विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 27

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 27

घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. -  ------------------------------3

धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांमध्यें यावेळीं वांकडें आलें. सन १६९७ त राजाराममहाराज जिंजीहून स्वदेशीं परत आले. त्यांनी या उभय सरदारांचा समेट करून द्यावा.
तें न कारतां जाधवाचा पक्ष धरिला, त्यामुळें संताजीचें बळ कमी पडलें. त्या दोघां सरदारांच्या फौजांचा विजापुरानजीक तळ पडला असतां जाधवरावोंन घोरपडयांच्या बहुतेक फौजेंत फितूर केला व त्या फौजेच्या मदतीनें संताजीस धरण्याचा बेत केला. ही बातमी संताजीस कळतांच त्यानें नारो महादेव वगैरे आपले विश्रासू सेवक व मुलेंमाणसें व जिवास जीव देणारी थोडीशी

फौज होती ती घेऊन तेथून पळ काढिला. त्यानंतर कांही दिवस तो जाधवरावाचा शह चुकवीत मुलखातूंन हिडत होता. एके प्रसंगीं त्याचा मुकाम म्हसवडास पडला. तेथें म्हसवडकर माने नागोजी यानें. (आपल्या सास-याचा सूड घेण्यासाठीं) संताजीस दग्यानें ठार मारिलें.
याप्रमाणें संताजी हा मारेक-यांच्या हातें प्राणांस मुकला. संताजीरावांचे मुलगे राणोजी व पिराजी हे त्यावेळीं लहान होते. यावेळीं नारोपंतानें कापशीकर घराण्याची लाज राखिली. धन्यास दगा देऊन तो जाधवरावास मिळता तर राजाराम महाराज यांची मर्जीं त्याजवर सुपसत्र झाली असती व त्यास मोठें वैभवहि मिळालें असतें, पण त्याची बुध्दि तशी नव्हती. त्यानें राणोजी व पिराजी यांस हातीं धरून सेनापतींचे अनुयायी एकत्र जमविले व बहिरजी घोरपडे निराळी सरदारी करून कर्नाटकांत होता त्यास आणविलें. मग ही घोरपडयांची एक स्वतंत्रच फौज जमा झाली असें पाहून जाधवरावानें त्यांशीं विरोध करण्याचें सोडून दिलें.
ताराबाईच्या कारकीर्दीत घोरपडे ताराबाईच्या ताब्यां न रहातां नेहमी स्वतंत्रपणें मोगलाई व मराठी राज्यांत स्वा-या करीत असें डफ म्हणतो; परंतु तें खरें दिसत नाहीं. कारण कीं, सन १७०३-४ या सालीं ताराबाईंचे पुत्र शिवछत्रपति यांनीं पिराजी घोरपडे यांच्या नांवें सरंजामजाबता करून दिला आहे त्यांत कलमें आहेत तीं :-
(१) मशारनिल्हेचे पितें संताजी घोरपडे यांस मामले मिरज येथील अठरा कर्यातीचें देशमुखी वतनें दिलीं होतीं तेणेंप्रमाणें यांजकडे करार. (२) सरदेशमुखीचें वतन मशारनिल्हेस पेशवीपासून होतें तेणेप्रमाणें करार. सुभा पन्हाळा व मामले मिरज.  (३) मशारनिल्हेचे वडील बंधु राणोजी स्वामिकार्यावरी पडले त्यानिमित्त त्यांची स्त्री संतुबाई इजवरी कृपाळु होऊन तिचा योगक्षेम चालण्यानिमित्त कसबे कापशी गांव इनाम दिला.  (४) नारो महादेव, यांनीं कष्ट मेहनत बहुत केली. या बाबे त्यांस भिलवडी हा गांव इनाम दिला.  (५) नशार निल्हेकडे सरंजाम करून सरदार दिले.  (अ) संभाजी निंबाळकर. हजार फौजेची दौलत. (आ) वेंकटराव नारायण पांचशें जमावाची तैनात.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...