मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 29
घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. - ------------------------------5
घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. - ------------------------------5
पुढें करवीर राजमंडळाचा पक्ष अधिक प्रबल करावा म्हणून कापशीकर व नारो महादेव यांस रामचंद्रपंतांनीं पूर्णपणें अनुकूल करून घेतलें. रामचंद्रपंतांनीं ‘हिंदुराव’ यांस वळविण्याचाहि प्रयत्न केला पण तो सफल झाला नाहीं. त्या घराण्याचे स्थापक बहिरजी घोरपडे गजेंद्रगडकर मरण पावले होते. त्यांचे पुत्र सिदोजीराव यांस रामचंद्रपंतानीं करवीरकाकडून सेनापतीचें पद देवविलें. ते फौजबंद व शूर होते. परंतु त्यांचे मन कर्नाटकच्या स्वा-यांत गुंतलें असल्यामुळें करवीरच्या मसलतींत पुढाकार घेघ्याचें त्यांच्यानें होईना. मग त्यांजकडून सेनापतीचें पद काढून रामचंद्रपंतानीं पिराजी कापशीकर यांस तें देवविलें. तें पद त्या दिवसापासून आजपर्यंत कापशीकरांच्या घराण्याकडे अव्याहत चालू आहे. त्या वेळीं पिराजीराव वयानें लहान असल्यामुळें अर्थात सेनापतीनिस बतींचीं सर्व कामें नारो महादेवच पहात. याप्रमांणें त्या वेळीं करवीर राजमंडळाच्या सचिवाचे व सेनापतीचे अधिकार कांहीं वर्षेपर्यंत त्यांच्या हातीं आले होते ! कापशी घराण्याच्या किताबांपैकी ‘ममलकतमदार’ व मानमरातबापैकीं जरीपटका व नौवत हीं कापशीकरांचे अनुयायी व संताजीरावांना मानलेले पुत्र या नात्यानें बाळगण्याविषयीं नारो महादेव यांस परवानगी मिळाली होती. इचलकरंजीकरांच्या घराण्यांत हा किताब व बहुमान अद्यापपर्यंत चालू आहे.
सन १७२८ सालीं पिराजी घोरपडे मौजे हलकर्णी हें ठाणें काबीज करण्याकरितां गेले होते. तेथें ते लढाईंत ठार झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र राणोजी हे सेनापतीच्या दौलतीचे मालक झाले. कापशीकर यजमान व इचलकरंजीकर नोकर हा संबंध आतां राहिला नव्हता. तथापि कापशीकरांच्या दौलती विषयीं व्यंकटरावांची (नारोपंताचा पुत्र) अनास्था नसे. जेव्हां जेव्हां राणोजीचें काम शाहू महाराजांच्या दरबारींपडे तेव्हां तें व्यंकटरावांच्या वशिल्यानें सिध्दीस जाई. या दोन्ही घराण्यांत परस्परांविषयी प्रेमभाव व घरोबा पुढेंहि कायम राहिला. पिराजीराव मरण पावल्यावर कापशीकरांच्या दौलतींत पुष्कळ अव्यवस्था होऊन ती दौलत अगदीं नात वानीस आली. कोल्हापुरकर संभाजीच्या मनांतून सबंध कापशी संस्थानच खालसा करावयाचें आलें. त्याचा तो बेत पाहून संताजीराव घोरपडे यांची थोरली स्त्री द्वारकाबाई अद्यापि हयात होती ती आपल्या नातवास (राणोजी) बरोबर घेऊन साता-यास शाहूमहाराजांच्या आश्रयास राहिली. (ही इ.स.१७६२ त मरण पावली. त्यावेळीं तिचें वय ऐशीं वर्षांपेक्षा अधिक असावें. तिचा मुलगा पिराजी व पिराजीचा मुलगा राणोजी. द्वारकाबाईच्या स्मरणार्थ राणोजीनें कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर कुरूंदवाडच्या घाटांवर घोरपडयांचा कुलस्वामी सुब्रह्यण्य, याचें देवालय बांधिलेलें आहे). वर सांगितलेल्या मिरज व पन्हाळा प्रांतची देशमुखी सरदेशमुखीच्या वतनाची सनद पूर्वीच्या क्रमाप्रमाणें शाहूकाडून्हि कापशीकरांस करार करून मिळाली. वतनाच्या मालकीस नांव मात्र कापशीकरांचें व भोगवटा व्यंकटरावांचा असल्यामुळें व सासुरवाडीकडून (पेशव्यांकडून) शाहूच्या दरबारांत व्यंकटरावांचा वशिला उत्तम रीतीचा असल्यामुळें ही वतनाची सनद पिराजीस मिळण्यास अडचण पडली नाहीं (१७२१).
No comments:
Post a Comment