विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

पुण्यश्लोक 'राजा राम' भाग 4

पुण्यश्लोक 'राजा राम'

 भाग  4

वाघाच्या जाळीत ठेवावा त्याप्रमाणे औरंगजेबाच्या जाळीत असलेला आपला पुतण्या सुटून येण्याची आणि त्याच्या स्वाधीन राज्य करण्याची वाट पाहणारे राजाराम छत्रपती कुठे; आणि तीन सक्खे भाऊ ठार मारून आणि बापाला विष देऊन त्याची वासलात लावून राज्य बुडाखाली घालून त्यावर बसणारा निर्लज्ज औरंगजेब कोणीकडे!
खरोखरच जगाच्या इतिहासात राजाराम महाराजांच्या चरित्रास आणि निस्वार्थ त्यागास तोड असलेली उदाहरणे शोधून सापडणार नाहीत.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
रामायण-महाभारत सांगणाऱ्या हिंदू संस्कृतीला संजीवनी देऊन पुनर्जन्म देण्यात शिवाजी महाराजांची आपली उभी ह्यात खर्च झाली.
ह्याच शिवाजी महाराजांनी पुनर्जीवित केलेल्या हिंदू संस्कृतीला आलेले 'अमृत फळ' म्हणजे राजाराम महाराज होय.
संभाजीराजे आणि राजाराम दोघेही भाऊ शरीराने वेगवेगळे असले तरीही दोघांचेही अंतःकरण हे 'एकजीव एकठाईच' होते.
राजाराम महाराजांनी स्वराज्याच्या ठाई असलेल्या महा-पराक्रमी सरदारांना बळ आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्याकरवी स्वराज्याचा राज्यकारभार यथार्थ चालविला.
एकाहून एक पराक्रमी सरदारांची मने राजाराम महाराजांनी जिंकली हा त्यांचा मोठाच पराक्रम होता.
राजाराम महाराजांनी आपल्या मार्दवाने आणि माधुर्याने संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, रामचंद अमात्य अशी हजारो माणसे जवळ केली आणि त्यांच्या पराक्रमणाला 'नवे क्षितिज' उपलब्ध करून दिले.
ह्या शूर मराठा वीरांनी औरंगजेबाला सळो कि पळो करून सोडले आणि "ये मरहट्टे आदमी नहीं; शैतान है शैतान..." असे शब्द त्याच्या तोंडून वदविले.
संभाजी महाराजांच्या पराक्रमाने कुंठित होऊन संभाजी राजास पकडल्याशिवाय किंवा ठार मारल्याशिवाय पगडी डोक्यावर घालणार नाही अशी संतापाने औरंगजेबाने प्रतिज्ञा केली होती आणि आपली पगडी जमिनीवर आपटली होती.
राजाराम महाराजांनी महा-पराक्रम गाजवून महाराष्ट्रावर आलेले औरंगजेबाचे परचक्र निवारण करण्याच्या बाबतीत दाखविलेले कर्तृत्व हे संभाजी महाराजांच्याच तोडीचे होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...