विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 January 2025

सरदार सिदोजी डुबल-इनामदार"

 



सरदार सिदोजी डुबल-इनामदार" यांची समाधी व त्यांच्या पत्नी यांची सतीशीळा वसंतगडावर सापडली....

💐🙏🏻🙏🏻🚩🚩
आमचे पूर्वज "सरदार बाळोजी साळोखे-डुबल" यांचे धाकले बंधू सिदोजी उर्फ सिदबा डुबल (दुसरे) यांनी स्वतः मोडी लिपीत लिहिलेली 60 फुटी डुबल करीना आम्हाला सापडली, या ऐतिहासिक डुबल करीना (दस्तऐवज) मधून ई. स. 1570 पासूनच्या, बिदरची बहामणी राजवट, मोघलशाही, औरंगजेब, आदिलशाही, निजामशाही, मराठेशाही (शिवशाही) अशा बऱ्याच राजवटींचा काळ या "डुबल करिनामधून" समोर आला आहे.... 🙏🏻🙏🏻🚩🚩
दस्तऐवजच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती समोर येत आहे. आमच्याकडील जुन्या मोडीतील कागदपत्रा वरून आम्हाला माहिती होती की, "सिदोजी डुबल (दुसरे)" हे उंब्रजच्या लढाईत धारातीर्थ पडले, व "छत्रपती शाहू महाराजांनी" चरेगाव इनाम त्यांच्या या वीरमरण व मराठा स्वराज्यसाठी केलेल्या पराक्रमासाठी म्हणून दिले होते, त्याचे पत्र आमच्याकडे आहे.
पण "सिदोजी डुबल (दुसरे)" हे नेमके कुणाविरुद्ध युद्ध लढताना मरण पावले आणि त्यांची समाधी कुठे आहे हे काय समजत नव्हते....पण जसं जसं "डुबल करीना" वाचन व त्याचे मराठी रूपांतर व अभ्यास करत करत पुढे चाललोय, तशी तशी नवीन बरीचशी माहिती समोर येत आहे.
हा काळ आहे मोगलशाही जेव्हा कराड प्रांतावर आली. करीनामध्ये मिळालेल्या माहितीनुसार 1661 ला "छत्रपती शिवाजी महाराजांनी" कराड प्रांत हा स्वराज्यात आणला व त्याचवेळी "शिवाजी डुबल (दुसरे)" यांना "छत्रपती शिवाजी महाराजांनी" 9 चावर जमीन इनाम दिली.1700 सालापर्यंत कराड प्रांत मराठेशाहित होता. यानंतर 1700 ते 1717 पर्यंत कराड प्रांत हा मुघलांच्या (औरंगजेब) ताब्यात राहिला, त्याच काळात डुबल घराण्यातील व्यक्तींवर स्वतःची इनाम वाढे सोडून जाण्याची वेळ आली.
मच्छिंद्रगड, सदाशिवगड व कराड प्रांत जरी मुघलांकडे गेला असला, तरी वसंतगड मात्र मराठ्यांनी 1707 ला परत स्वराज्यात आणला होता, व त्याचे किल्लेदार कृष्णाजी पंत प्रतिनिधी होते. गडावर कृष्णाजीपंतांनी बाळोजी डुबल, शिदोजी डुबल यांना गडाची असामी व राहायला वाडा दिला बराच काळ डुबल मंडळी ही गडावरच राहत होती. इथूनच मुगल प्रांतावर बाळोजी डुबल व शिदोजी डुबल स्वाऱ्या करू लागले. स्वरूप जी यादव देशमुख हे मुघलांना शामिल झाले होते. डुबलांचं कराडचे ठाणे व उंब्रज ठाणे हे स्वरूपजीने काढून स्वतःकडे घेतले होते.
असाच एक प्रसंग उंब्रज मध्ये घडला मराठा फौज घेऊन बाळोजी डुबल व शिदोजी डुबल यांनी उंब्रज वर चाल केली, त्याच वेळी स्वरूपजी यादव मुगल फौज घेऊन मराठा फौजेवर चालून आला. याच युद्धात शिदोजी डुबल धारातिर्थी पडले, गणीमाने त्यांचा शिरकाप केला.
करीना मिळालेल्या माहितीनुसार शिदोजींचे शीर घेऊन सैन्य वसंतगडावर परतले, तेव्हा त्यांची पत्नी शीर बरोबर घेऊन वसंतगडावर सती गेल्या. या केलेल्या पराक्रमाबद्दल व स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदाना बद्दल "छत्रपती शाहू महाराजांनी चरेगाव हे गाव इनाम म्हणून दिले".
या शूर इतिहासाचा दस्तावेज वाचताना फार अभिमान वाटतो.... 🙏🏻🙏🏻🚩🚩
साभार रणजित डूबल

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...