पुण्यश्लोक 'राजा राम'
भाग 5
राजाराम महाराज आपल्या पाठीशी आहेत ह्या नुसत्या भावनेनेच मराठ्यांच्या अंगात हजार हत्तींचे बळ आलेले होते.
जर राजाराम महाराज नसते तर मराठ्यांनी एव्हढ्या प्रतिकूल परिस्थितीत विजयश्री खेचून आणली असती काय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
पराक्रम तलवार करत नाही कि हात करत नाहीत.
पराक्रम 'खंबीर मन' करीत असते.
मराठ्यांचे हे मन राजाराम महाराजांनी सतेज आणि असेच खंबीर ठेवले हे त्यांचे महा-कर्तृत्व होय.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सूर्यास ग्रहण लागले होते. स्वराज्यावरील हे ग्रहण दूर करण्यासाठी राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी 'रात्रन्दिनी' युद्ध केले.
राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटी हे ग्रहण जवळ जवळ सुटले होते आणि स्वराज्याचा मोक्षकाळ आता दृष्टीपथात आला होता.
राजाराम महाराज पालथे जन्मले होते तेंव्हा शिवाजी महाराज म्हणाले होते कि, " हा राम दिल्लीची पातशाही पालथी घालील.."
राजाराम महाराजांनी आपल्या थोर पित्याची भविष्यवाणी अक्षरशः खरी करून दाखविली. औरंगजेबाला ह्याच मातीत मातीमोल करून दिल्लीची पातशाही खरोखरच पालथी घातली.
असे वाटते कि शिवछञपतींच्या मुखाने राजाराम महाराजांच्या जन्मकाळी जणू 'आकाशवाणीच' बोलली होती.
" स्वये श्वसनेची सुकुमार ! मुख मोहाचे माहेर ! माधुर्य जाहले अंकुर ! दर्शन जैसे !! असे राजाराम महाराजांचे माधुर्य आणि मार्दव असले तरी मराठ्यांच्या राज्याच्या अभिमानाच्या बाबतीत त्यांचे मन खरोखरच " कठीण वज्रासी भेदू" असे होते.
संभाजी महाराजांची आणि राजाराम महाराजांची 'स्वातंत्र्य लक्ष्मी' हि उपास्य देवता एकच होती आणि तिच्या ठाई अनन्य निष्ठा भक्तीही एकच होती.
राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांची उत्तरक्रिया जिवाजीराव भोसले बावीकर यांनी केली.

No comments:
Post a Comment