विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

#छत्रपती #संभाजीमहाराजांचें #मुघलांवर #थेट #आक्रमण भाग २

#छत्रपती #संभाजीमहाराजांचें #मुघलांवर #थेट #आक्रमण
संदर्भग्रंथ
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
English Records on Shivaji
भाग २
शके १६०२ रौद्र संवछरे
मार्गसीर्ष मासी बऱ्हाणपूर हबिरराव याणी मारिला
शके १६०२ रौद्र संवत्सर
मार्गशीर्ष महिन्यात [१२ नोव्हेंबर ते २१ डिसें. १६८०] हंबिररावाने बुऱ्हाणपुरावर छापा टाकला.
, नोव्हें. १६८०
ही घटना मुघल अखबारातही ०१ मार्च १६८१ च्या नोंदीत सापडते. ह्या नोंदीतून असे कळते की मुघल सरदार #खानजहान #काकरखान याने स्वतःला व सैन्याला तिथल्या किल्ल्यात बंद करून संरक्षित केले. तीन दिवस शहर लुटले जात असताना त्याने मराठ्यांना थांबवण्याचा प्रयासही केला नाही.
बादशाही नोकरींपैकी एका बंदूकधाऱ्याने तक्रार केली की राण्याचा एक हेर माझ्याजवळ येऊन सांगत आहे की राणा राजसिंगाचा मुलगा अतिशय त्रासलेल्या परिस्थितीत आहे. तो म्हणतो की बादशाह मला जीवदान देतील तर स्वतःच्या मुलास हुजूरास पाठवीन. तेव्हा अब्दुर्रहीमखानास हुकूम झाला की, बंदुकधाऱ्याची व हेराची माहिती तपासून अर्ज करावा.
मुघल अखबार, क्र. १७२, २२ डिसें. १६८०
ह्यानंतर पूर्वेकडे सोलापूरवरही संभाजीमहाराजांनी आक्रमण चढवले. मनोहरदास गौड हा त्यावेळी सोलापूरचा किल्लेदार होता. त्याव्यतिरिक्त रणमस्तखान व इतर काही सरदारही सोलापूरला नेमले होते. त्यांचे मराठ्यांशी तुंबळ युद्ध झाले. मराठ्यांनी सोलापूर किल्ल्यातील काही तोफा पळवल्या व ते धरणगावकडे वळले.
संदर्भग्रंथ ह्यानंतर पूर्वेकडे सोलापूरवरही संभाजीने आक्रमण चढवले. मनोहरदास गौड हा त्यावेळी सोलापूरचा किल्लेदार होता. त्याव्यतिरिक्त रणमस्तखान व इतर काही सरदारही सोलापूरला नेमले होते. त्यांचे मराठ्यांशी तुंबळ युद्ध झाले. मराठ्यांनी सोलापूर किल्ल्यातील काही तोफा पळवल्या व ते धरणगावकडे वळले.
संदर्भग्रंथ
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
English Records on Shivaji

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...