विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

'सरसेनापती धनाजी जाधव' यांचे वडील शंभूसिंह जाधव

 


'सरसेनापती धनाजी जाधव' यांचे वडील शंभूसिंह जाधव
महाराष्ट्राचे थोर सेनापती धनाजी जाधव यांचे स्वराज्य घडण मध्ये अतिशय मोलाचे बलिदान आहे . संताजी घोरपडे नंतर औरंग्यास तोंड द्यायला मराठ्यांना धनाजी सारखा मोहरा मिळणे हि मोठी बाब . धनाजी जाधव हे जिजाबाईंचे खूप जवळचे नातलग. जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे तीन मुलगे जेंव्हा निजामास भेटायला गेले तेंव्हा त्यांचा खून झाला . त्यात अचलोजी जाधव म्हणजे (लखुजी जाधव यांचा मुलगा) संताजी यास जिजाबाई नि स्वतःकडे आणले . त्यास वाढवले . हत्तीस काबूत आणण्यासाठी तो प्रसिद्द होते. त्यांचा मुलगा शंभू सिंग जाधव . याच शंभूसिंघ जाधव यांचा मुलगा म्हणजे धनाजी जाधव . शंभूसिंघ जाधव हे पावनखिंडी च्या युद्धात ३०० सैनिकासहित मरण पावले . महाराष्ट्राला तेथे बाजीप्रभू देशपांडेचे बलिदान लक्षात आहे पण त्याचवेळी शंभूसिंघ च बलिदान विसरतो .
१७०५ मध्ये धनाजी जाधव यांनी केलेली गुजरातची आक्रमण ला मराठी इतिहासात उल्लेख नाही .४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने रतनपूरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.या युद्धानंतर मराठ्यांना गुजरातचे दार मोकळे झाले.इ.स.१७०१ पासून १७०५ च्या अखेरपर्यंत औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम हा गुजरातचा सुभेदार होता.गुजरातेहून आपली बदली करण्यात यावी अशी त्याने औरंगजेबाला विनंती केली.त्याप्रमाणे औरंगजेबाने काश्मीरचा सुभेदार इब्राहीमखान याची गुजरातेवर नेमणूक केली.तो येऊन रुजू होण्यास अवकाश असल्याने शहजादा आझम याने सुभेदार पदाचा ताबा गुजरातचा दिवाण अब्दुल हमीदखान यास देऊन यावे अशी औरंगजेबाने आज्ञा केली.त्यानुसार शहजादा आझम याने २५ नोव्हेंबर १७०५ रोजी अहमदाबाद सोडले.त्याच्या जागी ख्वाजा अब्दुलहमीदखान हा गुजरातचा हंगामी सुभेदार म्हणून काम पाहू लागलायाच काळात धनाजी ने गुजरातेत स्वारी केली . .पण अली महंमद याने १७६१ मध्ये फारसी भाषेत गुजरातचा इतिहास लिहिला.या ग्रंथाचे नावं मिराते अहमदी असे आहे. त्याचा हा फारसी ग्रंथ मुद्रित झाला असून त्याचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे.या ग्रंथात रतनपूरच्या लढाईचे वर्णन दिले आहे.[1]
धनाजी कदाचित मधुमेह असावा कारण पायाच्या असाध्य व्रण ( गॅन्गरीन ) झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे रियासतकार म्हणतात.
धनाजी जाधवरावांच्या पुढच्या 2 पिढ्या निजामाकडून लढल्या. त्यांच्या नातवाचाही (रामचंद्र जाधव) माधवराव पेशव्यांनी राक्षसभुवन मोहिमेत पराभव केला आणि दौलताबादेत कैदेत टाकले.
तळटीपा

जाधव आडनावाचा इतिहास

 

जाधव आडनावाचा इतिहास
महाराष्ट्रात आठव्या शतकापासून यादवांचे राज्य होते. हे यादव श्रीकृष्णाचा भाऊ बलराम यांचे वंशज होते. बलरामाच्या वंशातील दृढप्रहार हा या वंशाचा मूळ पुरुष होता. या वंशातील सेऊणचंद्र यादवाने महाराष्ट्रात साम्राज्य स्थापन केले.त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बलराम या व्यक्तिमत्त्वाला खूप मोठे आदरस्थान होते. बलरामाची प्रतिमा ही नेहमी खांद्यावर नांगर घेतलेली दाखवली जाते - यावरूनच समजून येते की भारतातील शेतकऱ्यांमध्ये बलरामाला दैवताचे स्थान होते. उत्तर भारतामध्ये शेतकर्यांमध्ये बलराम हे नाव प्रचलित आहे. उदाहरणार्थ बलराम जाखड हे शेतकरी कुटुंबातील होते. एकेकाळी केंद्रीय कृषिमंत्री होते. महाराष्ट्रात हेच नाव 'बळीराम' असे ठेवले जात असे. बलरामाला शेतकरी कुटुंबांत आदराने बळीराजा असे म्हटले जात असे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या काही चाकरांनी - ब्रिटिशांच्या फायद्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी राक्षस राजा बलि हाच शेतकऱ्यांचा बळीराजा असल्याचे लिहायला आणि सांगायला सुरुवात केली. सरकारच्या पाठिंब्यामुळे हा प्रचार शंभर-दीडशे वर्षे सुरू राहिला आणि आता तर लोक राक्षसराजालाच शेतकऱ्याचा बळीराजा मानतात.परंतु महाराष्ट्रातील यादव / जाधव घराणे किंवा त्यांच्याशी संबंधित अन्य मराठा घराणी - ज्यांच्यामध्ये बलरामाचे रक्त वाहते आहे; त्यांच्यापासून एक मोठा बहुमान काढून घेण्यात आला आहे. ही फसवणूक महाराष्ट्रात 'पुरोगामी' म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी केली आहे.
जाधव घराणे हे देवगिरीच्या यादवांच्या घरण्यातूनच निर्माण झाल्याच्या काही नोंदी आढळतात. साधारणतः १३ व्या शतकात कृष्णदेव महादेव रामदेवराय यांना खिलजीने पराभूत केलं. त्यानंतर कृष्णदेव गोविंददेव यांच्यापासून जाधव आडनाव लावण्यास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा, जिजाऊंचे पिता, निजामशाहीतील मराठा वतनदार असणारे राजे लखुजीराव जाधव यांनी 12 वर्ष अजिंक्य राहिलेला देवगिरी किल्ला जिंकून जाधव घराण्याचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले. जाधव हे आडनाव क्षत्रीय मराठ्यांचा वारसा सांगणारे असले तरी सद्य परिस्थितीत महाराष्ट्रातील इतर समाजात देखील जाधव आडनाव लावल्याचे पाहायला मिळते.
जाधव हे आडनाव मूळचे यादव या शब्दावरून आले आहे .
महाभारतातील कौरव व पांडवांचे पूर्वज पुरु यांच्या एका सावत्र मोठया भावाचे नाव यदु होते . ह्या यदुस त्याचे वडील राजा ययाती ने राज्य करण्याच्या अधिकारातून पदच्युत केले , तेव्हापासून त्याचे वंशज स्वतः ला यादव म्हणवून घेऊ लागले .
पुढे याच यादवांचे काही वंशज स्वतःस जाधव म्हणवू लागले .

चौथाई व सरदेशमुखी

 


चौथाई व सरदेशमुखी
मराठी राज्याच्या सतराव्या-अठराव्या शतकांतील उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी. या दोन्ही मुख्यतः मराठी राज्याबाहेर – छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर – पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करीत. चौथाई दौलतीकडे, म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होई; तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नाची बाब होती. याचा वतन असाही उल्लेख तत्कालीन कागदपत्रांतून आढळतो. चाकण आणि सुपे यांच्या सरदेशमुखीचा उल्लेख शिवाजींच्या पत्रव्यवहारांत आढळतो. यामुळे या दोन्ही गोष्टी एकदम वसूल करीत असले, तरी त्यांची जमा भिन्न ठिकाणी होई. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी होती व ती इतर वसुलाप्रमाणे असे. हे वतन पुढे शिवाजी महाराजांनंतर अनेक वर्षे चालू होते.
चौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. अर्थात ती निश्चितपणे केव्हा सुरू झाली, यांबाबत मतभेद आहेत. तथापि धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश (चोथिया ?) दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे १५७९—१७१६ च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेई. रामनगरचा राजा चौथाई घेत असे, ती एकूण उत्पन्नाच्या १७, १४ किंवा १२१/२ टक्के एवढी असे. शिवाजींनी दमणवसई हा भाग जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली होती. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता शिवाजी महाराज त्यांच्याकडून उत्पन्नाच्या १/४ किंवा कमी अधिक हिस्सा वसूल करीत. त्यांनी गोवळकोंडा व विजापूर येथील शाहीसत्ता आणि खानदेश व कोकणातील पोर्तुगीज यांच्याकडून चौथाई वसूल केली होती. एवढेच नव्हे, तर गोवळकोंडा व विजापूर यांना मोगलांविरुद्ध मदतही केली. पुढे पुढे शिवाजी चौथाई देणाऱ्या प्रदेशांतून स्वारी करणार नाही, या अटीवर चौथाई वसूल करू लागले. संभाजी व राजाराम हेही या पद्धतीप्रमाणे चौथाई वसूल करीत असत. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीत कैदी असलेल्या शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. मराठ्यांप्रमाणे बुंदेलखंडातील चंपतरायने त्याच्या शेजारील प्रदेशातून चौथाई घेतल्याचे कागदपत्रांतून आढळते. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई-सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. बादशाहने दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर नेमलेला निजामुल्मुल्क हा सुभेदार होता. तो वरकरणी म्हणे, हे सर्व हक्क मी वसूल करून देतो; मात्र माझ्या सुभ्यात मराठ्यांनी ढवळाढवळ करू नये. प्रत्यक्षात मात्र त्याने वसूल देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे मराठ्यांना हे तत्त्व मान्य झाले नाही. साहजिकच मराठे सहा सुभ्यांतून पुढे संचार करु लागले आणि चौथाई व सरदेशमुखी वसूल करू लागले. यांतूनच पुढे निजाम-मराठे संघर्ष निर्माण होऊन अनेक युद्धे झाली आणि मराठी राज्याचा त्याबरोबर विस्तारही झाला. तथापि हे प्रकरण पूर्णतः कधीच निकालात निघाले नाही. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठेशाहीच्या अवनतीच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई-सरदेशमुखीचे सर्व हक्क १८०२ मध्ये काढून घेतले.
संदर्भ : Sen, S. N. The Military System of the Marathas, New Delhi, 1958.
गोखले, कमल

सरदेशमुखी म्हणजे काय..?

 


सरदेशमुखी म्हणजे काय..?
मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात अनेक वेळा सरदेशमुखी हा शब्द ऐकलेलाच असेल. नेमके सरदेशमुखी म्हणजे काय ते आपण आज जाणून घेऊयात.
चौथाई अणि सरदेशमुखी या सरकारी उत्पन्नाच्या खास बाबी, परंतु दोहोंच्या वसुलीच्या स्वरूपात फरक होता. कारण
शिवकाळात मराठा राज्याचा प्रदेश दोन भागात विभागला होता.
1) स्वराज्य: प्रत्यक्ष छत्रपतीच्या अमलाखालील प्रदेश.
2) मोगलाई: मोगलांच्या ताब्यातील मात्र छत्रपतींचे वर्चस्व मान्य केलेला प्रदेश होय.
यापैकी चौथाई ही परमुलखातून म्हणजे मोगलाईतून वसूल केल्या जात असे, तर सरदेशमुखी राजाचा खास हक्क म्हणून
स्वामी या नात्याने स्वराज्याच्या मुलखातून अथवा अंकीत मुलखातून वसूल केल्या जात होती.
महाराष्ट्रात वसाहती झाल्यावर त्यात शेतीवाडी सुरू झाली. सरकारी सारा वसूल होऊ लागला व तो वसूल करण्याकरिता महालो-महाली देशमुख नेमण्यात आले.
ह्या देशमुखांनी सरकारने ठरविलेला दस्त वसूल करावयाचा आणि आपली मेहनत म्हणून त्या एकंदर वसुलाचा दहावा हिस्सा स्वतःस राखून ठेवावयाचा व बाकीचा सरकारात जमा करावयाचा असा पायंडा सुरू झाला.
शिवपूर्वकालात घाटगे, निंबाळकर, डफळे, सावंतवाडीकर भोसले आदि मराठे सरदेशमुख महाराष्ट्रात होते. देशमुख या नात्याने देशाची स्वस्थता व शांतता राखण्याची व त्याच्याकडून अपेक्षिलेल्या सारा वसुलीची अशी दोन कामांची जबाबदारी त्यांच्यावर असे.
या वसुलाचा एकदझांश भाग जो देशमुखास मिळावयाचा त्यापैकी शेकडा पाच टक्के धान्याच्या किंवा रोकडीच्या रूपाने आणि पाच टक्के पीक जमिनीच्या रूपाने अशी त्यांच्या प्राप्तीची विभागणी होती.
छत्रपती शिवाजी महाराजास या देशमुखांवरील सरदेशमुखी वतन आपल्याला बादशहाकडून मिळावे असे वाटे. त्याप्रमाणे त्यांनी मोगल बादशहाकडे आपल्या हयातीत तीनदा मागणी केली होती. शिवाजी महाराजांची ही मागणी मोगल बादशहाने शाहू महाराजास सनदा देऊन एक प्रकारे पुरी केली.
शिवप्रेमींनो, सरदेशमुखी म्हणजे नक्की आहे तरी काय ते आपल्याला आत्ता कळालेच असेल अशी आशा आहे.

Thursday, 1 April 2021

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 11

 

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 11
भिमगडच्या तहाची कलमे –
१) संभाजीने जे पोर्तुगीजांचे प्रदेश व किल्ले हस्तगत केले असतील ते तेथील तोफा व हत्यारे यांसह परत करावे.
२) युद्ध सुरु झाल्यापासून व त्यापूर्वी जी जहाजे एकामेकांनी घेतली असतील ती त्यातील सामानासह परत करावी.
३) एकमेकांनी पकडलेले कैदी सोडून द्यावेत.
४) वसईच्या मुलखातील गावखंडी व दमण प्रांतातील चौथाई ज्याप्रमाणे चौथ राजास देत असत त्याप्रमाणे संभाजी राजास पोर्तुगीजांनी द्यावी आणि संभाजीने ह्याबद्दल त्या प्रदेशाचे रक्षण करावे.
५) एकमेकांच्या मुलखात पूर्वीप्रमाणे व्यापारास मोकळीक असावी, आरमारास कोणतीही अडचण असू नये.
६) पोर्तुगीजांच्या किल्ल्यातील तोफखानाच्या संरक्षणाखाली धान्य सामग्री घेऊन मुघलांच्या फौजेकडे जाणा-या जहाजांना पोर्तुगीजांनी परवानगी देऊन नये, पण ज्या प्रदेशात पोर्तुगिजांचा तोफखाना नसेल तिथे हे कलम लागू होणार नाही.
७) कोकणातील देसाई संभाजी विरुद्ध बंड करून गोव्यात राहिले होते त्यांना माफी द्यावी.
८) पोर्तुगीजांच्या मुलखाच्या सीमा शेजारी संभाजीने किल्ला बांधू नये.
ही सर्व तहाची कलमे निळोपंत पेशवे यास अजिबात मंजूर नव्हती. कशी असणार ? तहाचे एक-एक कलम जर निट वाचले तर लक्षात येते की या तहानुसार फायदा होणार होता तो फक्त पोर्तुगीजांना ! मराठ्यांच्या वाट्यास काहीच येणार नव्हते. कलशाच्या प्रेरणेमुळे झालेला हा तह पाळला जाऊ नये हे निळोपंत पेशवे यास वाटत होते अशी नोंद पोर्तुगीज कागदपत्रात मिळते (पो.म.सं-११५) शत्रूच्या मुलखामधे आक्रमण करून त्यास जेरीस आणून जो तह केला जातो तो जेत्याच्या फायद्याचा असतो. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह हे उदाहरण घ्यावे लागेल. मिर्झा राजा जयसिंगने पूर्णपणे शिवाजी महाराजांना जेरीस आणून तहाच्या कलमानुसार स्वत:चा जय करून घेतला. पण गोवे मोहिमेत प्रस्तुत असणारा तह हा पराजेत्याच्या फायद्याचाच जास्त होता. स्वराज्याचे सुदैव म्हणून हा तह अमलात आला नाही.
गोवे मोहिमेत संभाजी महाराजांनी केलेला पराक्रम हा विलक्षण होता. प्रसंगी स्वताच्या जिवाची पर्वा देखील त्यांनी केली नाही. त्यांच्या या पराक्रमची आणी शौर्याची पोर्तुगीजांना चांगलीच दहशत बसली. पोर्तुगीजांसोबत तह करण्याची संभाजी महाराजांची इच्छा नव्हतीच पण प्रसंग पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. शहा आलम आला नसता तर शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण झाले असते ! फिरांगण प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली आला असता. हे स्वप्न पुरे व्हायला पुढे अनेक वर्ष लागली. उत्तर फिरंगाणातून १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांचे उच्चाटन झाले. गोव्यातून पोर्तुगीजांची हकालपट्टी व्हायला तर तब्बल ४५१ वर्ष उलटावी लागली. इ.स.१५१० मध्ये तिमय्याच्या मदतीने विजापुरी सल्तनतीला हादरा देत पोर्तुगीझांनी गोव्यात प्रवेश केला. पुढे १९६१ साली स्वतंत्र भारताचे स्वामित्व झुगारून जेव्हा पोर्तुगाल गोव्यावर अधिकार सांगू लागले तेव्हा Major General कुन्हीरमण कॅन्डेथ आणि Air Vice Marshall एलरिक पिंटो यांनी ऑपरेशन विजय आखले आणि गोमंतकाला भरत भूमीत सामील केले. छत्रपती संभाजी महाराजांना नशिबाची थोडी साथ मिळाली असती तर ह्या पोर्तुगीजांचे संभाजी महाराजांनी भारतामधून समूळ उच्चाटन १६८३ सालीच केले असते. असो. इतिहासाला जर-तर मान्य नसते. गोमंतकाचे मराठीपण टिकण्यासाठी आहुती गेलेल्या ज्ञात अज्ञात समरवीरांना सादर समर्पित.
|| लेखन सीमा ||
विशाल खुळे – padmadurg@gmail.com
संदर्भ
पोर्तुगीज-मराठे संबंध
असे होते मोगल
फुतुहते आलमगिरी
तारीखे दिलकुशा
जेधे शकावली
संभाजी कालीन पात्रसार संग्रह
शिव चरित्र साहित्य खंड २
ज्वलज्वलनतेजस संभाजी
मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर
मल्हार रामराव चिटणीस बखर

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 10

 

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 10
जेधे शकावली प्रमाणे – “शके १६०५ रुधिरोदागरी संवत्सरे पौष व ६ शहा आलम रामघाटे उतरोन कुडाळ व बांदे जाळून घाटावरी फाल्गुन शु पौर्णिमेस गेला लष्कर फार मेले “
तारीखे दिलकुशा प्रमाणे – शहजादा बादशहाचा निरोप घेऊन कोकणच्या रामदरा घाटाच्या दिशेने रवाना झाला. हा घाट पन्हाळगडापासून ३० कोसांवर आहे. रामदरा घाटाखालचा भाग समृद्ध नव्हता मोगल फौजेला अन्नधान्य आणि रसद मिळेनाशी झाली. बादशाहने सागरी मार्गाने रसद पाठवली पण ती जास्त काळ पुरली नाही. मोगली फौजेची दुर्दशा झाली आणि असंख्य माणसे जाय झाली.
शहा आलम सैन्य घेऊन आल्याचे कळताच संभाजी महाराजांनी माघार घेतली. मुघली सैन्य जर ऐनवेळी मदतीस पोचले नसते तर संभाजी महाराजांनी गोवे एकदम खणूनच काढले असते पण नियतीस हे मंजूर नव्हते. शहा आलम जवळ येत होता व पोर्तुगीज आणि मुघल यामधे मराठा सैन्य अडकले असते, आणि यामुळे संभाजी महाराजांनी माघार घेऊन तहाची बोलणी सुरु केली. मुघलांचे सैन्य गोव्यात दाखल होईपर्यंत मराठी सैन्यांनी माघार घेतली होती आणि शके १६०५ पौष शु. पौर्णिमेस संभाजी महाराज रायगडास आले (जे.श)
संभाजी महाराजांच्या सोबत झालेल्या युद्धामधे विजरईस कळून आले की मराठ्यांविरुद्ध गोवे शहराचे रक्षण करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. पोर्तुगीजांकडे आरमार होते. गोवे शहरास तट असून जागोजागी गडगंज बुरुज होते. शहरामधे मोठा दारूखाना होता. नदीच्या मुखावर मुरगाव, आग्वाद, रेइशमागुश, काबू असे किल्ले होते. असे असून देखील विजरईस मराठ्यांच्या भीतीने राजधानी गोवे शहरातून हलवण्याची गरज भासली.(पो.म.सं-११६)
रायगडावर पोचल्यानंतर पोर्तुगीजांसोबत तह करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी कवि कलश यास सोपवली. संपूर्ण गोवे प्रकरणात पोर्तुगीज कागदपत्रामधे कवि कलशाचा उल्लेख कुठेही मिळत नाही पण फक्त तह करण्याच्या वेळी त्याचा उल्लेख मिळतो. हे असे का ? पुराव्या अभावी सांगता येणे मुश्कील आहे .
जेधे शकावली मधे मिळतो तो उल्लेख असा – ” शके १६०५ रुधिरोदागरी संवत्सरे माघ शु कवि कलश अकबरास घेऊन भिमगडाच्या झाडीत गेले फिरंगी यासी सला केला “
प्रस्तुत तहात काय कलमे होती याची माहिती पोर्तुगीज कागदपत्रातुनच प्राप्त होते.

सुर्यराव काकडे

 

सूर्या सारखा तेजस्वी हिरा सह्याद्रीच्या खोऱ्यात महाराजांना बालपणीच सापडला होता ...
रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. “शिवाजीने सुरराव

काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.” असा मोर्याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.
सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते एकून पातशहा कष्टी झाला, नि म्हणाला, "काय इलाज करावा, लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे "
तेव्हा पातशहाने "शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही" असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.
मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले "तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे" अशी पत्रे पाठविली.
त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव, सुर्यराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले, आणि मोठे युध्द झाले. सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो
”चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले, पूर वहिले. रक्ताचे चिखल जाहले. मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोडे, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. "सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे. भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला."
विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले. खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले.
हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले. "खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीराजेसच दिधली असे वाटते.""आता शिवाजीराजां अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे. आता शिवाजीराजांची चिंता जीवी सोसवत नाही." असे बोलिले.
मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता, त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली...
शूर सूर्यरावांची प्रेरणा आपण साऱ्या मावळ्यांनी घ्यावी ...🚩
© @golden History Of Marathas

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...