विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2024

गिरजोजी ऊर्फ गिरमाजी पिसाळ

 

प्रतापगडावर छत्रपती शाहू महाराज यांच्या निशाण फडकविणार
छत्रपती शाहू निष्ठा

गिरजोजी ऊर्फ गिरमाजी पिसाळ🚩🚩
सादर फोटो हे ३०एप्रिल १७०७मधील नोंद आहे जो छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या हिंदवी स्वराज्य मधील औरंगजेब यांच्या कैदेतून आगमनाची काळात महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या शी संघर्ष सुरू झाले तेव्हा किल्ला प्रतापगड छत्रपती शाहू महाराजांच्या ताब्यात आले तिचे दिवस म्हणजे ३०एप्रिल १७०७ होय असे म्हटले तरी हरकत नाही व हे किल्ला छत्रपती शाहू महाराजांच्या बाजुने गिरमाजी(गिरजोजी) पिसाळ यांनी जिंकून छत्रपती शाहू महाराज यांच्या निशाण म्हणजे मराठी जरीपटका प्रतापगड वर फडकविला होते असे अर्थ होतो. पण त्या अगोदर पण तेथे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांच्या कडून जिकून घेतला आहे व छत्रपती शाहू महाराजांच्या राज्य आत हे किल्ले आले आहे असे अर्थ होते. सादर गिरमाजी (गिरजोजी) पिसाळ पुढील काळात छत्रपती थोरले शाहू महाराजांशी एकनिष्ठ होते याबाबत एक पत्र उपलब्ध आहे त सोबत देते आहेत. येथे गिरजोजी पिसाळ म्हणून उल्लेख आहे पण खालील नोंदी हे गिरमोजी झाले आहे कारण पुढील काळात छत्रपती शाहू महाराजांनी आणखीन दोन पत्र लिहिले आहे त जो गिरजोजी पिसाळ म्हणून पत्रातून उल्लेख आहे तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या सुरूवातीला पिसाळ घराण्यातील एक शाखा छत्रपती शाहू महाराज सातारा यांच्या सेवा शी होते. तसेच खालील पत्र हे २९मार्च १७०८मधील आहे म्हणजे प्रतापगड छत्रपती शाहू महाराजांच्या ताब्यात आल्यावर ११महिन्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या हुजूर कडील गिरजोजी पिसाळ होते हे दिसून येते... प्रत्यक्ष पत्र पहा. लक्षात येईल
६३ श्रीरामोजयति. २९ मार्च १७०८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३४ सर्वधारी संवत्सरे चैत्रबहुल पंचमी भोमवासरे क्षत्रियकुलावत्तंस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारो पंडित यासी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं आपलें वृत्त विस्तारें रा। गीरजोजी पिसाळ यास लिहून पाठविलें होतें तें पत्र बजिन्नस त्यांणीं स्वामीचे सेवेसी पाठविली. यावरून लिहिला आशय विदित जाहला. त्याचा सारांश हाच कीं, आपणास बंधूचा आग्रह सिंधुदुर्गास जावें, व तेथून आमंत्रणही साक्षेपयुक्त आलें आहे त्यास, आपला निश्चय स्वामीसमीप यावें याकरितां लोकांची स्वारी पाठऊन घेऊन जाणें ह्मणून लिहिलें. त्यावरून तुमचे निष्ठेचा अर्थ कळोन स्वामी संतोषी जाहले तुह्मीं पुरातन लोक, स्वामीचे ठायीं आर्त धरितां, तुमचा संग्रह करून चालवावें, यापेक्षां स्वामीस आवश्यक तें काय आहे ? प्रस्तुत, हें पत्र तुह्मांस लिहिले असे. तरी गिरजोजी पिसाळ याजकडील लोक तुह्मास बलावण्यासं पाठविले आहेत. तुह्मीं स्वार होऊन अवलिंबें दर्शनास येणें. तुमचे बहुमान गौरवास अंतर होणार नाहीं. प्रयोजन प्रसंगाचा अर्थ तुह्मीं कितीक लिहिला होता तरी तुह्मी कार्यभाग करावे, आणि स्वामीस संतोषी करावें, हे उचित आहे तदनुरूप दर्शनास येऊन स्वामीस संतोषी करून आपला मनोदय सिद्धीस पाववून घेणें जाणिजे बहुत लिहिणें तर तुह्मीं सुज्ञ असा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...