विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाचा मूळ पुरुष कोण

शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाचा मूळ पुरुष कोण यासम्बधि मला मिलालेली माहिती शिवप्रेमी मावल्याना देत आहे 
बाजीराजे घोरपडे व शिवाजीराजे भोसले हे मूळ एकाच कुळातले भाउबंद व अस्सल राजपूत. भोसले व घोरपडे यांचे मूळ चितोडचे राजघराने. चितोडच्या रावलसिहाच्या तिन मुलापैकी एक वंश म्हणजे शिशोदेकर. अजयसिह राज्य करित असता एका बंडवाल्यावर त्याने सज्जनसिंह व क्षेमसिह या दोन मुलास पाठवले पण त्याच्या हातून बंदोबस्त झाला नाही. तो बंदोबस्त लक्ष्मणसिहाचा नातू हमीर याने केला. म्हणून अजयसिंहने त्यालाच गादिवर बसवन्याचे ठरवले, तेव्हा नाखुश होऊन सज्जनसिंह व क्षेमसिंह हे स्वदेश सोडून दक्षिणेत आले. सज्जनसिंह हाच भोसले व घरान्याचा मूळ पुरुष होय. अल्लाउदीन हसन नावाचा मनसबदार दिल्लीहुन पाठविन्यात आला. त्याने स्वतःच बंड करून स्वतंत्र बहामनी राज्याची स्थापना केलि. हसनला सज्जनसिंहने चांगले सहाय्य केले. म्हणून हसनने सज्जनसिंग व त्याचा मुलगा दिलीपसिंग यांना देवगिरीच्या आसपासचे मेरठ प्रांतातिल 10 गाव जहागीर म्हणून दिले व ख़ासखेलचे सरदार बनविले. सज्जनसिंग सन् 1355 मधे वयाच्या 65 व्या वर्षी मरण पावला. त्याचा मुलगा दिलीपसिंग् त्यावेळी 29 वर्षाचा होता.1360 व 62 च्या तेलांगनाच्या स्वाऱ्यात व 1366 सालच्या विजयनगरच्या स्वारीत विशेष पराक्रम केल्यामुळे दिलीपसिंगाचा गौरव वाढत गेला. त्याचा मुलगा व नातू सिद्धजी व भैरवजी यांनीही 1397 सालापर्यंत अनेक स्वाऱ्या शिकाऱ्या व मर्दुमकीच्या लढाया केल्या. मुधोळची जहांगीर भैरवास 1398 मधे मिळाली. भैरवजिस भोसाजी म्हणत त्यावरून भोसले नाव रूढ़ झाले असावे. 1460 पर्यन्त या भोसले कुळातले कर्णसिंह व शुभकृष्ण हे दोघे भाउ एकत्र होते. पण पुढे ते वेगळे होऊन कर्णसिंह आपला भीमसिंह नामक मुलास घेऊन निज़ामशाहकड़े गेला व शुभकृष्ण देवगिरिकडेच राहिला. हा शुभकृष्ण म्हणजेच शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाचा मूळ पुरुष होय. 1469च्या सुमारास कर्णसिंग व भीमसिंग यानि कोकणातील एक असाध्य पहाड़ी किल्ला घोरपड लावण्याची युक्ति लढवून जिंकला व त्यांच्या वंशजांचे आड़नावच घोरपडे पडले. शुभकृष्णचे वंशज भोसलेच राहिले
लेखन- मनोज कांबळे

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...