विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 May 2019

झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास भाग ३

झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास
भाग ३
पुढें (१८२५) रामचंद्ररावानें पेंढार्‍यांच्या बंडांत व काल्पी येथें नानापंडिताच्या दंग्यांत, इंग्रजांच्या विनंतीवरून त्यांनां साहाय्य केलें; त्यामुळें (डिसेंबर १८३२) लार्ड बेटिंकनें झांशीस दरबार भरवून कृतज्ञतेनें रामचंद्ररावानां महाराजधिराज व फिदवी बादशहा जानुजा इंग्लिस्तान ही पदवी व छत्रचामरें आणि नगारा इत्यादि चिन्हें अर्पण केलीं. रामचंद्ररावानीं २५ वर्षें कारभार केला. तो निपुत्रिक वारल्यामुळें (१८३५) इंग्रजांनीं रामचंद्ररावाचा चुलता रघुनाथराव यास गादीवर बसविलें. हा फार दुर्व्यसनी निघाला. त्यामुळें संस्थानास कर्ज झालें व उत्पन्न- वर येऊन सर्वत्र अंदाधुंदी माजली. त्यामुळें इंग्रजांनीं सन १८३० मध्यें संस्थानचा कारभार आपल्या हातीं घेतला. रघुनाथरराव सन १८३८ त वारल्यावर त्याचा भाऊ गंगाधरराव गादीवर बसला. मात्र (१८४२पर्यंत) संस्थानास झालेलें कर्ज फिटेतोंपर्यंत संस्थानचा कारभार इंग्रजांकडेच होता. पुढें २७ डिसेंबर स. १८४२ रोजी (इंग्रजांनीं) गंगाधररावाशीं तैनाती फौजेच्या खर्चाकरितां २२७४५८ रुपयांचा मुलुख स्वतःकडे घेऊन तह केला व झांशी संस्थानची मुखत्यारी त्यास दिली. हेच गंगाधरराव झांशीच्या राणीचे पति होत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...