विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 25 September 2024

धुळ्याचा पाठीराखा “किल्ला लळींग”

 १७ सप्टेंबर १४३७....

इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक बळीवंत दुर्गठाणे कधीचे इथे ठाण मांडून बसलेले


धुळ्याचा पाठीराखा “किल्ला लळींग”...🚩

महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारूकी’ एक मोठे घराणे.. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा किल्ला लळींग...

लळींग हे गावही गडाएवढेच प्राचीन.. या गावातही इतिहासाचे काही धागेदोरे दडलेले आहेत गावातील महादेवाचे मंदिर हेमाडपंती चांगले हजार एक वर्षे प्राचीन पण या मंदिराचा मुखमंडप, सभामंडप सारे पडून गेलेले केवळ गर्भगृहच ते काय शिल्लक पण तरी शिल्लक भिंती त्या वरील कलात्मक कोनाडे, प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे सारे आजही कधीकाळचे वैभव दाखवते...

लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील इसवीसन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली.. इसवीसन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखान कडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीरखानचा लळींग किल्ल्याखालीच पराभव झाला पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता इसवीसन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळींगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू लागला तो १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत होता इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे...

――――――――――――
📷 : पंकज पाटील 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...