोरे
@sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...