!! श्री राजे लखुजीराव जाधवराव यांचा अर्धाकृती दगडी पुतळा !!
|| 'शबिह-ए जादून राय दखनी ' ||
छत्रपती शिवराय महाराज यांचे आजोबा व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधव यांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्क येथील "मेट्रोपोलिटीयन म्युझियम ऑफ आर्ट" या संग्रहालयात आहे. राजे लखुजीराव यांचे हे दुर्मिळ चित्र शिवरायांच्या जन्माआधी आठ वर्षापुर्वीचे म्हणजे इ सन १६२२ सालचे असुन चित्रकार हाशिम यानी ते काढले आहे. ते तत्कालीन शहजादा व नंतरचा बादशहा शहाजहाँन याच्या वैयक्तिक अल्बममध्ये समाविष्ट केलेले आहे.
सिंदखेड प्रांताचे राजे, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचे वडील आणि छत्रपती शिवराय महाराजांचे आजोबा , राजे लखुजीराव जाधवराव यांचे चारशे वर्षांपूर्वीचे चित्र हे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी काढलेले आहे . हे चित्र मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या पाऊलखुणा अधोरेखित करणार आहे.
न्यूयॉर्क येथील 'मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट' या राष्ट्रीय संग्रहालयात असलेले हे चित्र , इतिहास अभ्यासक Manoj Dani सर यांनी प्रथम प्रमाणीत केले .
या संग्रहालयामध्ये 'बादशाही अल्बम' नावाचा एक चित्र संग्रह असून, त्यामध्ये राजे लखुजी जाधवांरावांचे चित्र जतन करण्यात आले आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात आणखी काही चित्रे जोडली गेली. औरंगजेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला. या संग्रहावर असलेल्या शिक्क्यांवरून आणि सुरुवातीच्या 'शमसा' आणि 'उनवान' या नक्षीदार पानांवरून दाणी यांनी संग्रहाबद्दल माहिती संकलित केली आहे.
ही चित्रे अनेक वर्षे दिल्लीत बादशाही संग्रहात होती. १७३९ मध्ये नादिरशहाच्या लुटीतून ती वाचली. १८०२ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली घेतल्यावर जेम्स फ्रेझर आणि त्यांच्या बंधूनी स्थानिक मोगल चित्रकारांकडून जुन्या चित्रांच्या नवीन प्रती बनवून घेतल्या. त्यानंतर हा चित्रांचा संग्रह दिल्लीतील आर्ट डीलर यांच्याकडे होता. कालांतराने पाश्चात्य संग्राहकानी तो विकत घेऊन परदेशी नेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आठ वर्षे आधी म्हणजेच १६२२ मध्ये हे चित्र हाशिम नावाच्या एका मोगल चित्रकाराने काढले आहे.
चित्रावर शाहजहान बादशहाच्या हस्ताक्षरात फारसीमध्ये 'शबिह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम' म्हणजे 'जाधवराव दखनी यांची प्रतिमा, हाशिमने काढलेली' असे लिहिलेले आहे. हाच मजकूर जाधवरावांच्या चित्रातील पांढऱ्या कपड्यांवर पायाजवळ बारीक अक्षरात लिहिलेला आहे.
जादूराय अथवा जादूनराय (मराठीत जाधवराव) हा राजे लखुजीराव जाधवराव यांना मिळालेला किताब होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो किताब राजे लखुजी जाधवराव यांचे नातू राजे पतंगराव उर्फ ठाकुरजी(राजे दत्ताजीराव यांचे कनिष्ठ पुत्र) याना देण्यात आला असा उल्लेख 'माथीर-ए-अलामगिरी' ,जहाँगिरनामा व शहाजहाँन नामा या फारसी ग्रंथात आहे. किताब देण्याची ही पद्धत मोगल आणि दखनी सुलतान,तसेच पुढील मराठा स्वराज्यात देण्याची प्रथा प्रचलित होती. शिवाय मोगल फारसी,निजामशाही हस्तलिखितांमधे जादूनराय/जदुराय दखनी यांचे इ. स. १६०० ते १६२९ या काळातील उल्लेख आहेत. या विशेषनामाचा उल्लेख तुझुक-ए-जहांगिरी या जहांगीर बादशाहच्या आत्मचरित्रातही येतो. जादूनराय(जदुराय/जाधवराव) असा उल्लेख शहाजहानच्या बादशाहनाम्यातही आहे. तिथे 'शाहूजी भोंसला दामाद जादू राय' असा स्पष्ट फारसी उल्लेख मिळतो. या सर्व संदर्भांवरून हे चित्र राजेलखुजीराव जाधवराव यांचेच असल्याचा दावा, मनोज दाणी यांनी केला आहे आणी ते सिद्ध देखील होते. या चित्राच्या पायथ्याशी स्पष्टपणे "शबीह-ए-जदुराय दख्खनी -ए -हाशिम" म्हणजे जदुराय दख्खनी (राजे लखुजीराव जाधवराव) यांचे चित्र चित्रकार हाशिम यानी काढले आहे. तसेच चित्रावरील कपड्यावर देखील "जदुराय दख्खनी"(जाधवराव दख्खनी) असा स्पष्ट उल्लेख आढळतो आणी जाधवराव दख्खनी हा किताब इ सन १६२२ साली फक्त राजे लखुजीराव जाधवराव यानाच होता, बाकी कोणाला हा किताब नव्हता.
कोण होता हाशिम?
या चित्राबरोबरच व्यक्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असणारा चित्रकार हाशिम याचीही माहिती इतिहास अभ्यासकांना मिळू शकेल.
या चित्राचा चित्रकार हाशिम याची बरीच माहिती संशोधकांनी निश्चित केली आहे. त्यावरून असे सांगता येते की हाशिम हा मूळचा दख्खनचा रहिवासी होता. त्याच्या चित्रकार-कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर अथवा विजापूर इथे झाली असावी. त्यानंतर तो त्या काळातली मोगलांची दख्खनच्या सुभ्याची राजधानी बऱ्हाणपूर इथे होता. तिथून तो उत्तर हिंदुस्तानातील मोगल दरबारात आणि वेळप्रसंगी परत दक्षिणेत येत जात होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या आणि ठळक आणि ताकदवान रेषांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांमुळे तो त्या काळातला एक श्रेष्ठ चित्रकार मानला गेला आहे. हाशिमने निजामशाही, आदिलशाही आणि मोगल दरबारातील अनेक बड्या सरदारांची चित्रे रेखाटली आहेत.
या चित्राबरोबरच व्यक्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असणारा चित्रकार हाशिम याचीही माहिती इतिहास अभ्यासकांना मिळू शकेल.
या चित्राचा चित्रकार हाशिम याची बरीच माहिती संशोधकांनी निश्चित केली आहे. त्यावरून असे सांगता येते की हाशिम हा मूळचा दख्खनचा रहिवासी होता. त्याच्या चित्रकार-कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर अथवा विजापूर इथे झाली असावी. त्यानंतर तो त्या काळातली मोगलांची दख्खनच्या सुभ्याची राजधानी बऱ्हाणपूर इथे होता. तिथून तो उत्तर हिंदुस्तानातील मोगल दरबारात आणि वेळप्रसंगी परत दक्षिणेत येत जात होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या आणि ठळक आणि ताकदवान रेषांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांमुळे तो त्या काळातला एक श्रेष्ठ चित्रकार मानला गेला आहे. हाशिमने निजामशाही, आदिलशाही आणि मोगल दरबारातील अनेक बड्या सरदारांची चित्रे रेखाटली आहेत.
चित्रातील वैशिष्ट्ये
चित्रातील कलाकुसर मोगल पद्धतीची..
व्यक्तीचित्रातील पेहराव, आभूषणे, तलवारीचा बारकाईने केलेला अभ्यास.तलवार ही मराठा धोप पद्धतीची आहे.
चित्रातील कलाकुसर मोगल पद्धतीची..
व्यक्तीचित्रातील पेहराव, आभूषणे, तलवारीचा बारकाईने केलेला अभ्यास.तलवार ही मराठा धोप पद्धतीची आहे.
सदरील चित्र तत्कालीन "बादशाही अल्बम" मध्ये समाविष्ट केलेले असुन त्या अल्बममध्ये देशातील तत्कालीन सुलतान व मातब्बर वजीरांची चित्रे समाविष्ट केलेली आहेत . म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तत्कालीन राजकीय वजन अधोरेखित करते.
हमिद लाहौरी याच्या पादशहानामा या ग्रंथात देखील राजे लखुजीराव जाधवराव यांची मनसब "२४००० जात व १४००० स्वार" असल्याचे उल्लेख सापडतात.
या पेंटिंग वरुनच सदरील दगडी अर्धाकृती पुतळा बनवुन घेतलेला असुन या दगडी पुतळ्यात जीव ओतण्याचे महत्तम कार्य "श्री दत्तात्रय धोत्रे" ,पंढरपुर यांनी केले.... राजे लखुजीराव जाधवराव यांचा हा दगडी पुतळा इतिहासातील दुसरा दगडी पुतळा असुन पहिला दगडी सिंहासनारुढ पुतळा राजे लखुजीराव जाधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधु राजे भुतजी, राजे लखुजीरावपुत्र राजे बहादुरजी, नातु राजे ठाकुरजी, राजे विठोजीराव यांच्या प्रयत्नातुन समाधी स्थळावर बसवण्यात आला होता, परंतु दुर्दैवाने हा सिंहासनारुढ पुतळा आज त्या समाधीवर नाही. कोण्या समाजकंटकांनी त्याची तोडफोड केलेली आहे, असो.
सदरील अर्धाकृती पुतळा बनवण्यासाठी कर्नाटक येथील "चिक शालीग्राम "(पोलादी पाषाण) गावातील "चिक शालीग्राम" हा दगड वापरलेला असुन हा दगड सर्वात कठीण व टिकावू समजला जातो. हा सव्वा फुट उंचीचा अर्धाकृती पुतळा आहे . सदरील अर्धाकृती पुतळा अमेरिकेतील सापडलेल्या राजे लखुजीराव जाधवराव यांच्या पेंटिगचा आधार घेऊन बनवलेला आहे , कारण सदरील पेंटिंग ही राजे लखुजीराव जाधवराव हयात असताना काढलेली पेंटिंग आहे.सदरची पेंटींग एक बाजूची असून त्या एका बाजूवरून दुसरी बाजू बनवून पुर्णाकृती चेहरा बनविण्यासाठी मुर्तीकार दत्तात्रय भिमराव धोत्रे दाळे गल्ली पंढरपूर यांनी अपार मेहनत घेतलेली आहे व मुर्तीतील बारकावे,छटा चेह-यावर आहे अशा रेखाटण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
Adv Vinayak Sarvale यांनी मुर्तीबाबतच्या वर्णनाबाबत व प्रथममुर्ती बनविण्याचे कार्यात मोलाची मदत केली आहे.
Adv Vinayak Sarvale यांनी मुर्तीबाबतच्या वर्णनाबाबत व प्रथममुर्ती बनविण्याचे कार्यात मोलाची मदत केली आहे.
या पद्धतीचा राजे लखुजीराव जाधवराव यांचा दगडी पुतळा जर कोणाला बनवुन घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क साधावा !!!
दतात्रय भिमराव धोत्रे : 9881309460
अनिल धोत्रे :9921869887
दतात्रय भिमराव धोत्रे : 9881309460
अनिल धोत्रे :9921869887
Rajenaresh Jadhavrao
No comments:
Post a Comment