सरदार हैबतराव निंबाळकर, वैराग,
माहिती आणि पोस्त सांभार :शार्दुलसिह नाईक निंबाळकर
mobile नो. 9096267474
माहिती आणि पोस्त सांभार :शार्दुलसिह नाईक निंबाळकर
mobile नो. 9096267474
सरदार हैबतराव निंबाळकर, वैराग, यांना छत्रपती बुवासाहेब महाराजांनी "सरलष्कर" पद देण्याचे ठरविले. यासाठी महाराजांनी १० जुलै १८२६ रोजी एक खास समारंभ घडवून आणला. या समारंभावेळी भरलेल्या छत्रपतींच्या दरबाराचे तपशीलवार वर्णन इतिहासात आढळते, ते पुढीलप्रमाणे,
"कचेरी जाहली. त्यास हुजूरचे स्वारीची (छत्रपती महाराजांची) गादी उत्तराभिमुख समोर घातली होती. दुघई सोपा लांबी उत्तर - दक्षिण आहे. त्यात पूर्वेच्या बाजूने सोप्यात सदर होती. तेथे दोन्ही बाजूंस भले लोक, मानकरी बसले होते. पश्चिमेचे बाजूस पूर्वेकडे तोंड करुन मानकरी, भले लोक बसले होते. सदरचे पूर्वेस दुघई सोपा आहे. त्यात कारकून मंडळी होती. उत्तरेचे बाजूचे सोप्यात मानकरी होते. छत्रपतींची स्वारी सर्व मानकरी कचेरीत येऊन बसल्यावर मागाहून येऊन सदरेवर बसली. यानंतर भालदाराला आज्ञा करण्यात आली. हणमंतराव निंबाळकर बहाद्दर यांस घेऊन या. भालदाराने निंबाळकरांना बोलावून आणले. निंबाळकर जोहार करुन उजव्या बाजूस जागा राखून ठेवली होती तेथे जाऊन बसले. निंबाळकर आपल्या जागी बसल्यावर महाराजांच्या आज्ञेवरुन राजश्री हैबतराव गायकवाड विश्वासराव हे सणगाचा सरपोस व तरवार पडदाने घेऊन आले. राजश्री सदाशिवराव जोती दिवाण हे जवाहिराचे तबक शिक्केकटारीचा ताम्हण घेऊन सरपोस घेऊन झाकून आले. नंतर सरकारांची आज्ञा निंबाळकर यांस येण्याविषयी झाली. त्याप्रमाणे ते पुढे आले आणि जोहार करुन उभे राहिले. नंतर सरपोसातील तिवट काढून गायकवाड विश्वासराव यांनी सरकारचे हातात दिले. छत्रपतीने ते निंबाळकर बहाद्दर यास देऊन बसण्याविषयी आज्ञा केली. त्याप्रमाणे ते बसले आणि तिवट बांधिले. त्यावेळी त्यांना सरलष्करीची वस्त्रे जवाहीर जरीपटका हत्तीसुद्धा आणि शिक्केकट्यार वगैरे देणग्या देण्यात आल्या."
या वर्णनावरुन छत्रपतींच्या दरबारात सरदार व मानकरी मंडळींना किताब व पदे बहाल करण्यासाठी होणाऱ्या समारंभाचे व दरबाराचे स्वरूप समजण्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment