विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2024

सरदार केदारजी सुरवौसी (सुरवसे)

 

🚩🚩

सरदार केदारजी सुरवौसी (सुरवसे) 🚩🚩
मसुर कराड परिसरातील काही गावांची मोकासा ही आदिलशाहीकडून सरलष्कर महाराज शहाजीराजे भोसले यांच्याकडे होती अफजलखान स्वारीच्या वेळेस मसुरीच्या जगदाळेंनी आदिलशाहीच्या हुकमाप्रमाणे खानासोबत स्वराज्यावर चालून आले तसेच या लढाईत अफजलखाना सोबत हे जगदाळे देशमुख ही मारले गेले व पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद करून तनखा पध्दतीने राज्यात आमलात चालू केल्यामुळे व जुनी देशमुखी ठेवून नवीन वतनदारी देणे बंद झालं व नव्याने तसेच स्वराज्य बाहेर वतनदारी तुमची बंद केले.औंध येथील गिरजोजी यादव व अरजोजी यादव या दोघा बंधूंचा देशमुख ही पुरातन त्यात जगदाळे व यादवांच्या देशमुख होता या यादव बंधू पैकी गोरजोजी यादव यांच्या भाऊ पदाजी यादव व पदमोजी यादव यांनी आपल्या देशमुख तील काही गाव सेनापती धनाजी जाधव विकली तसेच धनाजी जाधव हे मराठा चे सेनापती असल्याने छत्रपतींकडे त्यांच्या असलेल्या वजन व छत्रपती घराण्यातील यादव दोन्हीही बंधू छत्रपती घराण्याच्या राणीवशाकडे हुजूरात होती व सदर पत्र हे सतराशे सहा १७०६ मधील असून हा काळ छत्रपती राजाराम महाराज यांची पुत्र दुसरे शिवाजी महाराजांचा आहे यावेळी हिंदवी स्वराज्याचे कारभार महाराणी ताराराणी साहेब या पाहत असेल मागील तीन पिढ्यातील यादव व जगदाळे देशमुख वाद दोन वेळा माहुली येथे कृष्णा नदी दिव्य करून दोन्ही गोताने वेगवेगळ्या निर्णय दिल्यामुळे रामचंद्रपंत अमात्यांनी तो छत्रपतींकडे पाठवला असता यावेळी मुरारजी घोरपडे हिंदुराव यांच्या दिम्मतातील सरदार केदारजी सुरवौसी (सुरवसे) यांनी वजारतमाब मुरारजी घोरपडे हिंदूराया यांनी देशमुख जगदाळे यांची बाजू घेतली कारण सेनापती संताजी बाबांच्या काळातल्या पासून या देशमुखी साठी घोरपडे अनुकूल होते तीच बाब पुढील त्यांच्या पिढीनी चालवले असल्याचे दिसून येतं व त्या संबंधित कागद स्वतः हिंदुराव यांनी करून छत्रपतींकडे जगदाळे व यादवांची देशमुख चा निवाडा करून घ्यावा म्हणून विनंती केली त्याबद्दलच्या तपशील वरील पत्रात आहे
लेखांक ४६ श्रीराम १६१८ वैशाख वद्य १२
राजश्री तिमाजी यमाजी + + + + +
व कारकून प्रा। सातारा गोसावी यासि
श्री अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री केदारजी सुरवौसी सरनौबत सरकार रा। मुरारजी घोरपडे वजारतमाब दंडवत सुहुरसन सीत तिसैन अलफ रा। पतअमात्य यानी माहलीचे कारकून बैसउनु पाटिलांस कृष्णेमधे घालून रा। माहादजी देसाई याचे कागदपत्र करून दिल्हे होते कागद ९ तुमचे बखेर घेउनु हुजूर रा। स्वामीजवळी आले होते एथे गिरजोजी यादव यानी कटकट केली होती त्यास रा। हिंदूरायानी नाना प्रकारे माहादजी देसाई याचे अभिमान धरून कागदपत्र करून पाठविले असे एथे च कागदपत्र करून देत होतो त्यास गिरजोजी यादव ह्मणो लागले ते मागुती जाउनु तेथे निवाड करून घेऊ ह्मणउनु विनति केली त्यावरून उभयतास हि तुह्माकडे पाठविले असे जे पाटील कृष्णेमधे निघोन निवाडा करून दिल्हे होते ते च आणून मागुती एकदा निवाडा करून देणे पहिलियाने एकदा कृष्णेमधे निघोन एक सागितले दुसरेयाने दुसरे सांगितले याने त्याचे मुलाहिजा कोणी करणार नाही ज्याचे अभिमान रा। हिंदूरायानी धरिले असतील त्याचे व्रित्तीस नास होईल हे तो गोष्टी कालत्रई घडणार कळले पाहिजे तुह्मी देसाइयाचे जैसे जैसे चालवाल तैसे तैसे रा। रामाची कृपा तुह्मावरी विशेष होईल कळलें पाहिजे जाणिजे छ २५ माहे सौवाल
सरदार केदारजी सुरवसे हे हिंदुराव घोरपडे यांच्या दिम्मतातील सरदार आहेत घोरपडेच्या लष्करातील सरनोबत्ती त्यांच्याकडे असल्याचं वरील पत्रावरून दिसून येते तसेच सदर पत्रासोबत दिलेल्या केदारजीराव सुरवौसी यांच्या मुद्रा असून त्यावर दोन्ही बाजूला वरच्या भागात सूर्य आणि चंद्र कोरलेला आहे याचा अर्थ जिथे उमटले त्यांचं नाव व किर्ती सूर्यचंद्राशी पर्यंत राहणार असल्याचा उल्लेख एक प्रकारे त्यात केलेला आहे सदर मुद्रा ही चौकोनी आकाराचे असून त्यात सुरुवातीस श्री मार्तंड चरणी तत्पर तत्पर म्हणून उल्लेख असून जे आपलं कुलदैवत खंडोबा ड्युटीचा उल्लेख मुद्रेच्या सुरुवातीस आलेला आहे आणि या आपल्या कुलदेवतेच्या चरणाशी कायम लिहीन असल्याचे भाव दिसून येते तर दुसऱ्या ओळीत रोजी पुत्र मुरारजी घोरपडे म्हणून उल्लेख आहे हे घोरपडे नवकस घराण्यातली असल्याचं उल्लेख या ठिकाणी आलेला आहे हिंदवी स्वराज्य चे मराठा साम्राज्याची सेवा अनेक घराण्यांनी केली त्यापैकीच एक घराण म्हणजे सुरवसे घराण होय पण या घराण्यातील कागदपत्र तील उल्लेख खूप कमी प्रमाणात आढळते. आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यातील
संतोष झिपरे
9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...