विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

पुण्यश्लोक 'राजा राम' भाग 6

पुण्यश्लोक 'राजा राम'
 भाग 6


शिवाजी महाराजांकडे नित्य पूजेतील एक बाण होता. (बाण-शिवलिंग ) त्याचे नाव चंद्रशेखर बाण. हा बाण मोठा तेजस्वी असून त्यातून ' नित्यश उदकस्राव' होत असे.
म्हणजे तो बाण हातात धरला असता चंद्रकांत मन्याप्रमाणे त्याला पाझर फुटे आणि हात ओला होई. ह्या बाणाला शिवाजी महाराज सदैव जवळ बाळगत असत.
शिवाजी महाराजांच्यानंतर राजाराम महाराज तो बाण आपल्याजवळ बाळगू लागले.
राजाराम महाराजांचे सिंहगडावर जिथे दहन झाले तिथे या बाणाची स्थापना राजाराम महाराज पत्नी ताराबाई साहेब यांनी केली.
राजाराम महाराजांच्या समाधीवर छत्री बांधून पूजा, अर्चा, नैवेद्य, नंदादीप व्यवस्था रामचंद्र अमात्यांकरवी करून दिली.
शत्रू प्रदेशांतील विशेष घोड दौडी मुळे राजाराम महाराजांच्या मृत्यूसमयी सिंहगडावर त्यांची कुठलीही पत्नी त्यांच्याजवळ नव्हती.
जानकी बाई रायगडावरऔरंगजेबाच्या कैदेत सापडल्या होत्या. त्यांचे पुढे कैदेत काय झाले हे कळत नाही.
तर ताराबाई, राजसबाई ह्या पन्हाळ्याला आणी अंबीकाबाई ह्या विशाळगडावर होत्या.
अंबीकाबाई साहेबांस जेंव्हा राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेंव्हा चार सहा घटका दिवस राहिला होता. त्यांनी राजाराम महाराजांच्या सोबत सहगमनाचा संकल्प केला. ( म्हणजे सती जाण्याचा संकल्प. )
त्यासाठी त्यांनी मलकापुराहून साहित्य आणावयास हवालदारास सांगितले तेंव्हा तो बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, " दिवस थोडा राहिला. मलकापुराहून साहित्य येणे त्यास रात्र होईल. गलबलीचे दिवस किल्याचे काम. यवीशी आज्ञा?"
तेंव्हा अंबीकाबाई साहेब बोलल्या, " स्वार पाठवून जलदीने साहित्य आणवावे. मी गेल्यावाचून सूर्य अस्तास जाणार नाही."
असे म्हणून सदरेची सावली पडली होती त्या सावलीजवळ किंचित मातीचा ढीग करून त्यावर पळसाचे पान रोवले आणि म्हंटले कि, " यास ओलांडून सावली जाणार नाही."
आणि असे सांगतात कि खरोखरच आंबिकाबाईंचे सहगमन होईपर्यंत सावली त्या पळसाच्या पानाला ओलांडून गेली नाही.
( हे मलकापूर विशाळगडापासून साधारण 33 किलोमीटरवर कोल्हापूरच्या दिशेस आहे. )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...