विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा " भाग १

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा "
( एका महापराक्रमी वीराची सत्यगाथा )
पोस्त सांभार : #राहुल #रमेशजी #पाटील ,
शंभूमाहीतीगार
ई-मेल : - rahulp1298@gmail.com


भाग १
" हंबीररावांची स्वामीनिष्ठा " , ह्या चरित्रात्मक लेखात , सरनौबत हंबीरराव मोहित्यांचे , हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील योगदान , यावर महत्वपूर्ण माहिती जाणणार आहोत .
■ हंसाजींचा जन्म : -
#मोहिते #घराणे हे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान घराण्यांपैकी , एक होते . हंसाजींचे वडील , संभाजी मोहिते हे हि पराक्रमी होते . सन १६३१ मध्ये , सुप्याच्या गढीमध्ये , हंसाजींचा जन्म झाला असावा . तसेच संभाजी मोहिते यांस हरिफराय , हंसाजी व शंकराजी ही अपत्ये होती .
संभाजींनी , हंसाजींस उत्तम पद्धतीचे लष्करी शिक्षण दिले होते , म्हणोनच पुढील काळात ,
हंसाजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले होते .
■ हंसाजींचा सैन्यात प्रवेश : -
हंसाजी मोहितेंचा , मराठा सैन्यात , 'मावळा' म्हणून प्रवेश कधी झाला , याबाबत अजूनतरी पुरावा उपलब्ध नाही , इतिहास अद्यापतरी मौन बाळगून आहे .
हंसाजी , संभाजी मोहिते यांच्या देखरेखेखाली लहानाचे मोठे झाले , त्यांनीच युद्धविषयक शिक्षणाकडे स्वतः विशेष लक्ष दिलेले होते . याखेरीज युद्धविषयक शिक्षण सरनौबत नेतोजी पालकरांच्या हाताखाली पूर्ण झाले . नंतरच्या काळात शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत सोबत राहून युद्धनीती व डावपेच हंसाजीने आत्मसात केलेले होते . गनिमी काव्याच्या
युद्धतंत्रामध्येही , ते तरबेज झाले होते ; म्हणोनच पुढे जाऊन , हंसाजी स्वराज्याच्या चतुरंग सैन्याचे " सरनौबत " झाले .
#सरनौबत #प्रतापराव #गुजर आणि #हंसाजी : -
हंसाजी मोहिते , यांनी हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरनौबत प्रतापराव ( कुडतोजी ) गुजर , यांच्या मार्गदर्शना - खाली , प्रत्येक मोहिमेत सहभाग घेऊन , एक उत्तम योद्धा म्हणून कार्य केले . सरनौबतांचा हंसाजींवर खूप विश्वास होता .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...