संदर्भग्रंथ
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
English Records on Shivaji
भाग १
पूर्वेकडून व उत्तरेकडून राज्यावर आक्रमण होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी मुघलांवर थेट आक्रमण करण्याचा बेत केला. जुलै १६८० मध्ये बहादुरखानने अहिवंतगडास वेढले होते. त्यानंतर संभाजीमहाराजांच्या ह्या आक्रमणाची माहिती इंग्रजांच्या २० नोव्हें. १६८० च्या पत्रातून आपल्याला मिळते.
Our last was to give your Honour notice of the Caphilas setting out towards you, which was of the 2d instant; wee pray God it may arrive in safety to you, for since their departure wee are hottly alarm'd of Sevajees forces being abroad. It is reported here that there is a party of horse and foot designed to march towards Suratt, another against Brampore, a third to keepe Bauder Caun in play, who is removed from these borders further towards Decan. Wee shall doe our utmost to gett our goods in and pack tbem up as fast as wee can to send away, whereby to prevent the ensueing danger.
आमच्या शेवटच्या पत्रात आपल्या दिशेने येणाऱ्या काफिल्यांबद्दल आम्ही लिहिले होते. ते आपल्यापर्यंत सुखरूप पोहोचतील अशी आम्ही प्रार्थना करतो कारण त्यानंतर शिवाजीमहाराजांचे सैन्य देशावर आल्याची बातमी आम्हाला मिळाली आहे. त्यावरून असे कळते की घोडदळ व पायदळाच्या तुकड्या सुरत व बऱ्हाणपूरकडे निघाल्या आहेत व तिसरी तुकडी दख्खनकडे असलेल्या बहादुरखानला झुलवण्यासाठी पाठवली आहे. ह्या संकटापासून दूर राहण्यासाठी आम्ही सामानाची बांधाबांध करून ते शक्य तितक्या लवकर पाठवण्याची व्यवस्था करू.
छाप्राचे सुरतेला पत्र, २० नोव्हें. १६८०, २० नोव्हें. १६८०
बहादुरखानने मुल्हेर नामक बागलाणातील बलाढ्य किल्ल्यालाही वेढा घातला होता पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारामुळे त्याला तिथून माघार घ्यावी लागली. वरील पत्रात सुरतेकडे एक व बऱ्हाणपूरकडे एक अशा दोन फलटणी मुघलांवर निघाल्याचे म्हटले आहे. जेधे शकावलीत हंबिरराव मोहिते ह्याने बऱ्हाणपूर मारल्याचा उल्लेख सापडतो त्याप्रमाणे ही घटना शके १६०२ च्या मार्गशीर्ष महिन्यातील, म्हणजे १२ नोव्हेंबर ते २१ डिसें. १६८० इसवी मधील असल्याचे कळते.
No comments:
Post a Comment