* धार पवारांचा इतिहास *
छ शाहु महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्या बाजीरावाबरोबर माळवा, गुजरात स्वार्यांमध्ये पवार घराण्यातील उदाजी पवारांचे नाव पराक्रमामुळे ईतके गाजू लागले की , "जिधर उदा उधर खुदा " अशी म्हण प्रचलीत झाली . उदाजीरावांचे सख्खे भाउ आनंदराव पवार याना उदाजी व बाजीराव यांचे विटूष्ट आल्या नंतर धारचा सरंजाम व ठाणे देण्यात आले.याचवेळी उदाजीरावांचे चुलत भाउ तूकोजी पवार व जिवाजी पवार हे ( अनुक्रमे देवास थोरली पाती व देवास धाकटी पाती ) देवासच्या ठाण्यावर राहून अंमल बसवू लागले .
यानंतर केवळ ४ वर्षातच आनंदरावांचा सर्पदंशाने अचानक मृत्यू झाल्याने त्यांचे पुत्र यशवंतराव पवार यांच्याकडे धारची सूत्रे आली.
मराठ्यान्चा अंमल या भागात बसवण्यासाठी पहिले बाजीराव सातत्याने मोहिमांनवर असत .या भागावरील बादशहाचे मोगल अंमलदार सहजासहजी ताबा सोडण्यास तयार नसत तसेच दक्षिणेतील मराठ्यान्चा प्रमुख शत्रु निजाम मराठ्यान्चा बिमोड करण्यास सदैव टपलेला असे. बाजीरावांच्या निजामावरील स्वार्यान्पैकी भोपाळ स्वारीत यशवंतराव पवार सामिल होते.निजामाचा प्रचंड पराभव झाल्यानंतर नर्मदा व चंबळ या दोन नड्यांमधील प्रदेशात मराठ्यान्चा अंमल बसवण्याचे काम यशवंतरावांनी केले . कोकणातील सिद्धी व पोर्तुगीजांविरुद्ध चिमाजीरावांच्या नेत्रुत्वाखालील स्वारीत यशवंतराव पवार फौजेसह राबत होते. तारापुर व वसई किल्ल्यान्च्या बुरुजांना सूरंग लावण्याचे कठीण काम पवारांच्या सैन्याने केले.

.... जय कालीकामाता .... जय महाराष्ट्र....!!!!
_सनी पवार
(चिपळुण )
महाराष्ट्र.
(चिपळुण )
महाराष्ट्र.
No comments:
Post a Comment