जगदेव परमार हा वडिलांनी नियुक्त केलेला माळवा राज्याचा खरा वारस; पण उत्तरेतील पवारांचे गेलेले राज्य त्याच्या वडिलांनी साळुंखे राजांना केलेल्या विनंतीवरून कल्याण नरेश राजा सोमेश्वर साळुंखे चाळुक्य याने आपला पराक्रमी मुलगा विक्रमादित्य सहावा यास माळव्यावर पाठवून ते राज्य पुन्हा पवारांना मिळवून दिले. यामुळे पवार आणि साळुंखे यांच्यातील तैल साळुंखे यांनी राजा वाक्पती अर्थात मुंजा परमार याचा क्रुर शिरच्छेद केल्यापासूनचे जे ताणलेले संबंध होते, ते आपोआपच कमी झाले. जगदेव परमार याला वडिलांनी माळवा राज्याचा वारस नियुक्त केलेला असला, तरी त्याने त्याच्याहून मोठ्या असलेल्या वडील (सावत्र) भावांसाठी माळवा राज्याचा त्याग करून तो दक्षिणेत आला. दक्षिणेत तेव्हा विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य सहावा याचे राज्य होते. त्याने जगदेव पवार याचे स्वागत केले आणि मोठा मुलगा मानून त्याची विदर्भ राज्यावर नेमणूक केली. विक्रमादित्यसाठी जगदेव परमार याने अनेक विजयी लढाया केल्याचे उल्लेख मिळतात. पुढे विक्रमादित्य नंतर त्याचा मुलगा भूलोकमल्ल सत्तेवर आला, तेव्हा जगदेव पवार याने त्याच्या (भूलोकमल्लच्या) राज्यावर आक्रमण केले. भूलोकमल्लाने त्यास चोख प्रत्युत्तर दिले आणि त्याच्या सैन्याला पिटाळून सह्यगिरी डोंगरातील किल्ल्यात कोंडून टाकले. जगदेव आणि सैन्याच्या सुटकेसाठी माळव्याच्या राजाने भूलोकमल्लावर आक्रमण केले, मात्र भूलोकमल्लाने या राजाची आणि त्याच्या सैन्याची अवस्था आगीकडे पंतग धाऊन गेल्यावर जी होते तशी करून टाकली.जगदेव परमार याची साळुंखे चाळुक्य नरेश विक्रमादित्य सहावा याने विदर्भ भागावर नेमणूक केलेली असल्याने त्या भागात विक्रमादित्य राजाने जगदेव पवार यांच्या नेमणूक काळात जेवढी मंदिरे बांधली, ती सर्व चाळुक्यीय शैलीतच निर्मिलेली आहेत. ही मंदिरे जगदेव पवार यांनी स्वतंत्र निर्मिली असती, तर ती परमारांची जी मंदिर निर्माण शैली असेल त्या शैलीत निर्मिली असती साळुंखे शैलीतील कशाला निर्मिली असती
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 18 June 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment