विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 January 2025

चिंचोडी पाटील (अहमदनगर )


 चिंचोडी पाटील (अहमदनगर )

अहिल्यानगर ( अहमदनगर ) — बिड महामार्गावर २९ किलोमिटरवर चिंचोंडी पाटील हे गाव आहे . ते मेहेकरी नदीच्या उजव्या तिरावर आहे . चिंचोंडी पाटील हे पुर्वी ८४ देवालयांचे गाव होते . त्यापैकी एक चौंडकेश्वर नावाच अत्यंत सुरेख , आखीव रेखीव वास्तुकलेचा अप्रतीम नमुना असणारे शिवालय होते . या शिवालयाच्या लोकप्रियते मुळे , या गावाच नाव चौंडकेश्वर पडले . पुढे चौंडकेश्वरचा अपभ्रंश होऊन चिंचोंडी नाव पडले .
इथ १३ व्या शतका मध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचे वास्तव्य होते . या अगोदरच्या शतकापुर्वी येथील समाज हा सुर्य पुजक किंवा सुर्यपंथी असावा . कारण पुर्वी इथे सुर्य म्हणजेच आदित्य मंदीर होते .
चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथीय साहीत्या मधे चौंडकेश्वर मंदीराचा उल्लेख येत नाही . त्यावरून १३ व्या शतका पुर्वीच हे मंदीर परकीय आक्रमणामध्ये उध्वस्त झाले असावे .अहिल्यानगरच्या (अहमदनगरच्या) निजामशहाने भुईकोट किल्ल्याच्या बांधकामासाठी सदरील मंदीराचा नाश केला नसावा . कारण १५५९ ते १५६३ दरम्यान नगरच्या भुइकोट किल्ल्याची निर्मीती करतांना त्याच खंदकातील काळ्या पाषाणाचा वापर केला असल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत . परंतू अहमदशहाने चौंडकेश्वराच्या दगडांनी किल्ल्याचे बांधकाम केल्याचा लोकप्रवाद आहे . पण तो इतिहासाशी सुसंगत वाटत नाही . निजामशहाची सहिष्णू वृत्ती पाहता , तो सुंदर शिवालय पाडून किल्ला बांधण्याची शक्यता वाटत नाही .
सतराव्या शतकामधे शिवजन्मापुर्वीच सन १६१७ मधे श्री संत गणेशनाथ बाबा या नाथपंथीय संताचा जन्म इथ झाला .
शिवकाळात , महादजी पाटील जगताप हे इथे वतनावर आले .महादजींनी शौर्य , कर्तबगारी करत मोठा पराक्रम गाजवला . म्हणून महादजींना वतन म्हणून चिंचोंडी हे गाव वतन मिळाले . महादजी पाटील जगताप , हे मुळचे पुण्या कडील सासवडचे देशमुख घराण्यापैकी होत . चिंचोंडी गावाला पुढे
' महादजी पाटलांची चिंचोंडी '
अस लोक म्हणू लागले . याच नावाच रूपांतर नंतर
' चिंचोंडी पाटील ' असे झाले .
महादजी जगताप पाटील यांनी चिंचोंडी गावच्या पठारावर ३६ गुंठे क्षेत्रावर चार बुरूज असलेला मोठा वाडा बांधला . या वाड्याच्या भिंती १० फुट रूंद होत्या . या वास्तूचे वैशिष्य असे की , वाड्याच्या दारात ओट्यावर उभे राहीले की , संपुर्ण गाव एका नजरेच्या टप्प्यात येई .
वाड्यातील पाकशाळा मोठी होती . राबता मोठा असे . अन्न शिजवण्यासाठी धान्य रोज मोठ्या दगडी जात्यावर दळले जाई . जात ओढण्यासाठी बैलांचा वापर केला जात असे . आजही या जात्याचे अवशेष पाहावयास मिळतात . या वाड्यात धाण्य्याचे चार कोठारे आहेत . वाड्याच्या तटावर व संरक्षक भिंतीवर जंग्या आहेत .आजही गढीची अवस्था मजबूत आहे . या गावाला पुर्वी तटबंदी होती या तटबंदीचे अवशेष सध्याच्या ' न्यू इंग्लीश स्कूल ' शाळेच्या मैदानावर दिसतात . या तटबंदीला सहा वेशी होत्या . या सहा वेशीतूनच गावात प्रवेश असायचा . वेशीवर एक जागल्या वेसकर पहारेकरी असायचा . अनोळखी कोणी वेशीवर आले तर , पहारेकरी त्या इसमास प्रथम वाड्यावर घेऊन जायचा .नंतर त्याची विचारपुस केली जाऊन त्यास जेवन दिले जात असे .
सोळाव्या शतकामधे उत्तर निजामशाही काळात महदवी पंथाचा पुरस्कर्ता जमालखान याचा संबंध येतो . त्याची कबर इथ दायरा परीसरात आहे .
जमालखान हा उत्तर निजामशाहीतील प्रबळ किंगमेकर होता . यानेच इस्माईल निजामशहास राजगादी मिळवून दिली होती . ७ मे १५९१ मधे दुसर्या बुर्हाण निजामशहाने , सम्राट अकबराच्या पाठींब्याच्या जोरावर , अहमदनगरच्या निजामशाहीची गादी मिळवण्यासाठी अहमदनगरवर आक्रमण केले .यावेळी जमालखान व खुदावंतखानाने निजामशाही वाचवण्यासाठी जिवावर उदार होऊन वर्हाड प्रांतात तुंबळ युध्ध केले . या युध्धात जमालखानच्या कपाळात गोळी लागून तो ठार झाला . दुसर्या बुर्हाण निजामशहाच्या एका शिपायाने जमालखानला ओळखले . त्याने जमालखानचे शिर कापून , दुसर्या बुर्हाण निजामशहाच्या समोर पेश केले .
या नंतर जमालखानाच्या हितचिंतकाने जमालखानाचे उर्वरीत शव चिंचोंडी पाटील येथे हलवले .तिथे जमालखानाची कबर सन १५९१ मधे बांधण्यात आली .
अॅनीमल फाॅरेस्ट अॅडमिनीस्ट्रेशन रिपोर्ट नुसार ५९६ .१० एकर गुंठे क्षेत्र कुरण होते . इथून गवत कापून विकले जायचे . त्यातुन ९५४ रू . महसूल मिळत होता . सन १८८८ - ९० मधे बाँबे राज्य वनविभागाच्या वार्षीक प्रशासन अहवालातील नोंदी नुसार , अहमदनगर विभागात ४५५ . ३२ क्षेत्रावरून २०९२ रू . किमतीचे हाताने कापलेले गवत विकले गेल्याची नोंद आहे .
. पुर्वी इथ अनेक फळझाडे मोठ्या प्रमाणावर होती . त्यात आंबे , चिंच या वृक्षांचे प्रमाण मोठे होते . कल्याणकारी विविध उपाय योजनांमुळे हा भाग समृध्ध झाला . इथ पुढे१९४६ ते ५० या काळात विवीध सेवा सहकारी सोसायटी स्थापन झाल्या . या तेलघाणा , चर्मकार , सुतार , धातुकाम , शिंपी , विटा इत्यादी व्यवसायांशी संबंधीत होत्या . तसेच सहकारी सोसायटीची गोदामे या गावात बांधण्यात आली .
या मंदीरांच्या गावात बालाजी , भैरवनाथ , गणेश , महादेव , दत्त , खंडोबा , म्हसोबा , मोहटादेवी , राम मंदीर , अहिल्या मंदीर , सावता महाराज , चौंडकेश्वर , इत्यादी जुन्या नव्या वास्तू कलेचा संगम असलेले मंदीरे होती .
चिंचोंडी पाटील गावात गेल्यानंतर ही सर्व ठिकाणे दाखवण्यासाठी संजय ठोंबरे यांनी सहकार्य केले
साभार प्रा. नवनाथ वाव्हळ
इतिहास संशोधक

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...