विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 43

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 43
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे-----------------2



जालना शहर मराठयानी लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निंबाळकर कामी आले त्यामुळे शिवाजी महाराजांनी संताजीवर नाराज होऊन मुजोरीयास ( मुजऱ्यास ) येणेस फर्मावले तरीही कालांतराने संताजीच्या पराक्रमाने स्वराज्याच्या निर्मितीमध्ये हातभार लावला आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी संताजी , बहीरजी आणी मालोजी या तिन्ही बंधुंना स्वतंत्र पथके देऊन सेनापती हंबीरराव मोहीतेयांच्यासोबत मोहीमेवर पाठवले . त्यांना जुमलेदारी दिली आणी सातारा जिल्ह्यात पाटीलकीची वतने दिली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठेशाहीवर परकीय हल्ले सुरु झाले . छत्रपती संभाजीराजे आणी कवी कलश हे दोघे संगमेश्वरी असताना मुकर्रबखान या मोगल सरदाराने त्यांना घेरले संताजींचे बंधु बहीरजी यांनी शंभूराजेना सुरक्षित स्थळी हलवायचा केलेला प्रयत्न फसला . स्वराज्याच्या वारसदाराचे संरक्षण करताना म्हाळोजीराजेंनी संगमेश्वर येथे स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले .. मुकर्रबखानाने शंभूराजे आणी कवी कलशांना कैद करुन तुळापूर येथे औरंगजेबाच्या समोर हजर केले . आणी पाठोपाठ रायगडावर कब्जा केला .. आणी इकडे तुळापुर मुक्कामी छत्रपती संभाजीराजेंना अक्षरशः हालहाल करुन ठार केले .
शंभूराजेंच्या मृत्युनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले पण स्वराज्यावर घोंगावणारी मोगली संकटे पहाता छत्रपती राजाराम महाराजांना , ताराराणी आणी राजसबाईंना सुरक्षित चंदीचंदावरास हलवण्यात आले आणी बेदनुरच्या राणीच्या सहाय्याने संताजींनी आपल्या नेतृत्वाखाली ही महत्वपूर्ण मोहीम यशस्वी केली . तिथे गेल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी 1691 मध्ये संताजी घोरपडेंना सरसेनापती पद बहाल केले . आणी आपली कापशी ही सरसेनापतींची सेनापती कापशी झाली सोबत मानाचा जरीपटका , नौबत आणी हिंदूराव ममलकत मदार ही पदवी दिली. आजही संताजी हे चिफ ऑफ कापशी ममलकत मदार आजही कापशीच्या मुळ राजचिन्हावर चिफ ऑफ कापशी असे कोरलेले आहे त्यांचे दुसरे बंधु बहीरजी हे गजेंद्रगडकर घोरपडे हिंदूराव आणी तिसरे बंधु मालोजी हे दत्तवाडकर घोरपडे अमिर-उल-उमराव म्हणून ओळखले जातात .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...