मायाजी भाटकर ( मायनाक भंडारी समाधी )
शिवरायांचे दर्यावरचे सेनानी मधले एक जबरदस्त व्यक्तीमत्व म्हणजे मायनाक भंडारी . छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आणि त्यानंतर आलेल्या ब्रिटिशांच्या पोलीस दलात लढवय्या भंडारी समाजाचे भरीव योगदान. मायनाक भंडारी हे तर छत्रपतींच्या आरमाराचे पहिले प्रमुख होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील हेटकरी पायदळाने पुरंदर आणि वसईच्या लढाईत पराक्रमाची शर्थ केली. समुद्रसेनानी मायनाक भंडारी तथा मायाजी भाटकर आणि त्यांचा पुतण्या बालयोध्दा वीर हरजी भाटकर यांनी हिंदवी स्वराज्याच्या मोहिमेत असामान्य पराक्रम गाजविल्याची नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातही हरजी भाटकर, मायनाईक भाटकर, संताची बोले दर्यासागर, नेताजी पालकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.याच मायनाक भंडारींना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली. महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग वर तुटून पडले. त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता. या मोहिमेमध्ये भंडाऱ्यांचा पुतण्या धारातीर्थी पडला. मात्र मायनाक भंडाऱ्यांनी सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला.
#दर्यसेनानी_मायाजी_भाटकर

No comments:
Post a Comment