क्रूरकर्मा औरंगजेब :
भाग १
सर जदुनाथ सरकार लिखित "A Short History Of Aurangzib" या पुस्तकाचा डॉ.भ. ग. कुंटे यांनी केलेले भाषांतर काल वाचायला घेऊन बसलो आणि जवळजवळ १२० पानं वाचून काढली. त्याचेच केलेले हे संकलन 

प्रस्तुत लेखनमलिका ही काही औरंगजेबाचे महिमामंडण करण्याच्या हेतूने नव्हे तर औरंगजेब नावाची जी विखारी प्रवृत्ती आणि तिच्या हातात असताना भारताची झाली कुस्थिती यांचे केलेले अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
मी काही स्वतः इतिहासकार वगैरे नाही आणि मी तसा काही दावा ही करीत नाही परंतु वकील असल्याकारणाने पुरावे शोधून काढण्याचे आणि त्यातून सत्य जाणून घेण्याचे कसब नक्कीच अंगी आहे. आपल्या महाराजांना त्रास देणारा कोण हा औरंगजेब प्रश्न नेहमीच मनात काट्यासारखा सलत असे आणि आज त्याचे उत्तर शोधण्याचा मानस मनात धरून प्रस्तुत अधिष्ठानाचा प्रारंभ करीत आहे.
KEEP YOUR FRIENDS CLOSE, ENEMIES CLOSER असं म्हणतात तर त्याचाच हा केलेला प्रपंच. एखाद्या व्यक्तीला वैचारिक रणभूमीवर वर मात द्यायची असेल तर त्याची विचारसरणी समजून घेणं क्रमप्राप्त होऊन जात. आत्तापर्यंत सदर पुस्तकात जे वाचण्यात आले ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. माहिती जशी वाचण्यात आली आणि जी मला उमगली ती तशीच आपल्यासमोर ठेवीत आहे. प्रस्तुत मालिकेतील सर्व लिखाण PDF मध्ये उपलब्ध आहेत have असल्यास कळवावे, आपणास पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
पहिल्या ५० ६० पानांवर औरंगजेब कोण होता , कसा होता , मुघल कालीन व्यवस्था कशी होती , त्याचे विचार , त्याचा धर्मांधपणा अश्या गोष्टींचे वर्णन आहे आणि यानंतर त्याच्या जन्मापासून किंवा जन्माआधीच्या घडामोडी पासून पुस्तक चालू होते. औरंगजेब जसा होता , तो तसा का होता? तो तसाच होता आधीपासून की त्यामध्ये ह्या गोष्टी वयानुरूप वाढत गेल्या यांची समीक्षा करण्यासाठी म्हणून हे पुस्तक वाचतो आहे.
औरंगजेबाचा बाप म्हणजे शहाजहान , या शहाजहान ने त्याच्या बापा विरोधात म्हणजे जहांगीर ज्याचे लोकप्रिय नाव सलीम, याच्याबरोबर मुघल राजसिंहासनावर आधिपत्यासाठी बंड केले. वेळ इतकी वाईट होती की स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शहाजहान ला , त्याचा ६ वर्षांचा मुलगा आणि औरंगजेब याचा मोठा भाऊ, दारा शुकोह आणि औरंगजेबाला त्याच्याच बापाकडे म्हणजे जहांगीर कडे ओलीस ठेवावे लागले. वयाच्या ३ऱ्या वर्षापासून औरंगजेबाला कळून चुकले होते की आपल्याला राज्यकारभार हस्तगत करायचा असेल तर आपल्याला जे आपल्या खानदानातले आजवर जे करत आले तेच करावे लागेल ती म्हणजे बापाची आणि भावाची राजकीय स्वार्थासाठी हत्या.
औरंगजेब शहाजहान चा सहावा मुलगा होता आणि त्याला ही गोष्ट खचितच माहिती होती की आपल्याला राज्यकारभाराची संधी चालून तर येणार नव्हती. विचार करा, औरंगजेब वयाच्या १३व्या वर्षी बुंदेला ओच्छच बुंदेला राजा विरसिंग देव याच्याशी तिथे त्याने त्याचे पहिले युद्ध लढले आहे. याच युद्धानंतर वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्याने स्वतः ओरच्छा येथील वीरिंसगाच उत्तुंग देवालय जमीनदोस्त करण्याचे फर्मान दिले आणि त्या जागेवर एक मशीद उभी करण्यात आली.विचार करा औरंगजेबाचे वय वर्ष फक्त १७ आहे आणि तरीही धर्माबद्दल किती ती कट्टरता. पुढे राजा विरसिंग देव याचा मुलगा, झुजहारसिंह याच्याशी त्याचा संघर्ष झाला. २ आक्टोबर १६३५ रोजी ओर्छाजवळील एका टेकडीवर देवीसिंगाच्या लोकांनी हल्ला केला आणि ४ तारखेला खुद्द ओर्च्छा मोगलांनी काबीज केले. झुजहार नाउमेद झाला आणि त्याने घामुनीला आणि तेथून नर्मदा ओलांडून चौरागड येथे पलायन केले. मोगलांनी १८ आक्टोबरला घामुनी काबीज केले आणि झुजहारचा देवगड आणि चांदा या गोंडांच्या मुलुखांतून पाठलाग केला. झुजहारचे अतिशय हाल झाले आणि प्रत्येक पावलागणिक त्याला आपले सामानसुमान आणि माणसे यांना सोडून द्यावे लागले. सरतेशेवटी एका घनदाट जंगलात निद्रिस्त झालेल्या या परागंदा राजपुत्रांना गोंडांनी गाठले आणि त्यांचा वध केला. जोहारांतून राहिलेल्या त्यांच्या स्त्रिया आणि मुले यांना मोगल जनान्यांत खेचण्यात आले. दुसरा एक मुलगा आणि एक मंत्री यांनी मुसलमान होण्याचे नाकारल्यामुळे त्यांचा क्रूरपणे वध केला. वयाच्या सतराव्या वर्षी तो हे सर्व करीत होता हे विचार करूनच अंगावर काटा येतो.
औरंगजेब हा कधीच धर्माच्या विषयात तडजोड करणारा इसम नव्हता. त्याने जणू काही त्याचा स्वतःचा इस्लाम जो मूळ इस्लाम ला धरुनच पण त्याहून जास्त कट्टर असा प्रपंच त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या ठिकाणावर राबविणे प्रारंभ केले.
औरंगजेबाला जिथे जिथे पाठवण्यात आले तिथे तिथे त्याने मुघली जरब बसविण्यासाठी आणि तो भक्कम करण्यासाठी आवश्यक अश्या गोष्टी मात्र केल्या. जिझिया तर सर्व इस्लामेतर धर्मासाठी होताच, तो औरंगजेबाने अधिक तीव्र केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० चा, आणि औरगजेबाची पहिली दख्खन सुभेदारी ही १६३६ ची म्हणजे महाराज केवळ ६ वर्षांचे असताना औरंगजेब दक्षिण सुभ्यावर आला. एकटा आला नाही तर दस्तुरखुद्द शहाजहान त्याच्या वयक्तिक ५०००० सैन्यानिशी युवराज औरंगजेबासोबत दक्षिणेत दाखल झाला.१६२७ मध्ये अहमदनगर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या मलिक अंबर चा मृत्यू झाला. त्याच्या पाठोपाठ ही मोहीम आखली गेली. गुजरातेतून सातपुडा मार्गे खान्देश प्रवेश करून पुढे ही दोघे दौलताबाद , अहमदनगर , औसा , धारूर , उदगीर , कंधार इत्यादी सर्व काबीज केले आणि दौलताबाद शेजारी खडकी हे नवे ठाणे प्रस्थापित केले. फारसी मध्ये दक्षिण ला दख्खन तर अरबी मध्ये दक्षिण दिशेला असणाऱ्या द्वाराला ' खिडकी ' म्हणतात , आणि मुघल साम्राज्याचे दक्षिण द्वार म्हणून स्थापन झालेल्या या नवीन शहराला खुद्द शहाजहान याने त्याचा पुत्र आणि दख्खन चा ३५ हजारी सुभेदार औरंगजेब याच्या नावावरून "औरंगाबाद" असे नाव दिले. १६३६ ते १६४४ असा ८ वर्षांचा काळ औरंगजेबाने दख्खन चा सुभेदार म्हणून त्याच्या पहिल्या. सुभेदारी मध्ये पाहिला. पहिली सुभेदारी म्हणण्याचे कारण म्हणजे यानंतर १६५२ मध्ये तो परत एकदा दक्षिण सुभ्यावर आला होता पण ती कथा पुढे.
या काळात शहाजी महाराज जे तेव्हा विजापुरी सरदार होते त्यांनी कित्येक वेळा अहमदनगर मोगलांकडून परत घेतले तिथे नवीन निजामाची नियुक्ती केली. परत औरंगजेब अहमदनगर काबीज करत असे आणि मग परत थोरले महाराज अहमदनगर काबीज करून नवीन कोणालातरी निजाम म्हणून बसवायचे. हे असेच काही काळ चालू राहिले सरतेशेवटी विजापूरच्या आदिलशहाने मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि शहाजी महाराजांनी नामधारी निजामशहाला मोगलांच्या हवाली करू त्याची शाही संपवली. त्याच्यासोबत मोगलांना एकूण सात किल्ले आणि पुण्याजवळील थोडी जाहगिर सोडून महाराष्ट्रातील इतर सर्व मुलुख मोगलांच्या ताब्यात दिला. राहिलेली ही जहगिर त्यांनी विजापूर चा मांडलीक म्हणून आपल्याकडे ठेवण्याचे कबूल केले.
यावरून हे लक्षात येते की एक वैरी म्हणून, औरंगजेबाने महाराजांच्या 5 पिढ्यांशी लढा दिलेला आहे. अश्या विरोधी माणसाचा अभ्यास करावाच लागेल ना..!?
क्रमशः
ॲड.वेदांत विनायक कुलकर्णी
पुणे , जानेवारी 2025
No comments:
Post a Comment