बकाजी फर्जंद यांस पाटीलकी बहाल २५ सप्टेंबर १६७५
महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करून त्यांना कठीण प्रसंगी साह्य करणाऱ्या हिरोजी फर्जंद प्रमाणे त्यांचा मुलगा बकाजी यांनाही महाराजांची सेवा एकनिष्ठेने केली. राज्याभिषेक प्रसंगी सेनापती, अष्टप्रधान, सुभेदार, किल्लेदार, नोकर चाकर, ब्राम्हण, पाहुणे, प्रजेला शिवरायांनी बक्षीस म्हणून, इनामवतानाचा लोभ न धरता आयुष्यभर आपली सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. स्वराज्याला भरभराटी आलो. वैभव प्राप्त झाले. जगभर शिवरायांचा नाव लौकिक वाढला. मान सन्मानाची अभिलाषा न बाळगणाऱ्या या दोन निष्ठावान सेवकांच्या मुलाबाळांना काहीतरी मान द्यावा असे महाराजांना मनोमन वाटत होते. महाराजांनी हिरोजी फर्जंद यांचा मुलगा बकाजी यास खामगाव मावळ येथील पाटीलकीचे कायमस्वरूपी वतन दिले. २५ सप्टेंबर १६७५ रोजी पाटील वतनाची सनद बकाजीस दिली...
● खांबगावकर भोसल्यांच्या घराण्याची काही कागदपत्रे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी शिवचरित्र साहित्यखंड-२ मध्ये प्रसिद्ध केली आहेत. त्यात बकाजी फर्जद यास खांबगावची पाटीलकी दिल्याचा उल्लेख :
"बकाजी फर्जंद साहेबाचा कदीम इतवारी फर्जंद याच्या बापाने साहेबाचेये कस्तमशागत केली आहे व बकाजीही साहेबकामावरील कस्तमशागत बहुत करीतो याकरिता साहेब यावरील मेहेरबान आहेती. मेहेरबानीने बक्षीसही पावतो. याउपरी बहुतच मेहेरबानीने साहेबाच्या मनी जाले की यास यक काम करून द्यावे म्हणून त्यावरून मौजे खांबगाव बु.। ता.। का.। मावळ येथील पाटीलकी.. बकाजी फर्जद यास वतन महरमत केले असे. पाटीलकीचे काम घेत जाणे. पाटीलकीचा महजर बकाजीस करून देणे..'' सप्टेंबर १६७५ ची छत्रपती शिवाजीमहाराजांची मुद्रा असलेली दोन पत्रे पाहावयास मिळतात...
: इतिहासाचार्य वि.का. राजवाडे.
――――――――――――
@sachinpokharkar_
No comments:
Post a Comment