मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 26
घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. - ------------------------------2
घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. - ------------------------------2
सन १६९२ त संताजींनें वाईच्या फौजदारावर छापा घालून त्यास सैन्यासह कैद केलें. नंतर मिरजेच्या फौजदा राचीहि हीच दुर्दशा केली. त्यावेळीं महाराजांच्या आज्त्रेवरून रामचंद्रपंतांनीं संताजींस मिरज प्रांतांची देशमुखी व सरदेशमुखी इनाम दिली. सन १६९६ त संताजी व धनाजी जाधव यांनीं गंगथडीवर स्वारी केली व तीन वर्षे तिकडे राहून तो मुलूख लुटला आणि बादशहाच्या लष्करास पुरवठा करण्याकरितां हिंदुस्थानांतून रसद व खजिना त्या मार्गानें येत असे तो कित्येक वेळां लुटून घेतला. यांच्या पारिपत्याकरितां बादशहाकडून आलेल्या एकामागून एक तीन फौजा त्यांनीं मोडून गर्दीस मिळविल्या. झुल्फिकारच्या स्वारींत संताजी हा छत्रपतींची कुमक करण्याकरितां पुन: कर्नाटकांत (१६९६) गेला. त्याच्याबरोबर त्यावेळीं फौज वीस हजार होती. संताजीनें धनाजीस पुढें पाठविलें. संताजी मागून येत असतां त्यावर त्या प्रांताचा फौजदार अल्लीमर्दान चालून आला. त्या प्रसंगीं फौजदाराचा पूर्ण पराजय करून त्याची फौज लुटून काढिली व त्यास पकडून जबर खंड घेऊन सोडून दिलें. नंतर चंदीस पोंचल्यावर त्यानें मोंगलांवर वारंवार तुटून पडून त्यांस चंदीचा वेढा उठविणे भाग पाडिलें. नंतर तो कर्नाटक, बलेघांट या प्रांतांत शिरून तेथें लुटालूट करूं लागला. तेथील फौजदार कासिमखान यास त्यांशी युध्द करण्याचि छाति होईना; सबब त्याच्या कुमकेस बादशहानें मोठे मोठे सरदार पाठविले. ते कासिमखानास येऊन मिळाल्यावर ति सर्व सेना संताजीवर निघाली तोंच त्यानें एकदम येऊन चोहोंकडून या फौजेस घेरा दिला.संताजीचा ही मगरमिठी सुटेनाशी झली. तेव्हां त्या फौजेची सुटका करण्याकरितां बादशहाने हिंमतखान नांवाचा सरदार पाठविला तो संताजीने त्यास परस्पर वटेंतच गांठून त्याची फौज उधळून दिली.
इकडे आठपंधरा दिवस मार खातांच कासीमखानाचीहि फौज टेंकीस आली. शेंवटीं कासिमखानानें विष खाऊन प्राण दिला. व बाकीची सव फौज संताजीच्या हाती लागली, तेव्हां त्यांनें ती लुटली व सरदारांपासून भारी खंड घेऊन त्यांस सोडून दिलें. इतकयांत हिंमताखान पुन्हां नवी फौज घेऊन लढाईस आला परंतु संताजीने तीहि फौज धुळीस मिळविली, व त्यास मारून टाकिलें.
No comments:
Post a Comment