विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 13 August 2024

🚩🚩कर्यात कासेगाव येथील कारभारी बाबाजीराजे भोसले 🚩🚩

 



🚩🚩कर्यात कासेगाव येथील कारभारी बाबाजीराजे भोसले 🚩🚩
मित्रांनो दोन महिन्यापूर्वी कसबा कासेगाव येथील ताटे देशमुख यांच्या घराण्याकडे छत्रपतीच्या खाजगीकडील तलवार आल्याच्या एक पत्र मी टाकलं होतं ते आपल्या सर्वांना मिळाला असेलच त्यास ताटे देशमुख यांची देशमुख असलेलं कसबा कासेगाव याबद्दल नवीन संशोधनातून कागदपत्र पुढे आले आहेत जे येथील कारभार वेरूळच्या बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होता हे स्पष्ट होतं
मालोजीराजे भोसले ने दाखविलेल्या कर्तबगारीचा उल्लेख बृहदीश्वरशिलालेखकर्त्याने केला आहे. त्यात आवश्याच्या लढाईचा उल्लेख करून, मालोजीराजे ह्यापूर्वी बहुत युद्धात जय पावले होते, असे तो शिलालेखकार लिहितो. याचा अर्थ असा की, शक १४९९ पासून शक १५१० पर्यंतच्या काळातील अकरा बारा वर्षांच्या अवधीत मालोजीराजे भोसलेने निजामशाहाच्या वतीने अनेक मोहिमात पराक्रम करून आवश्याच्या युद्धप्रसंगी तर त्याने निजामशाहाचे प्राण वाचविले. आवश्याच्या लढाईनंतर मालोजीची साख इतकी वाढली की, पुढे शक १५१४ त इभ्राई आदिलशहाला सोडून नगरास आलेल्या दिलावरखानाच्या सल्ल्यावरून बु-हाण निजामशहाने जेव्हा मंगळवेढ्यापर्यंत आदिलशाही मुलुख जाळून पोळून उद्ध्वस्त केला तेव्हा त्याही मोहिमेत मालोजीने मोठा पराक्रम केला. ह्या पराक्रमाचा उल्लेख बृहदीश्वरशिलालेखकर्त्याने केला आहे. नंतर शक १५१५ त इभ्राइम आदिलशहाच्या इस्माएल नामक भावाने कोल्हापूर, बेळगाव प्रांती बंड करून बु-हाण निजामशाहाची मदत मागितली. त्या मदतीच्या सैन्यात सामील होऊन मालोजी भोसल्याने कोल्हापूर प्रांती आदिलशाही फौजेला बहुत त्रास दिला. यावेळी त्या काही गावे वतन इनाम मिळाले होते. पण त्या अगोदर पेरूच्या राजे भोसले पाटलांकडे असलेले मोकासा व पाटील की हे वतन की गावी आणि त्यांची नावे सदर फोटो क्रमांक दोन मध्ये दिले आहे ते पहा पण मालोजीराजांनी या काळात जिंतीची पाटील की काकडेकडून विकत घेतली त्याच्या पत्र पाठीमागे मी टाकलेले आहे ते ग्रुप वर पाठवा.
आता संदर्भ फोटो क्रमांक एक कडे येऊ तत्कालीन काळात भोसले घराणे कडे इंदापूरची देशमुख व पुणे सुपे ची जागरी होती हे इतिहास सर्वज्ञात आहे पण सदर पत्र क्रमांक एक मुद्दे दिलेल्या कार्यात कासेगाव हे गाव पंढरपूर शेजारील कसब्याचे गाव असून तत्कालीन काळात तेथील कारभार बाबाजी भोसले राजे भोसले यांच्या वतीने चालत असल्याचा उल्लेख आदिलशहाने मसवडच्या माने देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे आणि त्याची तारीख ही दिली आहे ती आपण प्रत्यक्षात पहा यावरून तत्कालीन काळातील कारभार हा भोसले घराण्याकडे होता हेही स्पष्ट होते तसेच 2010 साठी वसंतराव शिंदे यांचे एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं होतं की पंढरपूर परिसरातील गावांशी वेरूळच्या भोसले पाटलांचा काय संबंध आहे पण संदर्भ साधना नसल्यामुळे याबाबत काही बोलणे योग्य नव्हतं सदर पत्र आदेशाने सांगितल्याप्रमाणे चे प्रमाणे मान देशाच्या मानदेशमुखांना पत्र लिहिण्याचे कारण की तत्कालीन काळात सांगोला पंढरपूर कसबा कासेगाव ही हा परिसर हा माण देशात मोडत होता आणि याच परिसरात शिखर शिंगणापूर हे बाबाजी राजे भोसले यांचे कुलदैवत होतं असल्यामुळे येथील मुतालिक अथवा सरदेशमुखी अथवा देशमुख ही बाबाजी भोसलेंकडे असावी काय याबाबत संशोधन झालं पाहिजे हे अन लोक कालगणनेनुसार 1634 मधला आहे 1634 पर्यंत या परिसरातील कारभार हा बाबाजी भोसले यांच्या अर्थात भोसले घराण्याकडून चालत होता हे स्पष्ट होते तसेच सादर कर्यात कासेगाव हे दौलखवासखान हबशी जो आदिलशाही वजीर होते त्यास देण्यात आले. सादर इनाम खवासखान यास मिळाले यावरून पुर्वीपासून भोसले कडे हे इनाम व कारभार होते काय या संशोधनासाठी वाव आहे पुढील काळात आणखीन संशोधन झाले पाहिजे असे वाटते....
आपले
संतोष झिपरे
9049760888

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...