विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

मराठा सेनाधिकारी खंडेराव #कदम

मराठा सेनाधिकारी खंडेराव #कदम

#कदम (आडनाव)

#कदम हे ९६ कुळी मराठा आडनाव आहे. प्रामुख्याने हे आडनाव उस्मानाबाद, नांदेड, सातारा या जिल्हात आढळते. तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हात प्रमुख आडनाव म्हणून या आडनावाकडे बघितले जाते. तसेच कदम हे आडनाव मराठ्यांच्या सुर्यवंशम कुळातील आहे. सुर्यवंशम म्हणजे लढाई करणारे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

अहमदनगरच्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत बाजी कदमराव नावाचे देवळाली प्रवरा येथील एक सेनाधिकारी होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवल्याबद्दल त्यांना साक्री आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा कर्नाटकातील बंकापूर येथे मृत्यू झाला. त्यानंतर कदम घराण्याचे वंशज शिवाजी राजांच्या सेवेत मराठा दौलतीत दाखल झाले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी कदम शिवाजीराजांचे विश्वासू सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजीराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी योगदान दिले. पानिपतच्या तिसर्या लढाईतही कदम घराण्यातील योद्धे लढले होते

#खंडेराव #कदम हे मराठा सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी योगदान दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी अत्यंत कुशल मावळ्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी खंडेराव कदम हे एक सेनापती होते. स्वराज्याप्रती निष्ठा, तंत्रकुशलता, व्यवस्थापन या सर्व बाबींना महाराजांनी खुप महत्व दिले होते.

आज च्या घडीला सुद्धा मार्गदर्शक ठरेल असे काही पराक्रम त्यांचे सेनापती करून गेले. त्यातील एक होते खंडेराव कदम.

#दोन #मोती #गळाली,#सव्वा #लाख #बांगडी #फुटली #रूपये आणि #खुर्दा #किती #गेला #त्याची #गिणती #नाही 14 जानेवारी 1761रोजी मराठे व अब्दाली यांच्यात पानीपतचे तिसरे युध्द झाले महाराष्ट्रातील मराठ्यांची एक पिढी पानिपतावर कापली गेली.कदमांचे पण कित्येक सरदार कामी आले फक्त इतिहासात त्याची नोंद झाली नाही. शिंदे -कदम प्रत्येक युध्दात साथीने लढलेले आहेत. चिमाजीअप्पाने वसई किल्ल्याची मोहिम फत्ते केली त्यामधे कदम व शिंदे सरदार अग्रेसर होते. कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार || शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू की तीर || संदर्भकविता:- बेलाग दूर्ग जंजिरा वसईचा किल्ला तिथला
शिवाजीमहाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळऩाडू येथिल वलीगंडापूरम जिंकल्यावर तेथिल भूईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे दिली.

छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे झुल्पिकारखानाच्या वेढ्यात अडकले होते. खाना सोबत शिर्के होते तेव्हा शिर्क्यांसी वाटाघाटी होऊऩ दसपटकरांच्या इनामी गावांपैकी कदमांची काही गावे शिर्क्यांना देऊऩ महाराज निसटले व सिंहगडावर पोहचले.
खंडेराव कदमांचे पूर्वज बाजी कदमराव हे अहमदनगरच्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तजा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत देवळाली प्रवरा येथिल एक सेनाधिकारी होते.साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले किल्ल्यावर फितवा करून मिळवल्या बद्दल त्यांना साक्री आणि रूई ही गावे इ.स.1580 इनाम मिळाली होती.
पुढे विजापूरकरांशी लढताना कर्नाटकातील बंकापूर येथे बाजीराव मृत्यू पावले.खंडेराव कदमांचे अनेक वंशज पानीपतावरील युध्दात योध्दे म्हणून लढले.
#जय #शिवराय #जय #शंभूराजे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...