राजर्षी शाहू छत्रपती
१८९९ - १९०० सालाच्या दरम्यान प्लेगाची साथ व दुष्काळ पडल्यामुळे लोकांचे व दुष्काळ पीडित जनावरांचे दु:ख निवारण कसे करावे याची चिंता लागली होती. पाऊण लाख रुपये तगाई म्हणून देण्यात आले. लोकांच्या दु:ख निवारणार्थ वडगाव, रुकडी, शिरोळ येथे नवीन तलाव बांधण्याच्या व जुने तलाव दुरुस्त करण्यास सुरुवात केली, यासाठी चार लाख रुपये खर्च करण्यात आले. तलावांखेरीज निपाणी-दाजीपूर रस्त्यावर तीन मोठे पूल बांधण्यात आले व नवीन पक्के रस्ते तयार करण्यात आले.
नवीन असिस्टंट सर्जन नेमून दवाखान्यात स्त्रियांचे नवीन खाते निर्माण करुन मेडिकल खात्याची पुनर्घटना करण्यात आली. स्त्रियांचे खाते श्री. कुमारी कृष्णाबाई केळवकर, एल. एम. ॲन्ड एस. या बाईंच्या हवाली करण्यात आले. मुंबई येथील ग्रॅंट मेडिकल काॅलेजमध्ये अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर संस्थानच्या मदतीने इंग्लंड मधील हाॅस्पिटलमध्ये अनुभव घेऊन शिक्षण पुर्ण केले. कोल्हापूर येथे "अहिल्याबाई आयुर्वेदिक रुग्णालय" व हातकणंगले येथे डिस्नेन्सरी सुरू करण्यात आली.

No comments:
Post a Comment