मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 30
घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. - ------------------------------6
द्वारकाबाई व राणोजी साता-यास असतां शाहूनें त्यास सन्मानानें वागविलें.राणोजी यास सरंजामाचे महाल नवीन नेमून देऊन त्याच्या सरदारीची स्वतंत्र उभारणी करावी त्यांस नवीन इनाम गांव द्यावे, याप्रमाणें महाराजांचा मनोदय होता व त्याप्रमाणें सरंजामाच्या सनदाहि तयार झाल्या होत्या. परंतु पुढें लौकरच संभाजीकडून समेटाविशयीं संदर्भ आल्यावरून घोरपडयांच्या सरदारीचें काम थांबलें. पुढें संभाजीं हा शाहूच्या भेटीकरितां साता-यास आला त्यावेळीं ‘तुम्हीं कापशीस परत या, आम्ही तुमचे संस्थान तुम्हांकडे चालवितों’ असें संभाजी द्वारकाबाईस व राणोजीस म्हणूं लागला. परंतु शाहू व त्याचे पेशवे बाजीराव यांची हमी घेतल्याखेरीज ती दोघे परत जाण्यास कबूल झाली नाहींत. शेवटीं पेशवे, प्रतिनिधि व मंत्री यांस बरोबर घेऊन शाहू महाराज राणोजीच्या घरीं गेले व तुमचें संस्थान चालविण्याबद्दल आम्हीं संभाजींस सांगितले आहे, त्याप्रमाणे ते बिनदिक्कत चालवितील तुम्हीं कापशीस जावें, असें त्यांनीं व प्रधानमंडळींनीं त्यांस आग्रहानें सांगितलें. त्यावरून तीं दोघें कापशीस परत गेलीं व कबूल केल्याप्रमाणें संभाजींनें त्यांचें संस्थान त्यास परत दिलें (१७३०). पिराजीराव मरण पावल्यानंतर राणोजीस सनद मिळावयाची; परंतु व्यंकटरावांवर शाहूची कृपा असल्यामुळें त्यांनीं त्यास आज्त्रा केली कीं ‘देशमुखीचा भोगवटा अनेक वर्षे तुम्हीच करीत आहां. नवी सनद द्यावयाची तींत राणोजींचे नांव कशाला तुमच्याच नांवें सनद देतों’ पण ती गोष्ट व्यंकटरावास पसंत पडली नाहीं. त्यानें सांगितलें कीं, सनद पूर्वीप्रमाणें राणोजी यासच द्यावी. ते देतील तर तीच सनद त्यांजपासून आम्हीं मागून घेऊं. मग शाहूनें (१७३४) राणोजीच्या नांवें सनद तयार केली. तें वर्तमान राणोजी यांस कळतांच व्यंकटरावाच्या कृतज्त्रतेचें हें उदाहारण पाहून त्यास हर्ष झाला व त्यानें तीच देशमुखीची सनद त्यास बक्षीस दिली. एवढेंच नव्हे तर पुढच्या वर्षी मौजें रांगोळी हा आपला इनाम गांव त्यास इनाम करून दिला. राणोजीचा पुत्र संताजी होय. यापुढें या घराण्यांत विशेष प्रख्यात पुरूष झालें नाहींत. पेशव्यांशीं व पुढे कोल्हापूरकरांशीं सूत्र ठेवून हें घराणें राहिलें. (डफ पु.१ राजारामछत्रपतीची बखर; इचलकरंजीचा इतिहास).

No comments:
Post a Comment