तोरगल घराण्याची कैफियत:-
शिंदेसाहेब सुभा
संकलन:-शेखर शिंदे सरकार
यादी निळकंठराव शिंदे साहेबसुभा यांसी मेहेरबान ताकरीनसाहेब बहादूर सर कलेक्टर व पोलिटिकल एजंट सुभा धारवाड यांनी धारवाड मुक्कामी हुकूम केले के , अमले दौलतीचा मूळ पुरुषापासून भोमवटा कसकसा चालत आला , हे इस्तकबिल तामति कैफियम लिहुन देणेस हुकुम जाला , त्यावरून बहुता दिवसाच्या वैवाटा त्याअर्थी काय स्मरणांत आहे , ते । लिहून दिले आहे . सुरसन खमस अशरीन मयतैन व अलफ माहे सवाल सन १२३३ फसलीपर्यंत . प्रथम दौलत मिळविली ते मुळ पुरुष जिवाजी शिंदे हे आमचे पणजे . त्यास श्रीमन् महाराज छत्रपती यांनी कर्नाटकप्रांत काबीज करून बंदोबस्त करण्यास्तव रवाना केलें . तेव्हा कर्नाटकांती अमील मोंगलाई होता . प्रांत विशेषेकरून वसत नव्हता . थोडाबहुत वसत होता . तेव्हां कर्नाटकप्रांत जाऊन काबीज करून , अमील बसविले . तेव्हां तोरगलचा किल्ला घेऊन तेथे राहिले . तेथील हवा घोड्यास मानेनासी जहाली . सबब कसबा शिदोगी , तर्फेतील खेडें मौजे मनाली हा गांव नवलगंदकर देसाई यांचा . ती जागा , हवा चांगली ऐसे पाहून , देसाई यांस मुबदला देऊन , तो गांव आपण घेऊन गांव वसविलें , आणि किल्ला बांधून रहा वयास जागा केली . तेथून कर्नाटकांतीं स्वान्या करून साधलें त्या रीतीने खंडण्या वगैरे व गांवगना इनाम शेत मोकासबाब ह्मणून करून घेतले , आणि नवलगुंदकरांनी शेते इनाम करून दिली . त्या जागी पडेसर ह्मणून गांव बांधविले . तेथून स्वारीचा पल्ला करूं लागले . त्यासमयीं सावनूरकर यांनी कोलवाड हे गांव इनाम करून दिल्हें . शिरहट्ठीकरांनी आपल्यावरी धांदल होऊ नये सबब मौजे कोडलीकवाड़ गांव इनाम करून दिले . तसाच कितूरकर यानी काहीं चारी रुपये देणचेही दरसाल देत होते . खेरीज कसमला ह्मणून गांव इनाम करून दिले . आणि मारडगी तरकासही मोकासबाब शेत दिले . तसेच कुसु गलासही दिले . तालुक तालुक्यांनीं मोकासबाब ह्मणून दिले ते इकडे तोरगलचा किल्ला कडपर्यंत आमचे आजे बाजीराव शिंदे , त्याचे पुत्र आमचे तीर्थरूप सुबराव शिंदेपर्यंत चालला . त्या किल्लेत आपल्याकडून किल्लेदार ठेविले होते . त्याला आजाराने बहुत काहिला जाला तोंपर्यंत आमचे आजे बाजीराव शिंदे यांनी अनभावले . ते काल झाले . आमचे तीर्थरूप । सुबराव शिंदे यास बोलावू पाठविला जे , आपला किल्ला आपण स्वाधीन करून घ्यावें , ऐसे । मनोलीस वडील होते . त्यास बोलावू पाठावला . तेव्हां वडील वयाने लहान होते , आणि त्यासमयीं शरिरांत स्वस्थ नव्हता , सबब जाणे जालें नाहीं . तेव्हां आमचे घराणेपैकी भाऊबंद संभाजीराव शिंदे सेनाखासखेल यांचे वडील होते . त्याचे स्वाधीन किलीचे हात ( ? ) करून तो किल्लेदार काळ जाला . नंतर लक्षुबाई साहेब हे आमची आजी . आमचे तीर्थरूप लहान होते सबब आपणच फौज घेऊन जाऊन राजगड पाडून , तोरगल किल्लेस वेढा देऊन तोफा लाविल्या . किल्ला जेरीस आला . तेव्हा आमच्या पणज्याचे भावाची लेक जिजाबाईसाहेब यांस संभाजी महाराज छत्रपती यांस लम आमचे वडील जिवाजी शिंदे यांनी मनोलोत करून दिली होती. ती बाई किल्ला जेरीस आल्यासमयीं महाराजांची स्वारी घेऊन आली . तेव्हा तिघाही साहेबांचे म्हणणे पडलें जे , उभय पक्षी आम्हांस माहेर , त्या अर्थी उभयतांनीं भांडू नये,
मनोली संस्थान आपणाकडे आहे . तोरगल त्याजकडे द्यावें . ऐसे म्हणतांच बाईसाहेब यांची आज्ञा मान्य करून तोरगल किल्ला व किल्लेखर्चाबद्दल बनूर कर्यात दिला . आमचे पणजे । ( यांनीं ) सदरहू कामकाजें बहुत केलीं हें खातरेस आणून छत्रपती यांनी वडिलास ‘ साहेबसुभा ' । म्हणून किताब देऊन शिक्के दिले आणि जरीपटका दिला . तेरगल याचा जिमा जाला . त्यासही कांहीं किताब असावा म्हणून अलीकडे ' सेनाखासखेल ' म्हणून किताब दिला . आमचे वडील मनोली संस्थान व मोकासबाब व चौथाई वगैरे अनभवून राहिले . कार्य पडले असतां हुजूर तीनशें स्वारांनिशीं चाकरी करीत होते . पुढे आमचे वाडलांचा काळ झाल्यानंतर कांहीं दिवसांनी माधवरावसाहेब थोरले पेशवे यांची स्वारी सरंजामसुद्धां कर्नाटकप्रांतीं निघाली . मार्ग मनोलीच्या धारीवरून , तेव्हां मनोली किल्ला बारीनाळास त्याची मोकळीक होईल ह्मणून खंडणीरोखा वगैरे बेसुमार होऊन , अखेरीस किल्लेस वेढा देऊन , लढून किल्ला घेतला . तेव्हां आह्मीं लहान होतो . मातोश्री कृष्णाबाईसाहेब यांनी किल्ला सोडून कांहीं थोडेबहुत जिनजितराबे घेऊन निघाली . ती कांहीं दिवस पटवर्धन इलाखंत राहून दिवस काढले . छत्रपती यांजकडे कारकून पाठवून मजकूर कानावर घालुन , अर्ज केला . तेव्हां तिकडून कांहीं एक बंदोबस्त जाला नाहीं . मग कांहीं दिवसांनंतर मातोश्रीनीं हुजूर पुणेस जावून अर्ज केला . तेव्हां एकंदर संस्थानच काढून घेतले . त्याअर्थी कुटुंबखर्चास नेमणूक करून द्यावी हे अंतःकरणांत आणून तर्फ मनोली कर्यात सतीगरखेडे अठरापैकीं बेहड्यांतून काढून कुटुंबखर्चाबाबत ह्मणून सात गांव इनाम पेशवे यांनी करून दिले . तेव्हां तेथे येऊन , साती गांवांस लावणी वगैरे करून , योग क्षेम करून राहिले . ते अजी पन्नास पंचावन वर्षे होत आली . इस्तकबिल इनाम गांवसंबंधे कोणा एकास पैसा दिला नाहीं आणि चाकरीही केली नाहीं . | मागे राजमंडळकरासंमधीक तोरगलकर वगैरे येऊन आमचे गांवास धांदल केली . तेव्हां श्रीमंताचे हुकुमाबरोन कोन्हेरीराव पटवर्धन शेडबाळकर , गणपतीराव यांचे वडील , यांनी अक्कलकोटकर राजे यांचे भाऊबंद भवानराव लोखंडे यांस घोडगीरचे मुक्कामावरून सरंजामेसुद्धां रवाना केला . त्यांनी येऊन तगादा उठवून बंदोबस्त करून देऊन गेले . स्या समयीं आमचे गांवकरी प्यादे दहा पांच मेले . त्या समयी पुरावा . असा झाला . तदनंतर या साती इनाम गांवांत पोट भरत नाहीं , सबवे राजमंडळांत चाकरीस राहिलों , तेव्हां चाकरीपेशानद्दल खोची गांव व कोळवाड गांव व उमचगी व कोडलीकवाड असे गांव खासगी खर्चास चालवून खेरीज दरमहा खर्चासही देत होते . सरकार फौज ठेवून घेऊन रत्नाकरपंत राजाज्ञे ह्यांनी गोखले यांसी लढाई दिली . सवापूर मुकामावर . तेव्हा आह्मी स्वारीबरोबर होतो . लढाई झाल्यानंतर राजाज्ञे हे मनोलीस आले . आह्मी गोखले यांजकडे पाडाव सांपडलो . तेथून सुटका होऊन आल्यानंतर एक सालाविषयी सर्वत्रांस तगादा लावला . तेव्हा आह्मांसही तगादा केला . तेव्हां मामूल कधीं दिला नाही . हे दाखला पाहून तगादा मोकळा केला
नंतर पेशवे यांचीही चाकरी केली . चाकरीगाने नेमणूक खर्चही पोक्ता करून देऊन कांहीं दिवस चालविले . याचा दाखला चिंतोपंत देशमुख यांच्या दप्तरीं कर्नाटकसंबंधीं हिशेबी आहे . भाऊसाहेब पटवर्धन यांचे पुत्र आपासाहेब यांनी करबीरास वेढा घालून लढले . तेव्हा आह्मी करवीरास होतो . तेव्हांही सदरहुप्रमाणे गांव सार्धास चालविले . वेदा उठल्यानंतर सर्वत्रासी एक साल ह्मणून तगादा केला . तेव्हाही आह्मांस तगादा केला . त्या समयींही मामूल दाखला पाहून तगादा उठविला . कांहीं दिवस भाऊसाहेब पटवर्धन यांची चाकरी नेमणूक वगैरे घेऊन केली . त्यांनीही बरदास्त बहुत प्रकारे चालविली . त्यानंतर रोजगारच नव्हता . इनाम गांवांत स्वस्थ राहिलो . अलीकडे निपाणीकराकडे राहिलो . त्यांनीही मौजे कवतूर हा गांव आणि खरीज दरमहा देऊन ठेऊन घेतले होते . असे कांहीं दिवस त्याकडे होतों . एका सालीं आह्मी निपाणी मुक्कामीं निपाणी करांचा निरोप घेऊन गोकर्णयात्रेस गेलों , तेव्हां निपाणीकरांचा धांदली कारभार . यांनी आह्मी यात्रेस गेल्या पाठीमागे आमचे इनाम गांवठाणे घालून कुटुंब बाहेर घातलें . जिन जितराने झाडून घेतले . आह्मी यात्रेहून आलों , पांच सात वर्षे कुटुंब घेऊन सांगली वगैरे गांबांनीं राहिलों . नंतर पुण्यास गेलो . तेथे वेदमूर्ति मोर दीक्षित नाना यांच्या विद्यमाने बाजीरावसाहेबांस अर्ज केला . तेव्हां मामूल इनाम गांव आपले वडिलांनी दिलेला वाखला पाहुन खातरेस आणून निपाणीकरांस ताकीद करून , आमचे इनाम गांव आमचे आह्मांस सन समान अशर सालीं जिमा केला . गांवीं कुटुंब घेऊन येऊन स्वस्थ राहिलों . नंतर निपा णीकरांकडून चिकोडी व मनोली तालुका काढून महाराज छत्रपती यांस देणेबद्दल जनरल तामस मनरोल साहेब बहादूर यांनी जप्ती केली ; तेव्हां आह्मी साहेबांकडे हुबळीच्या मुक्कामीं भेटीस गेलों . भेट झाली . आमचा इनाम गांवचा मजकूर समजाविला . तेव्हां मामूल दाखला पुणेचा बेहेड्यावरून पाहून आमचे इनाम गांव सात आमचे आह्मांकडे दिले . मंतर जेव्हां मनोलीहून तगादा आला होता , तेव्हां करवीराकडून श्री भाऊमहाराज वकि लीस होते . त्यांसहौ ताकीद हरएकविषयीं आह्मांस उपद्रव होऊ नये , तेव्हां तगादा उठविला . असें जाल्यानंतर करवीराहून दहा हजार रुपयांचा रोखा करून पन्नास लोक आमचे गांवांस पाठविले . तेव्हां मामूल आह्मीं कोणास पैसा विला नाहीं . तेव्हां मेहे रवान चापलेन साहेब बहादूर यांजकडे धारवाडास वकिलाबरोबर पत्रीं मजकूर लिहून थैली पाठविली . तेव्हां मेहेरबान साहेब यांनी पुण्याचे बेहेड्याचा दाखला पाहून महाराज छत्रपती यांस थैळी दिली जे , बेहेड्यांत खच गांव इनाम आहेत , यांस उपद्रव होऊ नये अशी थैली दिली ; आणि आह्मांसही थैली पाठविली ज , महाराज छत्रपती यांस थली पाठविली आहे , आपणास उपसर्ग होणार नाहीं . ऐशी थैली आली . तेव्हां वरात उठोन गेली . त्यानंतर आणखी दुसरे सालीं करवीराहून हुजरे व लोक व कारकून यांजसमागमें रोसा होऊन रात झाली . तेव्हां मेहेरबान चापलेन साहेबांची स्वारी पुण्यास गेली होती,
आपण समेत होतो . साहेबांचे नांवें मजकूर लिहून , थैली देऊन , वकिलास धारवाड मुक्कामीं पाठविला . तेव्हां महाराज छत्रपती यांजकडून नारोपंत नाना वकील होते . त्यास ताकीद झाली जे , गैर मामूल होऊ नये . पत्र पाठवून वरातेस मनाई देवावे , आणि हुजरे थांस जेवणास ताट वाढून दिले होते ते ताट , वाट्या व तपेलें हुजरे यांनी घेतले होते ते माघारें देवणेस वकिलांकडून पत्रे देवविली . त्यावरून वरात उठोन गेली . ते आजपर्यंत साहेबांचे मेहेरबानगीवरून , कांहीं एक कोणाचा तगादा नसतां , स्वस्थ होतो . हल्लीं महाराज छत्रपती यांची स्वारी मनोलीस आली . तेव्हां आह्मी गांवांत नव्हतो . देवास गैल होतों . मनोलीस स्वारी आली . दुसरे दिवशी आमचे नांवें रोखा स्वारीखर्चाबद्दल ह्मणोन पंचवीस हजार २५००० व मसाला एक हजार १००० असे रोखा होऊन २७ सत्तावीस स्वार व पायाचे लोक पाठविले . तेव्हां आह्मी गांवीं नव्हतो . घरी कुटुंबांनी स्वारांस उतरून घेऊन रोजा व पोटगी व दाणाचारा असे दररोज पाऊणशें ऐशी रुपयेपर्यंत देत होते ; आणि मनोलीस छत्रपती यांजकडे फडफर्मास देऊन कारकून व भला माणूस पाठविले . त्यांनी फर्मास पहचवून , जाहीर करून , हुजुरचे कारकुनाच्या मार्फतेने विनंती करीतच होते जे , गैरमामूल होऊ नये . यजमान गांवीं नाहींत . वरातास मनाई व्हावी . यजमानसा हेबाकडे वर्तमान कळवून भेटीस आणवितों . अशी विनंती करीत कारकून तेथेच होते . स्वारास मनाई झाली नाही . स्वारास खर्चास देऊन गांवी ठेवून घेतल . मनोलीहून मनाई होत नाही . याप्रमाणे विचार झाला आहे , म्हणून साहेबाकडे थैली देऊन कारकुनास पाठ विला . गैरमामूल रोखा वगैरे होतो येविषयीं पेशजी मेहेरबान चापलेन साहेब बहादूर यांनी दाखला पाहून बंदोबस्त करून दिले . सर्वस्व आधार साहेबांचा म्हणून थैली मजकूर लिहून पाठाबला . साहेबाकडेस कारकून पाठावला . तो धारवाड़ीं राहिला . मनोलीस कारकून होते ते तेथेच राहिले . स्वारास रोजा वगैरे खर्ची देऊन गांवांत ठेवून घेतला . असे असतां छत्रपती यांची स्वारी फौज व तोफसुद्धा मनोलीहून निघोन आमचे इनाम गांव इटनहाळ ह्मणोन आहे तेथे स्वारी गेली . ते तेथील एक दुसरा प्यादा मारून ठार करून गांव दरो बस्त गुरेढोरे व रयता वगैरे जिनजितराबें लुटून फस्त करून , तसेच मुंगळीहाळ म्हणून ठाणेचा प्रांब तेथे नीट गडीपर्यंत फौज चालून गेली . तों तेथील प्यादे दोन तिनी असामींस तोडिले . ते ठाणेत जाऊ लागले तेव्हां ठाणेतून गोळी घातली . मग गोळागोळी होऊन दोन चार मुडदे परस्परे पडले . तेव्हां वरातेस स्वार कोण होते त्यास आणून घेतले . तोंपर्य त वहा दिवस दररोज पाऊणशे रुपये सुमारें खर्चास देऊन ठेवून घेतलेच होते . तसाच गोळागोळींत मुंगळीहाळ ठाणा जेरीस आणून आंतील लोकांस कौल देऊन , उतरवून ठाणा घेतला . मुंगळीहाळ व इटनाळ व रासनाळ ऐसे तिनी गांव लुटून फस्त केले . मुंगळी हाळास कांहीं घरे आगी लावून जाळिलीं . गांवांतल घर उकलोन तुळया वगैरे काढून घेऊन गेले . कांहीं नेतात , आणि रयेता वगैरेचे दाण्याचे पेव काढून दाणे नेतात . सर्व लुटालुट केली,
कांहीं एक म्हणून पदार्थ राहिला नाही. ठाणेचा जागा म्हणून आमचीं खाजगी सनगे व भांडी वगैरे जितराबे व कमत संबंधीं दाणे वगैरे आणि बैल वगैरे जनावरें मनस्वी होती, ते झाडून लुटून नेले. खेराबास पारावार नाही,अशी अवस्था झाली,फौज अद्याप मुंगळीहाळावर मुक्काम आहे,चेळकोष म्हणून आमचे गांवोसुमारची गढी आहे . तेथे पांच पंचवीस काटक मात्र ठाणा रचून आहेत . तोही ठाणी सोडून देण्याविषयीं स्वार वगैरे जाऊन दंगा करीत बसले आहेत. तेही वेढून घेणार ह्मणून पत्रे लिहिली होती,
सत्वर मेहेरबान साहेबास अर्ज करून लष्क रांत ताकीद करवावी जे , ठाणा वगैरे ह्मणून दंगा करू नये असे लिहिले आहे . त्यास सर्व प्रकारे घात झाला,याउपरी मेहेरबानगी करून बंदोबस्त करून,ठाणा व जीनजिनगी गुरें दोरे वगैरे आमचे आह्मांस जिमा करून सांभाळ करणार साहेब आहां . मामूल दाखल्याप्रमाणे मेहेरबान चापलेनसाहेब बहादूर यांनी बंदोबस्त करून दिलेच आणि आपण साहेबांसही चालवीत आला,सबब आह्मी गांवीं स्वस्थ होतों,हल्ली सर्वोपरी असा विचार झाला , कुटुंब निघून रानोमाळ झाले,सर्व बंदोबस्त करून देणार साहेब समर्थ.आमचा इनाम गांव कांही आजकालचा नव्हता,बहुत दिवस चालत आले,नरगुंदकर व रामदुर्गकर वगैरेचे संस्थान तुटक होऊन बाकीचे कसे आजपर्यंत चालत आले,तसेच आमचेही इनाम गांव चालत आले,केवळ सात खेडांचेच मालक पुरातनपासून ऐसे नव्हते, छत्रपती यांचे पदरीं अष्टप्रधान दिले आहेत त्या मानकयांतील दौलत आमची.तशी दौलत काढून घेऊन पोटगी खर्चास इनाम गांव सात करून देऊन पन्नास पंचावन वर्षे झाली.स्वस्थ कालहरण करून होतो. प्रस्तुत व्यासही ठिकाण नाहींसें करून खराबी केली,हे साहेबांनी खातरेस घेऊन बंदोबस्त करून देणार साहेब समर्थ आहे . सदरहू मालुमात आमचे वडील सांगत होते,ते पूर्वजाच्या अलीकडील माहिती आह्मांस खास आहे असा विचार असून हे मालुमात लिहून दिले आहे.
यादी निळकंठराव शिंदे साहेबसुभा:- याजकडे सर्व इनाम चालत आहे त्याची कैफियत दिवाण बापुजीपंती लिहिविली तेः १यांचे मूळ पुरुष जिवाजीराव शिंदे यांनी मनोली,मुरगोड,सतगेरी व ठनाळ वगैरे दरोवस्त तालुके जाहगिरी मिळविले. शिवाय सरकार तालुकांत चौथाई वगैरे आपले ज्याहा मर्दीने बसावले ह्मणून तर कोल्हापूर महाराजांचे घरास जिवाजीराव शिंदे यांची कन्या दिली.नंतर त्यांनी धनी आपले नोकर ह्मणून ह्मणविले,जिवाजीराव शिंदेचे लेक बाजीराव शिंदे,त्याचे लेक सुबराव शिंदे, त्याचे लेक निळकंठराव शिंदे असे चारी पुरुषपावेतों तालुका चालला.सुमारे६३ वर्षांखालीं पेशवे थोरले माधवरावसाहेब यांनीं सुबराव शिंदे यांची नाईल ... बाई शिंदे याजवरी खंडणीविषयीं रोखा केला,ते माघारे बाईसाहेब यांनी फिरविलेवरून खुद्द माधवरावसाहेब यांनी लष्करसुद्धा येऊन तारणनाम संवत्सरीं किल्ला घेऊन कुटुंबासुद्धां बाहेर घातले,तेव्हां पटवर्धन इलाखा जमखिंडीकर यांचा गांव होसकोट येथे चारी वर्षे होते.नंतर बाईसाहेब यांनी पुणेस जाऊन भाऊसाहेब पटवर्धन व दौलतराव घोरपडे यांचे विद्यमाने माधवरावसाहेबांशीं यथापकार तालुका स्वाधीन करावा असे अर्ज केले . माधवरावसाहेबांचे मनासी आलें नाहीं . एक वर्ष बीड वर्ष राखिले,उलगडा झाला नाही त्याकरितां भाऊसाहेब व दौलतरावसाहेब ( यांचे विद्यमानें ) पुनरपी अर्ज केला कीं , मी कृष्णाबाई व मूल बहुत हलाखी पावत आहे,त्याचा बंदोबस्त करून द्यावा,असी विनंती करितां मनास आणून बेहेडेतून काढून पोटगीकरितां सर्व इनाम मोकरर करून दिलें तें :
१ हिरकोप . १ निकोप . १ भाजीकोप १ दासनहाळ . १ मळेकेरा १ मुंगळिहाळ १ इटनहाळ .
येणेप्रमाणे सात गांव २०००० रुपयेची कमाल बेरीज गांवासी सतीगेरी कर्यात १८ खेडेपैकी सात खेडें कृष्णाबाई व निळकंठराव शिंदे यांचे नांव सनद करून देऊन निरोप दिल्हा .त्यापासून १२१९ किंवा १२२० फसलीपावेतों सररास चालले . कांहीं नजर व जुड़ी वगैरे ह्मणून कांहीं घेतले नाही.
सर्व इनाम चालविले १ ऐन कलम,१. १२२० फसलींत निपाणी शिदोजीराव नाईक निंबाळकर सरलष्कर याजकडे मनोली तालुका सरंजामीस चालत होते . निळकंठराव शिंदे व शिदोजीराव नाईक निंबाळकर यांची दोस्ती होती,असे चालत होते.शिंदे यांनी गोकर्णयात्रेस प्रती वर्ष जाणेच चाल होती.ते साली जाण्यास निरोप विचारला.शिमगा आला आहे जाऊ नये ह्मणाले.आमनें देवताकार्य आहे.राहतां येत नाही ,असे ऋणाले . निरोप देणेची मर्जी नव्हती.आग्रहेंकडून निरोप दिल्हा . निळकंठराव शिंदे यांनी गोकर्णास गेलेवरी सात खेडासी दोन हजार फौज पाठवून ठाणा घेतला.नंतर यात्रेहून येऊन पटवर्धन इलाखा हुलकुंद कांहीं दिवस मुधोळ व गुर्लहोसूर असे राहून नंतर बाजीराव पेशवे यांजकडे पुणेस जाऊन मोर दीक्षित नाना यांचे विद्यमानी फिर्याद केली वरून मनासी आणून निपाणीकराकडून सोडचिठी सुरुसन समान अशरीन मयातैन साली दिली,
संदर्भ:-दक्षिणेतील सरदार घराण्यांच्या कैफियती,यादी वगैरे

No comments:
Post a Comment