विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 25 September 2024

इंदूर होळकरशाही घराण्यातल्या, श्रीमंत गौतमाबाई राणीसाहेब होळकर..

 १९ व्या शतकात रेखाटलेलं चित्र इंदूर होळकर महाराजांचा राजवाडा..🚩


इंदूर होळकरशाही घराण्यातल्या, श्रीमंत गौतमाबाई राणीसाहेब होळकर...🙏🚩

तळोद्याचे जहागीरदार श्रीमंत भोजराज बाबा बारगळ यांची कन्या गौतमाबाई यांचे नाव प्रकाशाजवळ असलेल्या गौतमेश्वर ऋषींच्या नावावरून ठेवण्यात आलेले असल्याची माहिती श्रीमंत अमरजीतराजे बारगळ यांचेकडुन तळोदे मुक्कामी ऐकायला मिळाली होती. मोहिनीबाई आणि भोजराज बारगळ यांना नारायणराव नावाचे जेष्ठ चिरंजीव होते त्यांनी तळोदे जवळच्या कुंभाचे तीर्थक्षेत्र असलेल्या प्रकाशातील गौतमेश्वर महादेवाला नवस केला आणि नवसाप्रमाणे त्यांना झालेल्या मुलीचे नाव त्यांनी गौतमाबाई असे ठेवले होते. गौतमाबाई आणि मल्हारराव बालपणीचे मित्र आणि पुढे विवाह करुन पतीपत्नी झाले..

गौतमाबाई यांना होळकर रियासतीत खाजगीचा अधिकार मिळाला होता यासाठी त्यांना अंबड आणि कोरेगाव प्रांत मिळाले होते ज्यापासून तीन लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत असे. एकंदरीत गौतमाबाई यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहुन राजघराण्यांचा वारसा चालवला तसेच हाताखालील लोकांना शिस्त लावून प्रसंगी कठोरपणाची भुमिका त्या घेत असे. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे बालपण आणि तरुणपण मामांच्या गावी गेल्याने गौतमाबाई यांना आपल्या पतीच्या स्वभावाची संपूर्ण कल्पना होती गौतमाबाई आणि मल्हारराव महाराज यांनी "होळकर" राज्यात सुख समृद्धी आणुन रयतेला भयमुक्त केले. ओंकारेश्वर आणि उजैन ही दोन प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थ माळव्यातच असल्याने नेहमीच तीर्थकरुची गर्दी असायचे. गौतमाबाई यांनी त्यांच्या खाजगीतील शेकडो एकर जमीनी नागंरुन घेत शेतमळे, फळबागा फुलवल्या तर सुभेदार मल्हारराव महाराज यांनी शेतकऱ्यांना विशेष दर्जा देत शेतीला प्राधान्य देवुन पारंपरिक शेती ऐवजी त्यांनी अफुच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना तयार केले. अफुच्या फुलांचा वापर त्यावेळी मसाल्याच्या पदार्थासाठी होत असे. माळव्यातील अफु बाहेरदेशी विक्री साठी जावु लागल्याने राज्याचा महसूल वाढला तसेच शेतकऱ्यांना चांगले दिवस आले..

खरे तर हे दोघे पतीपत्नी शेती प्रिय व शेतीनिष्ठ शेतकरी होते माळव्याच्या सुभेदारी नंतर ही सुभेदार मल्हारराव होळकर यांनी जुन्नर येथील जमीन मेंढरांना चरण्यासाठी कुरण म्हणून उपयोगात आणली होती पुढे अर्धा वाडा महेश्वर जवळ आणला होता तर गौतमाबाई या आपल्या शेतातील पीक आणि फळभाजासह सर्व फळांचा ऋतुनुसार वापर करीत तसेच विविध सणावाराला राजवाड्यातील सर्वांना विशेष पंगतीत जेवणाचा मान ही मिळत असे..


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...