विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 April 2019

परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------3

परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------3

पुढें टिप्पूशीं तह होऊन (१७९२ मार्च) दोस्तांची लष्करें आपापल्या मुलुखाकडे जावयास निघालीं, तेव्हां इंग्रजांनीं मराठयांनां नजर केलेल्या १७ मोठमोठया तोफा भाऊंबरोबर देण्यांत आल्या होत्या. खडर्याच्या (१७९५) लढाईंत पटवर्धनांचें ७ हजार सैन्य होतें, व स्वत: पटवर्धन मराठयांच्या सर्व लष्कराचे मुख्य सेनापति होते. या लढाईंत एके प्रसंगी भाऊ जखम लागून खालीं पडले असतां त्यांचा वडील पुत्र हरिपंत यानें मोठया शौर्यानें लढून बापाचा जीव वाचविला (खडर्याची लढाई पहा). सवाईमाधवरावास अपघात होतांच नानानीं पुण्यास ताबडतोब निघून येण्याविषयीं भाऊंस निरोप पाठविला (१७९५). आपण ठरविलेला दत्तकाचा बेत हाणून पाडून रावबाजीस मसनदीवर बसविण्याचा दौलतराव शिंद्याचा विचार आहे असें नानांस समजतांच त्यानीं पुन्हां निकडीनें बोलावणें पाठविलें. भाऊहि अवघ्या ४८ तासांत १२० मैलांची मजल करून फौजेसह पुण्यास येऊन दाखल झालें. तेथें नानांच्या व त्यांच्या विचारें शिंद्यापूर्वीं आपणच रावबाजीस गादीवर बसवावें असें ठरल्यामुळें ते जुन्नरास गेले, व रावबाजीस पुण्यास घेऊन आले (१७९६). या व पुढील प्रसंगांची विस्तृत हकीकत नाना फडणवीस यांच्या नांवाखालीं पहावी.
रावबाजीस नानानीं आणल्यावर शिंदा सैन्य घेऊन पुण्याकडे यावयास निघाला. तेव्हां भाऊनीं शिंद्यांशीं लढाई देण्याचा नानांस सल्ला दिला. पण नाना घाबरले व भाऊंस रावबाजीजवळ ठेवून आपण पुण्याहून चालते झाले (१७९६). धाकटया चिमाजीआप्पास यशोदाबाईस दत्तक देऊन कारभार तुम्हीं करावा असें बाळोवा तात्यानें भाऊंस म्हटलें, तेव्हां त्यानीं नानांचा सल्ला विचारला. रावबाजीस आपल्या ताब्यांत घेऊन मग ही गोष्ट करावी असें नानानीं मत दिलें. परंतु भाऊंनी नानाचें ऐकलें नाहीं व चिमणाजीस मसनदीवर बसवून रावबाजीस मात्र आपल्या ताब्यांत घेतलें नाहीं. चिमणाजीकरितां पेशवाईचीं वस्त्रें स्वत: नानानींच छत्रपतीपासून मिळविलीं व तीं घेऊन ते स्वत: पुण्यास आले असते, परंतु भाऊनीं रावबाजीस आपल्या ताब्यांत घेतलें नाहीं असें पाहून त्यांचें मन भाऊविषयीं साशंक झालें.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...