परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------4
इकडे भाऊहि नानांच्या विरुद्ध गेले. ज्या नानानीं भाऊंस योग्यतेस चढविलें तेच भाऊ अखेर नानांवर उलटले. त्यांच्या चरित्रावर हा एक मोठा कलंक आहे. भाऊनीं नानानां धरण्याकरितां सातार्यास धरणें पाठविलें. तेव्हां नाना वाईस गेले. तेथेंहि फौज गेल्यानें ते महाडास गेले. पावसाळ्यामुळें भाऊंच्या फौजेचा लाग लागला नाहीं. इकडे भाऊनीं नानांची सर्व जहागीर व वाडे जप्त केले. पुढें नानांचें महाडचें कारस्थान फलद्रूप होऊन भाऊ कैद झाले व नाना पुण्यास येऊन कारभारी होऊन रावबाजी पेशवे (१७९६) झाले. (नाना फडणवीस पहा). भाऊंस आनंदराव रास्त्यानें सांभाळण्याची हमी घेतली व त्यानां नगर व मांडवगण येथील किल्ल्यांत कैदेंत ठेविलें (१७९८). माधवराव रास्त्यास सातारच्या महाराजांच्या लोकांनीं सातार्याजवळून हांकून लाविलें, व कोल्हापूरकराशीं मिसळून दंगा उभारला. तेव्हां १५ लक्ष रुपयांचा जबर दंड घेण्याचें ठरवून पेशव्यानीं भाऊंस कैदेतून सोडविलें व दंगा मोडण्यावर त्यांची नेमणूक केली (१६ जून). तेव्हां भाऊनीं रास्त्यांच्या मदतीने १० हजार फौज उभी केली; व भर पावसाळ्यांत महाराजांच्या सैन्यावर वेणा नदी उतरून अचानक हल्ला केला व पुन्हां पूर्वीप्रमाणें किल्ला काबीज करून सर्व स्थिरस्थावर केलें. यानंतर रावबाजीनें फौज कमी करण्याची गोष्ट काढली. परंतु फौजेचा पगार द्यावयास पैसा नाहीं अशा सबबीवर भाऊंनी टाळाटाळ केली. पुढें १७९९ सालीं उन्हाळ्यांत इंग्रजांचें टिप्पूशीं जें युद्ध झालें त्यांत इंग्रजांनां मदत करण्याकरितां मराठी सैन्यावर भाऊंची नेमणूक झाली. तेव्हां नाना व भाऊ यांचा सलोखा होऊन असें ठरलें कीं, भाऊंस दंडाची रक्कम माफ करून धारवाड व दुसरी कर्नाटकांतील कित्येक ठिकाणें जहागीर द्यावीं व भाऊनीं धोंडोपंत गोखले, रास्ते, विंचूरकर व दुसरे ब्राह्मण यांच्या फौजा घेऊन इंग्रजांच्या तुकडीसह टिप्पूशीं लढण्यास जावें. पण पुढें रावबाजी दौलतरावाच्या सल्ल्याप्रमाणें चालल्याकारणानें लढाईवर जाण्याचें कारण पडलें नाहीं. यापुढें भाऊनीं बाळोबा तात्याचा व नानांना समेट करून दिला.
याच सालच्या (१७९९) पावसाळ्यांत भाऊंस कोल्हापुरकरांचा पुंडावा थोपवून धरण्याचें काम सांगण्यांत आलें. कोल्हापुरकर भाऊंच्या मुलुखास अलीकडे बराच उपद्रव देत होते. कांहीं दिवसांपूर्वी तर त्यांनीं तासगांव लुटून, तेथें भाऊनीं बराच खर्च करून बांधलेला नवीन वाडा जाळून फस्त केला होता. भाऊंचें व त्याचें पुष्कळ दिवसांचें हाडवैर होतें. वरील कृत्यांनीं भाऊंस इतका त्वेष आला होता कीं, वृद्धापकाळामुळें त्यांची शक्ति क्षीण होत चालली होती, तरी त्यानीं सर्व पावसाळाभर कोल्हापूरकरांशीं युद्ध चालूं ठेवून घटप्रभा व मलप्रभा ह्या नद्यांमधील ठाणीं परत घेतलीं.

No comments:
Post a Comment