विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 25 September 2024

राजे जगदेवराव जाधव यांची समाधी”.

 १९ सप्टेंबर १७०० मध्ये निवर्तले,


राजे जगदेवराव जाधव यांची समाधी”...🙏🚩

वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ.स १५७५ च्या सुमारास संपादन केली मोगल दरबारातून त्यांना बारा हजार फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते या शिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले...

प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरील प्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजे सह नेमले होते कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला मोठे घनघोर युद्ध झाले त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वतः राजे दत्ताजी आणि त्यांचे दोन मुलगे राजे रघोजी आणि राजे यशवंतराव हे धारातीर्थी पतन पावले घरी केवळ पाच वर्षांचा धाकटा मुलगा राजे जगदेवराव एवढाच शिल्लक राहिला ही घटना इ.स १६६५ च्या सुमारास घडली...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...