राजदेहर किल्ला
निकम मराठा सरदार
जळगाव जिल्ह्यात किल्ले नाहीत हा भ्रम राजदेहर व कन्हेरगडासारखे भव्य किल्ले आहेत. देवगिरीच्या मागच्या बाजूला बरेच किल्ले आहेत. वेताळगड, सुतोंडा, वाडीचा किल्ला, जंजाळा घटोत्कच लेणीसोबतचा किल्ला आणि असे अनेक किल्लै आहेत, यावर कोरीव टाक्या आहेत ज्यांना खांबटाके म्हटले जाते, पण बहुतेक ते सर्व विहार असावीत.. त्यापैकी राजदेहर हा एक किल्ला आहे, त्रिवेणी संगमावर असलेल्या उंचवट्यावर वसलेला आहे, दुर्गप्रेमी तिकडे गेले तर बराचसा इतिहास समजू शकतो. अशाच एका साहसी विराच्या व्हिडीओतून मला ही माहिती मिळाली. निकुंभ राजांची राजवट बाराव्या शतकात असली तरी आधीच्या म्हणजे तिसऱ्या शतकातील सेंद्रकांच्या काळात ही किल्ले बांधले असावेत. अनवट वाटेवरचा हा किल्ला महत्त्वाचे असावा. किल्ल्यावर असलेल्या कोरीव लेणीत माती भरली आहे,ती साफसफाई केली तर बराच उजेड पडू शकेल.. म्हणून दुर्गप्रेमींना आवाहन आहे, हा नाशिकजवळचा नसून चाळीसगाव तालुक्यातील आहे. आजुबाजुला असलेल्या डोंगरांगावरही बरेच विखुरलेले अवशेष आहेत.
सातमाळा डोंगराच्या रांगांवर काही मोजकेच किल्ले आहेत. त्यातील राजदेहर हा एक होय. चाळीसगाव तालुक्याच्या एका टोकाला उंचावरील हा किल्ला आज अतिशय जिर्ण अवस्थेत उभा आहे. या किल्ल्याची विशेषतः म्हणजे ज्याला खांब टाके म्हटले जातात. अशा प्रकारच्या कोरीव लेण्या आहेत. कदाचित ही विहार असावीत. रामदेवराय यादव यांची सत्ता मुसलमानी आक्रमण हा पुढे संपली. त्यावेळी त्यांचा मांडलिक राजा निकुंभ याचीही सत्ता लयास गेली. पूर्ण पाटणा शहर उद्ध्वस्त झाले आणि निकुंभाचे अवशेष राहिले नाही अशी नोंद अनेक इतिहासकारांनी केली आहे. परंतु ते योग्य वाटत नाही, पाटणा येथे निकुंभ नांदत होते, तेव्हाच त्यांच्या अधिपत्याखालील राजदेहर किल्ल्यावर एक शाखा गडकरी म्हणून नांदत होते. त्रोटक पुराव्याशिवाय आज काही एक उपलब्ध नाही. यासाठी काही अनुमान निश्चित करणे योग्य ठरेल. देशमुख यांचे आडनाव असलेले निकम हे त्यांचे वंशज आहे. त्यांच्या मधून दिली गेलेली पाटण्याची देशमुखी व पाटणादेवीच्या पूजा पद्धतीत आजही या घराण्याचे स्थान दिसते. यावरून इसवीसन १८१८ पर्यंत हा किल्ला मधला काही काळ सोडला तर त्यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी अखेरची निकरांची झुंज दिली व हा किल्ला पडला. अवघ्या १८० वर्षांपूर्वी वैभवाला असलेला हा किल्ला आजच्या परिस्थितीत निर्णय झाला आहे. राजदेहर गाव किल्ल्याच्या पायथ्याशी राजदेहर गावाचे अवशेष काही प्रमाणात शिल्लक आहेत. पांढऱ्या मातीच्या भिंती व तळे आज दिसते. परंतु ज्याप्रमाणे पांढऱ्या मातीची वाहतूक होते आहे हे लक्षात घेतले तर काही दिवसात काही शिल्लक राहणार नाही. हे एक संपन्न नगर असावे असे दिसते. बाजारपेठही असावी. श्रावण तळे राजदेहर गावाला लागून एक कृत्रिम तळे तयार केले होते, त्याला श्रावणतळे असे नाव आहे. आजही फक्त तेथे एक डबके शिल्लक आहे. त्याकाळी एक महादेवाचे मंदिर आहे व त्या मंदिरावर एक छोटासा शिलालेख ही आहे. अद्याप तो वाचला गेला नाही. व त्याचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. मूळ मंदिर शिल्लक नाही नंतर बांधलेले मंदिर आहे. मंदिरा बाहेर भग्न शिवपिंडी पडलेल्या आहेत.
डोंगराच्या दुहेरी रांगेतील एका प्रचंड उंच सुळ्यावर किल्ला बांधण्याचे योजना कौशल्य पाहिले म्हणजे स्तिमित व्हायला होते. एका बाजू शिवाय संपूर्ण नैसर्गिक अभेद्य अशी संरक्षण असलेली जागा निवडली आहे. संरक्षणाबाबतीत दर्शनी वरून देवगिरीची आठवण येते. किल्ल्याच्या एका बुरुजावर उभे राहिल्यास संपूर्ण परिसर दिसतो. इतका तो सुळका पुढे आहे जिथून चढून जाण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत. अशा तीन-चार भिंतीपूर्वेकडील बाजूस आहेत. मंदिराचे अवशेष एका घळइतून वर किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. तो मार्ग किल्ल्याच्या दोन भागांमधून आहे. पश्चिमेकडील भागास लहान किल्ला म्हणतात. यात लहान किल्ल्याच्या एका कपारीत एक लेणी वजा जागा आहे. ती कदाचित बौद्ध लेणी असावी असा कयास आहे. पण आज तिला टेहेळी चावडी म्हणतात. तिच्या ओट्यावर बसले की संपूर्ण राजतदेहर परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. त्याच्याजवळ किल्ला मुख्य दरवाजा असावा. त्या दरवाज्याच्या तोंडावर एका भगव्या मंदिराचा पाया तेवढा शिल्लक आहे, व दोन सिंह व्याल असलेले नक्षीदार तुटलेले खांबही आहेत. जवळ पडलेल्या किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी त्या देवतेची दर्शन घेण्याची प्रथा असावी. खालून या गावात मंदिराचा कळस स्पष्ट दिसत असावा. या मंदिराच्या जवळ छोटीशी पायरी आहे व तिथून किल्ला सुरू होत असावा.
आत वर जाण्यास दगडाच्या कोरलेल्या छोट्या दोन पायऱ्या शिवाय दुसरा मार्ग नाही. समजा एखादा सैनिक त्या पायऱ्या चढून आत वर चढण्याचा प्रयत्न केला तर वरच्या माणसास तो दिसणार व वरून तो त्याला सहज हाणून पडू शकतो अशी व्यवस्था आहे. अशा छोट्याशा पायऱ्या पूर्वेस पातळ दरीच्या बाजूने आहे व त्या दाखवल्याशिवाय कल्पना येत नाही. वर उंचीवर सपाट असे मैदान तोच किल्ल्याचा मुख्य भाग असावा. तिथे काही इमारतीचे अवशेषही दिसतात. त्याची ही उंची दोन विभागात विभागली गेली आहे. तरी च्या बाजूस उत्तरेस प्रचंड खडक आहे. आणि या खडकात खांब रोवण्यासाठी खोल खड्डे केलेले आहेत. त्याचा अर्थ तिथे कदाचित इमारत असावी.याच खडकावर एक पिंड आणि त्यामध्ये पादुका कोरलेले आहेत . पलीकडे चौथर्यावर शिल्प असलेला भगरा असा नंदी ही आहे
यानंतर म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा तीन-चार उंचीचा दगडी बांधकामाचा उभा आहे. काही शिल्प कोरलेले दगडही पडलेले दिसतात. किल्ल्याच्या कोणत्याही टोकास उभे रहिले तर बाजूचा परिसर खोलपर्यंत स्पष्ट दिसतो् पूर्वेकडील वाटेने पलीकडे असलेल्या प्राचीन महादेव मंदिरात जाण्यासाठी एक अवघड वाट आहे. त्या वाटेस आढाई शिंडी असे म्हणतात.
किल्ल्यावर मंदिराची दीपमाळ दिसते. या दीपमाळेचा उपयोग किल्ल्यावर इशारा देण्यासाठी केला जात असे सांगतात. कारण देवगिरी वरील सपाटीचा प्रवेश या मंदिरातून दिसतो. मंदिर आणि किल्ला याच्यामध्ये एक प्रचंड दरी आहे आणि तिला गाव दर्शन गाव आहे तर बाजूला दुसरी दरी आहे तिला पातळ तरी असे नाव आहे. किल्ल्याच्या पूर्वेस असलेल्या दरीस भवानी तरी असे म्हणतात. ही दरी म्हणजे एक प्रचंड मोठा दगडाचा कडा आहे. या दिशेला पाटणादेवीचे मंदिर आहे. या कड्यावर मध्यंतरी एक भुयार आहे त्यात किती खोल आहे हे सांगता येत नाही. परंतु हे भुयार पाटणादेवी जवळ निघते अशी आख्यायिका आहे.
आज मात्र हे भुयार बुजले गेल्यामुळे काही लोक त्याला भवानी मंदिर असेही म्हणतात. संरक्षणाच्या दृष्टीने अभेद असलेल्या या नैसर्गिक संरक्षित किल्ल्यात पाण्यासाठी गाव कृत्रिमतेने पाणी साठवावे यासाठी पश्चिमेस तीन व पूर्वेला दोन वर एक असे टाके तयार केलेले दिसतात.
आज फक्त एवढेच पाणी आहे काही संरक्षण भिंती व भग्न दगडे अवशेष याखेरीस काहीच नाही. हे त्या काळाच्या ओघात नष्ट होईल हे बघणं अवशेष खिन्न नजरेत तेथे बागडणाऱ्या गुराखा कडे पाहिले पहात उभे आहेत. ही मंडळी दूर या मंदिरावरील ज्या खांब टाक्या आहेत त्या कदाचित गाळ भरून गेलेल्या असाव्या. त्या लेणी असाव्यात आता लेणींची तुलना भामेर किल्ल्यावरील लेणी आणि जळगाव जिल्ह्यातील विजयगड किंवा चोपडा तालुक्यातील किल्ल्यावरील करता येतील त्या टाक्यांची तर त्याच प्रकारचे साम्य दिसते.
संदर्भ:राजदेहर किल्ला, बळवंतराव देशमुख
@ सरला भिरूड
पिंपळगाव, रघुनंदन, २०१२
No comments:
Post a Comment