मध्यकालीन
मराठेशाहीच्या म्हणजेच उत्तर शिवकाळापश्चात. सर्वात जास्त छळ , कोणत्या
घराण्याचा वा कुटुंबाचा झाला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र
,पुत्रवधू ,पौत्र , शिवकन्या ह्यांचा. मराठेशाहीतील इतिहासातले महाराणी
येसूबाई हे निर्विवाद झाकोळले गेलेले एक श्रेष्ठ तेवढेच त्यागमुर्ती असे
कणखर मातृतुल्य व्यक्तिमत्त्व आणि महापर्व. .,ज्याची इतिहासाला नोंद घेणे
संयुक्तिक वाटले नसेल . कारण अनेक बहारदार अन् पराक्रमी पैलू त्या काळात
होते जे एका पेक्षा एक .
मातोश्री
जिजाऊ आऊसाहेब ,महाराणी येसूबाई , भद्रकाली ताराराणी , त्यानंतरच्या
काळात अहिल्याबाई या चार स्त्रिया म्हणजे अलम मराठेशाहीचे मुत्सद्दी
मातृवैभव असून सुवर्ण अध्याय आहेत. त्यात संशयास जागा नसावी . कारण कार्यच
एवढे उत्तुंग आहे जिथे महोमहत्तम सेनापती अन् रजवाडे त्यांच्यापुढे फिके
आहेत , असा तो असिम अद्वितीय त्याग महाराणि येसुबाई नी केला. १६८९ ते १७१९
म्हणजे तब्बल २९ वर्ष त्या मोगल कैदेत होत्या
३
नोव्हेंबर १६८९ ला झुल्फिकार खानाने , मराठि फितुरांमुळे स्वराज्याची
राजधानी रायगड हा अजिंक्य किल्ला काबिज केला . तत्पूर्वी वेढ्यातून सुखरूप
पणे बाहेर पडण्यास , राजाराम , ताराराणी व कुटुंब कबिला दक्षिणेकडे कूच
करित होता . हे सर्व महाराणी येसूबाई च्या रणनीती ने साध्य झाले होते .आणि
त्या स्वतः , पुत्र शिवाजी (द्वितिय) उर्फ शाहु , सकवारबाई या रायगडावर
रक्षणासाठी मागे राहिल्या आणि वेढ्यात पुर्णपणे अडकणार, जीवानीशी जाणार हे
माहिती असुनसुद्धा रायगडावरच थांबल्या. झुल्फिकारखान ,मुघल सैन्याने रायगड
काबिज केला , येसुबाईस कैद करण्यास मुघल सैन्य गेले असता . उर्वरित मुठभर
मराठि सैन्याकडून येसुराणीस उपद्रव होऊ नये याबद्दल झुल्फिकार खानास
कळविले. कुराणावर ,हात ठेऊन शपथ घेऊन झुल्फिकार खानाने ते मान्य केले अशा
रितीने येसुबाई ,पुत्र शिवाजी , सकवारबाई ,मदनसिंह , प्रतापराव गुजर चे दोन
पुत्र , लवाजमा ,दासदासी हे कैद झाले. छत्रपतींचे भव्य ३२ मण सुवर्ण
सिंहासनाचे तुकडे करून वाहून नेले .रायगडाचा विध्वंस केला .जाळपोळ केली.
दफ्तरखान्यासकट अनेक वास्तू बेचिराख केल्या.
१७०७
मध्ये आलमगीर औरंगजेब अहमदनगर जवळ मरण पावला .तेव्हा औरंगपुत्र मुअज्जम
ने शाहुस सुटका करविली. ह्या मागे मोगल नीच राजनीती होती ज्या २५ ते ३०
वर्षाच्या पराक्रमी ताराराणी ने औरंगजेबास लढा देऊनही हि शूर मराठ्यांची
अजिंक्य ताराराणी सोबत वारसाहक्क साठी शाहुचे पाचारण करणे मराठ्यात
गादिसाठी दुफळी माजून पर्यायाने मोगलांचा दक्षिणेत निर्वेध आणि निर्धोक पणे
सत्तावावर राहावा. आणि शाहूने मोगलांचा सुभेदार म्हणून दक्षिणेत शिरकाव
करावा. परंतु काही जाचक अटिवर, त्यात पहिली अट होती .महाराणी येसूबाई ह्या
मोगल कैदेत ओलिस असतील ,सोबतच लवाजमासुदधा .एकटे शाहु महाराज कैदेतून
सुटून महाराष्ट्रात आले होते आणि येसुबाई मुघल कैदेत अडकून पडल्या होत्या.
जेष्ठपुत्र
शहजादा मुअज्जम ने स्वतास बहादूरशहा हि पदवी लावून दिल्लीत मोगल सल्तनीचा
बादशहा म्हणून १७०७ ते १७१३ मृत्यूपर्यंत होता . ह्या काळात शाहूराजे ची
स्वताची अस्तित्वाची लढाई सुरू होती ताराराणी सोबतच गृहकलह सुरू झाला
होता. सुरवातीला ते शंभुपुत्र शाहू आहेत हे मानायला सुद्धा कोणी तयार
नव्हते .परसोजी भोसले ने एका ताटात शाहुं सोबत जेवण केले आणि मराठा
मंडळांची खात्री पटली हेच खरे शंभुपुत्र शाहू आहे .
१७०८
मध्ये सातारा हि राजधानी बनवून शाहुराजे नी स्वतःस राज्याभिषेक करुन
घेतला .छत्रपती झाले. अष्ट प्रधान मंडळ नेमले , जाधव जेधे आंग्रे दाभाडे
गायकवाड पवार चव्हाण , भोसले हि मराठा मंडळी मातब्बर सरदार शाहु छत्रपतीं
चे एकनिष्ठ शिलेदार होते ,तसेच श्रीवर्धन चे भट , बाळाजी विश्वनाथ यास
प्रधानपद म्हणजे पेशवा हा हुदद दिला . मग शाहु राजेंनी राज्यविस्तार आरंभला
, सुरवातीला , ताराराणी चा पाडाव करण्यात शक्ति खर्ची गेली . वसंतगड ,
पन्हाळा हे महत्वाचे गड खाशे शाहूराजे नी जिंकून घेतले .
शाहु
महाराजांचे १७०८—०९ पासुनच मातोश्री येसुराणिस सोडविण्याचे मनसुबे होते
परंतु त्या वेळेस मोघल प्रबळ सत्ता होती आणि शाहुराजेंकडे अर्थातच कमी
लष्करी संख्याबळ . कारण तोपर्यंत शाहुंचा जम बसायला ५ वर्षं निघून गेली
होती. आणि उघड मैदानात मोगलांशी युद्ध करणे हि प्रशस्त नव्हतं त्यामुळे
सबुरिने अन् गोडिगुलाबिनेच हे कार्य करावे लागणार होते.
१७१३
ती संधी आली.दिल्लीचा मोघल बादशहा बहादूर शहा वृद्धापकाळाने मरण
पावला.दिल्लीत ,मोघलाईत बेदिली माजली .नवीन बादशहा फरुखसियार झाला .त्याचे
वझिर सय्यद बंधूंशी वितुष्ट होते .बादशहा ला सय्यद बंधूंची भीती वाटे .
मराठ्यांना आयतिच संधी चालून आली दिल्लीत हस्तक्षेप करण्याची ,ह्या कामी
बाळाजी विश्वनाथ भट ची शिष्टाई , मुत्सद्देगिरि ,वकीली कामात आली. परंतु
१७१३ ते १७१९ हा ६ वर्षांचा काळ. बहुधा शाहुराजे राज्यविस्तारात गुरफटले
असतील
दख्खनेतील
मोगल सुभेदार सय्यद हुसेन कडून १७१३ मध्ये शाहुराजेंशी तह केला
त्याप्रमाणे मोघलांच्या दक्षिणेतील सुभ्यावर चौथाई सरदेशमुखी चे हक्क
स्वतःहुन वसुल करावे.तसेच मोगल बादशहा च्या प्रदेशाचा बंदोबस्त जय्यत
ठेवावा , मराठ्यांनी बादशहास १० लाख खंडणी द्यावी, १५ हजार मराठा फौज
बादशहाचे मदतीस ठेवावि त्याबदल्यात . राजेंच्या मातुश्री, कुटुंब आप्तेष्ट
ची बादशहाच्या कैदेतून मुक्तता करावी. असे तहात ठरले परंतु बादशाह ने तह
मान्य केला नाही. बादशहा फरुखसियार च्या अविश्वसनीय धोरणामुळे हे मनसुबे
फसले.तरिहि सय्यद बंधूने मराठ्यांशी संधान बांधले होते. सय्यद बंधूला
बादशहा फरुखसियारचा काटा कायमचा काढायचा होता. परिणामी सय्यद बंधूंना
मराठ्यांचे सहाय्य ह्याकामी अपेक्षित होते.
मधल्या
काळात हा बेत तडीस जाऊ शकला नाही. कारण मोघलांना उघड्या मैदानावर लढा
देणे आत्मघात करण्यासारखे होते .तरिहि मराठे संधी शोधत होते.
परिणामी
१७१९ ला मराठी फौज १५ हजार आणि सातारा हून बाळाजी विश्वनाथ, राणोजी
शिंदे,खंडो बल्लाळ, सेनापती खंडेराव दाभाडे, संताजी भोसले हे मातब्बर सरदार
दिल्लीवर चालून गैले , बादशहा फरुखसियार यास कैदेत टाकले.तिथे त्यांची
हत्या करण्यात आली .सय्यद बंधू ह्या बादशहाच्या वझिराने रफी उद दरजत याला
नवनिर्वाचित नामधारी बादशहा घोषित केले व त्याचेकडून सनदा विधीवतपणे
मराठ्यांना शिक्कामोर्तब करुन दिल्या. ह्यामुळे दक्षिणेतील मुघलांच्या सहा
सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क छत्रपती शाहू राजांना
मिळाले व सनदशीर हक्क प्राप्त झाला. तसेच मोगलांच्या कैदेतील मातोश्री
येसूबाई, शाहू राजांचे सावत्र बंधू मदनसिंग यांची सुटका झाली. आणि ते मजल
तर मजल सातारा महाराष्ट्र येऊन पोहोचले.
४
जुलै १७१९ या दिवशी त्या बंदिवासातून मुक्त होऊन सातारा , स्वगृही परत
आल्यात .मराठा मंडळात त्यांच्या अभुतपुर्व त्यागामुळे , धैर्यशील
वृत्तीमुळे मानाचे स्थान आहे. शंभुछत्रपतीनी त्यांना श्री सखी राज्ञी जयति
हा खिताब देऊन गौरविले होते. अशा जाज्वल्य त्यागमुर्ती अन् मातृदेवतेला
त्रिवार मानाचा मुजरा .
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
No comments:
Post a Comment