विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

*महाराष्ट्रातील कदम घराणे*

*महाराष्ट्रातील कदम घराणे*
महाराष्ट्र तील *कदम आडनावाची अनेक घराणी आहेत. त्याचे मूळ स्थान गोवे(गोवा)व हनगळ तेथील कदंबाशी जोडता येते.सातवाहनाच्या राज्यानंतर कदंबाचे राज्य दक्षिणेत होते. परतू बदामीच्या चालुक्यानी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. वनवासीत कदंब सर प्राचीन होते.त्यांची सत्ता काही काळ दक्षिण कोकणात ही असलेचे दिसून येतो. *कदमबांडे हे सरदार विजापुर च्या आदिलशाहीत सरदार होते. या कदम बाडेचे उल्लेख व शंभुसिहं कदमबाडे याचा विवाह कच्वाह नरेश यांच्या कन्या शी झाले आहे असे उल्लेख इतिहास कार ग.रे खेर यांना केला आहे. पुढे हे कदमबाडे यांना छत्रपती शाहू थोरला याच्या पक्ष घेतला व गुजरात येथे गायकवाडच्या सोबत राहिले . तेथून ते ताराबाईसाहेब च्या कारकिर्दीत महाराष्ट्रात आले ते प्राचीन महाराष्ट्र तील कदंब कुलातील होत.तर *गिरवीकर कदम मालाजीराजे भोसलें च्या कालखंडात वेरूळच्या भोसले गढीत *फलटणकर निंबाळकर यांच्या सोबत नेहमी येत .
माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांनी *गिरवी चे नाव पुन्हा महाराष्ट्रात दुम दुमवले. कदमांच्या पूर्वजांच्या घरात *बाल संभाजी राजेयेऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. तेव्हा त्यांना लक्ष भोजन घातले होते.
विरोध पक्ष नेते *मा रामदास कदमयांच घराणे ही मूळचे गिरवी चे
*गिरवीतील कदम सरदाराची घुमटाकार समाधी*
*गिरवी च्या या शूर सरदाराचा इतिहास काळा आड लपलेला आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर असलेल्या समाधी सारखेच दिसणारा एक समाधी आहे तसेच आणखीन दोन समाधी या गिरवीच्या चौकात आहेत. ज्या कदम घराण्यातील आहेत यावर स्थानिक इतिहास प्रेमी मान्य करतात.

 *कुलदैवत तुळजा भवानी*
तुळजाभवानी ही कदम कुटुंबाची कुलदेवता आहे.तुळजा भवानी मातेवर कदम कुटुंबाची विशेष श्रद्धा. वर्षांतून एकदा गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ही तुळजापूर ला जाऊन देवीची पूजा प्रत्येक वर्षी करीत असते. गिरवी जवळील डोंगरावर भवानी मातेचे मंदीर आहे. कदम कुटुंबा च्या श्रद्धेखातर प्रसन्न होऊन तुळजापूर ची भवानी माता गावाजवळील डोंगरावर विराजमान झाली आहे .अशी आख्यायिका सांगितली जाते. श्रावण महिन्यात इथे देवीचा मोठा उत्सव असतो.
तसेच गेली 15 वर्षे गिरवी ते तुळजापूर अशी पायी वारी सुंदर अश्या रथासोबत देवीची पालखी ठेवून केली जात आहे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...