विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 April 2019

परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------2

परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------2
१७८० सालचा दसरा झाल्यावर, कोकणप्रातांचें इंग्रजांपासून संरक्षण करण्याकरितां ज्या सरदारांची रवानगी झाली, तींत भाऊहि होते. १७८१ सालच्या आरंभीं इंग्रज सेनापति गॉडर्ड यानें बोरघाट काबीज करून मुख्य सैनास खंडाळा येथें पाठविलें व तो स्वत: खोपवली येथें राहिला. तेव्हां भाऊंनी कोकणांत उतरून गॉडर्डच्या सैन्यास अतिशय त्रास देऊन व त्याचें मुंबईशीं असलेलें दळणवळण बंद पाडून त्याचा पुरा पराभव केला, व त्यास पिटाळून लाविलें. याबद्दलची बरीचशी माहिती नाना फडणवीस या नांवाखालीं आली आहे. १७८५ सालीं टिप्पूनें नरगुंदकर देसायावर आपलें सैन्य पाठविलें, तेव्हां भाऊ व गणेशपंत बेहरे हे देसायास कुमक करण्याकरितां गेले. देसाई हा पटवर्धनांच्या आप्तांपैकींच असल्याकारणानें भाऊ त्याला मदत करण्यास विशेष उत्सुक होते. परंतु नाना फडणविसाची तूर्त टिप्पूशीं लढण्याची इच्छा नसल्यामुळें मराठयांची टिप्पूशीं तडजोड झाली व भाऊं पुण्याकडे परतले परंतु तिकडे टिप्पूनें लगेच तह मोडून नरगुंदकराचें पारिपत्य केलें.
या प्रकरणी नानानीं आपणांस देसायास कुमक करण्याच्या कामी अडथळा केल्यामुळें देसाई टिप्पूच्या विश्वासघातास बळी पडून सर्वस्वीं नागावला गेला या गोष्टीचा भाऊंस फार राग आला, म्हणून त्यानीं टिप्पूवरील पुढील मोहिमेच्या प्रसंगीं उदासीनपणा धरला व कांहीं तरी सबब काढून ते स्वत: मोहिमेंत हजर राहिले नाहींत. दोस्तांच्या श्रीरंगपट्टणावरील स्वारींत २५००० सैन्यासह टिप्पूच्या उत्तरेकडील मुलुखावर चालून जाण्यासाठीं तारीख ५ मे सन १७९० रोजीं भाऊ पुण्याहून निघाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...