विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 March 2019

मराठा ईतिहासातील सुवर्ण पान :नाईक बावणे घराणे














मराठा ईतिहासातील सुवर्ण पान :नाईक बावणे घराणे
माहिती आणि पोस्त सांभार :जीवन शेषराव कवडे

तांदुळजा जिल्हा लातूर व गीरवली ता आंबाजोगाई जिल्हा बीड येथील नाईक बावणे घराणे.
बावणे घराण्यातील विर पुरुष जानोजी महाराज नाईक बावणे व मालोजी महाराज नाईक बावणे हे थोरले शाहू महाराज कालीन आपल्या पराक्रमाची छाप सोडनारे मराठा सरदार. ईतिहासात सरदार नाईकजी बावणे म्हणून प्रसिद्धी व नावारुपाला आले ती ईतिहास प्रसिद्ध उदगीरची लढाई, राक्षस भुवनची लढाई व खर्ड्याची लढाई पासून. या तीनही लढाईत आपल्या पराक्रमाची शर्थ करुन हैदराबादच्या निजामाला मानहानी कारक तह करायला भाग पाडते. हैदराबाद निजामाचे सेनापती विठ्ठल सुंदरचा वध या नाईक बावणे बंधू नी केला. हैदराबादचा निजाम शरन आल्यावर जो तह झाला तो तांदुळज्याच्या नाईक बावणे यांच्या गढीतच. तहात खंडनी स्वरुपात जो प्रदेश मराठ्याना मीळाला तो म्हणजे आजचा मराठवाडा .
सरदार नाईकजी बावणे यांच्या गढीला भेट देन्याचा योग आला. मी व माझे बंधू विलासराव कवडे तांदुळजाच्या गढीत प्रवेशल्यावर गढीतच वास्तव्यास असलेले सरदार नाईकजी बावणे यांचे थेट वंशज धर्मराज नाईकजी बावणे व हनुमंतराव नाईकजी बावणे यांची भेट झाली. आम्हाला संपुर्ण गडी दाखऊन माहिती दीली. गडी खूपच प्रशस्त आहे .गडीत एक खूपच खोल विहीर आहे. गढीत एक ऐतिहासिक बैठक आहे त्या बैठकीच्या ठीकाणीच निजाम व मराठ्यांचा ऐतिहासिक तह झाला होता. आज सरदार नाईकजी बावणे यांचे थेट वंशज श्री बाबासाहेब नाईकजी बावणे यांनी पुर्वजांच्या अमुल्य अश्या कांही ठेवी जतन केल्या आहेत त्यात एक लंडन येथे तयार झालेली दुर्बिण सुस्थितीत आहे आजही त्या दुर्बिणीतुन २५ ते ३० किलोमिटर अंतरावरील वस्तु किंवा व्यक्ती स्पष्ट दिसते . गढीला चार बुरुज आहेत. गढीचे प्रवेश द्वार भव्य आणी सुंदर आहे. आज गडीचा बराच भाग ढासाळला आहे पण गडीची भव्यता लपत नाही. गडीच्या मुख्य प्रवेश द्वारापासून कांही अंतरावर सरदार जानोजी महाराज नाईकजी बावणे यांचे समाधी मंदिर आहे व जवळच एक ऐतिहासिक बारव सुस्थितीत आहे. तांदुळजा गावाजवळ सरदार नाईकजी बावणे यांच्या सैनीकानी निजामाच्या सैनिकाची कत्तल केली होती व शत्रु सैनीकाच्या शीराचे खंडीभर ढीग लावले होते म्हणून त्या समरभुमीला शीरखंडी असे संबोधले जाते. मालोजी महाराज नाईक बावणे निजामाच्या बरोबर झालेल्या युद्धात जख्मी होउन कान्हेगाव येथे वारले यांचे समाधी मंदिर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील कान्हेगाव येथे आहे.
सरदार नाईकजी बावणे यांचे वंशज श्री हनुमंतराव नाईकजी बावणे, श्री बाबासाहेब नाईकजी बावणे व श्री धर्मराज नाईकजी बावणे यांनी आम्हाला खूपच छान माहिती दीली व चांगले सहकार्य केले यासाठी नाईकजी बावणे वंशजाचे शत शत आभार.

तांदूळजा भारतीय संस्कृताचा इतिहास फार प्राचीन व ऐतिहासिक असून, शासनाच्या उदासिन धोरणांमुळे अनेक गावागावातील एैतिहासिक ठेवा नष्ठ होण्याची भिती निर्माण तर झालीच आहे; परंतू यापैकीच प्रमुख व इ़स़ १७६० साली उदगीरच्या लढाईत निजामांचा पराभव होऊन निजाम व मराठे यांच्यातील तहनामा ज्या गढीत झाला तहनामान्यातील करारानुसार निजामांनी मराठ्यांना मराठवाडी भाषिकांचा ‘वाडा’ म्हणून तसेच तुंगभद्रा नदी पर्यंतचा प्रदेश दिला़ याचपैकी याचे नामकरण ‘मराठवाडा’ असे करण्याचे ठिकाण म्हणजे सुमारे अडीचशे वर्षापासून त्या इतिहासाची साक्ष देत असलेली तांदूळज्याच्या सरदार नाईक बावणे यांची गढी आज ढासळू लागली आहे़ सुमारे अडीचशे वर्षापूर्वी ‘मराठवाडा’ या प्रांताला ‘मराठवाडा’ हे नाव देण्याचा ‘ऐतिहासिक निर्णय’ ज्या गढीमध्ये झाला़ त्या लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील ‘सरदार नाईक बावणे’ यांच्या गर्दीचा विसर पर्यटन मंत्रालयाने पडला आहे़ मराडवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडीच्या विकासासाठी ऐतिहासिक स्थळ विकास योजनेअंतर्गत साधा उल्लेखही दिसून येत नाही़ निजामाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायाने त्याकाळी सरदार नावाची उपाधी देवून कर्तव्यदक्ष मावळे तयार केले़ या सरदारांना विशिष्ट अशा पाच-पन्नास गावाची जहागीरी देवून टाकली व अशा प्रकारे तांदूळजा येथील नाईक बावणे हे त्यावेळचे सरदार होते़ त्याप्रमाणे या सरदारांसाठी व त्याभोवतालच्या प्रदेश संरक्षणासाठी त्यांनी बुरुजवजा मोठमोठ्या किल्ल्याप्रमाणे गढीची निर्मिती झाली़ गढीचे बांधकाम गनिमीकावा पद्धतीने केले गेले़ त्यामुळे शत्रुपासून आले संरक्षण व्हावे तसेच शत्रु आणि त्यांचे मानसे आढळून येताच तोफेचा गोळा शत्रुला लागावा अशा पद्धतीने निर्मिती करण्यात आली़ मराठवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गढीने अनेक घडामोडी पाहिल्या आहेत़ १९४८ मध्ये तांदुळजा, सारसा, देवळा येथील गावाच्या लोकांवर रजाकाराने जेव्हा अत्याचार सुरु केले तेव्हा तांदुळजाच्या सरदार जगजीवन उर्फ युवराज नाईक बावणे, बाबुराव बंडेराव शिंदे आदी मंडळींनी रजाकाराला सळो की पळो करुन सोडले़ बन्सीलाल मारवाडी यांच्या मुलाची हत्या करुन सोने-नाणे घेवून जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना मांजरा नदीच्या पुरात गराडा घालून जलसमाधी दिली़ तसेच आज तांदुळजा येथे असलेल्या सामाजिक वनिकरणातही काही रजाकाराला ठार करण्यात आले़

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...