विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 14

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 14

इचलकरंजी संस्थान :अनूबाई घोरपडे---------2

ज हा गि रीं ची व मा म ल तीं ची प्रा प्ति :- अनूबाई ही बाळाजी विश्वनाथाची कन्या असल्यामुळें शाहू महाराजहि स्वत: तीस बरेंच मानीत होते. व्यंकटराव वारल्यावर शाहूनें अनूबाईचा हा संबंध लक्षांत आणून सबंध आजरें महाल तीस इनाम करून दिला. पुढें १७५३ सालीं पेशवे करवीरकर संभाजीची मर्जी सुप्रसन्न करून घेण्याकरितां कर्नाटकच्या मोहिमींतून करवीरास गेले तेव्हां अनूबाईनें ती संधि साधून त्यांच्याबरोबर राहून, आजरें महालापैकीं एक तर्फी ३१ खेडीं कापशीकरांस संभाजी महाराजांकडून मोकासा चालत आलीं असल्यामुळें त्यांची रीतसर नवी सनद तिनें शंभु छत्रपतीकडून करून घेतली. या प्रसंगीं पेशव्यांस भीमगड, पारगड व वल्लभगड हे तीन किल्ले करवीरकरांकडून जहागीर मिळाले. त्यांची मामलत पेशव्यांनीं अनूबाईसच सांगितली. याच वर्षी राणोजी घोरपडे यानें करवीर दरबाराशीं चाललेल्या कलहांत आपणांस अनूबाईकडून द्रव्याची व फौजेची कुमक होते हें लक्षात आणून नारायणरावास गवसें गांव इनाम दिला. १७५६ सालीं पेशव्यांची सावनुरावर मोहीम झाली तींत अनूबाई हजर होती. या मोहिमींत पेशव्यास सोंधें संस्थानिकाकडून पूर्वी इचलकरंजीकरांकडे असलेला मर्दनगडचा किल्ला मिळाला व तो त्यांनीं इचलकरंजीकरांच्या स्वाधीन करून त्यांत त्यांचे लोक ठेवले. याप्रसंगी, नवीन मिळालेला मुलुख व पूर्वीचा मुलूख मिळून धारवडच्या विस्तृत सुभ्यांची मामलत धारवाच्या किल्ल्यासुद्धा अनूबाईस पेशव्यांकडून मिळाली.
मा ता पु त्रां ती ल क ल हा स आ रं भ :- अनूबाईचा मुलगा नारायणराव हा आतां वयांत आला असल्यामुळें त्याला आपल्या आईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा कंटाळा येऊन मातापुत्रांत वितुष्ट आलें. हा वितुष्टाचा प्रकार नारायणराव आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणें १७५७ मध्यें पेशव्यांबरोबर श्रीरंग पट्टणाच्या स्वारीस न जातां दुसरीकडे गेला तेव्हां उघडकीस आला. तेव्हां अनूबाईनें आपल्या मुलाची कशीबशी समजूत काढून त्यास १७५९ सालीं इचलकरंजीस परत आणलें.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...