शहाजी राजांचे वडील (मालोजीराजे भोसले) हे त्यांच्या लहानपणीच युद्धात मरण पावले. पुढे शहाजी राजांनी आपल्या काकांच्या अनुसरणाखाली निजामशाह ची सुभेदारी पत्करली. पुढे त्यांचा विवाह जिजाबाईसाहेबांसह झाला. जिजाबाईसाहेब ह्यांना स्वराज्य स्थापने ची उत्कट इच्छा होती. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्या नंतर त्यांच्या लहानपणी शहाजी महाराजांनी कमजोर झालेल्या निजामशाहीत शेवटल्या उत्तराधिकारी "मूर्तिजा निजामशाहास" मांडी वर घेऊन निजामशाही चालवायचा प्रयत्न केला, पण मोंगल आणि आदिलशाही च्या कचाट्यात सापडून तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 30 December 2025
#शिवाजीमहाराज
पुढे शहाजीराजांनी आदिलशाहीत सरदारी घेतली व त्यांना सध्याचे बेंगलोर ह्या सुभ्याचे नेतृत्व मिळाले. तेथे देखील शहाजीराजांची छाप एक स्वतंत्र राजासारखीच होती. जेव्हा ह्या गोष्टी आदिलशहा परंत पोचल्या, तेव्हा त्यांनी दगाफटका करून मुस्तफाखान, बाजी घोरपडे आणि अफजलखान ह्या सरदारांद्वारे शहाजीराजांना कैद केले आणि तसेच विजापुरास आणले.
पण शिवाजी राजांच्या अत्यंत चतुर आणि मुत्सद्दी डावपेचांमुळे, आदिलशाहला शहाजीराजांना स-सम्मान बहाल करावे लागले.
मला असं वाटत कि शिवाजी राजांचे गुण त्यांच्या शहाजी राजांनी लहानपणीच ओळखून त्या आईलेकांना पुण्यात ठेवले जेथे, शिवाजी राजांनी आईसाहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम असे "नेटवर्क" तयार केले. त्याभागातल्या सर्व मराठा लोकांना एकत्रित, संगठीत केले. शिवाजीराजांचे त्यावेळी वय लहान असल्यामुळे व ते आदिलशाहीत सरदार नसल्यामुळे, कोणीही त्यांच्यावर सतत पाळत ठेऊन न्हवते, व जोवर आदिलशहाची नजर शिवाजीराजांपर्यंत गेली, तोवर शिवाजीराजे शहाच्या कल्पनेहूनही १० पट पुढे गेले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...

No comments:
Post a Comment