विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 15

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 15

इचलकरंजी संस्थान :अनूबाई घोरपडे---------3

अ नू बा ई व जि जा बा ई यां चा सं बं ध :- १७५९ च्या अखेरीस मराठयांची व मोंगलाची लढाई सुरू झाली तेव्हां अनूबाई नगरास येऊन पेशव्यांजवळ राहिली. १७६१ सालीं मात्र अनूबाई पेशव्यांच्या स्वारीबरोबर न जातां इचलकरंजी सच राहिली. यांचे कारण शेजारीं करवीरच्या राज्यांत राज्य क्रांतीचा समय जवळ येऊन ठेपला होता हें होय. त्या सालच्या जानेवारींत संभाजी महाराजांचें देहावसान झालें तेव्हां अनबाईनें तें वर्तमान टाकोटाक पेशव्यांस लिहून कळविलें. अशा रीतीनें संभाजीच्या मरणानंतर करवीर संस्थान खालसा करण्याची मसलत पेशव्यांनीं योजिली तींत अनूबाईचें प्रथम पासूनच अंग दिसून येतें. पेशव्यांनी करवीरच्या राज्याची जप्ती करण्याकरितां इचलकरंजीकरांकडील माणसें पाठविल्यामुळें जिजाबाईचा तर असा पक्का ग्रह झाला होता कीं सर्व कारस्थानाच्या मुळाशीं अनूबाईच आहे. पुढें जिजाबाईनें आपली सवत गरोदर असल्याची हूल उठविली तेव्हां त्या गोष्टीची परीक्षा करून बाळंतपणाच्या वेळीं प्रत्यक्ष हजर राहण्याकरितां पेशव्यांच्या सांगण्यावरून अनूबाई करवीरास जाणार होती. पण पानिपताचा पराभव व नानासाहेबाचा मृत्यु यांमुळें तो बेत रहित झाला.

No comments:

Post a Comment

मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह

  मराठ्यांच्या गनिमी काव्याने हादरलेला मुघल बादशाह इ.स. १६८१. मुघल सम्राट औरंगजेब स्वतः जवळपास पाच लाखांच्या प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये उतरल...