यदुकुलोत्पन्न चंद्रवंशी श्रीमंत जाधवराव,
मथुरा-द्वारका-देवगिरी-सिंदखेडराजा-भुईंज
भाग-१
भुईंज मध्ये समाधिस्थ असलेले आचार्यश्रेष्ठ भृगुऋषी महाराजांचे सुपुत्र राक्षसगुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि महाराजा ययाती यांचा पुत्र #यदु. याच यदुराजाचा वंश तो यादव वंश.... पौराणिक आधारावरुन यदु वंशाचा मुळपुरुष चंद्र. ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि त्यांचा पुत्र समुद्र त्याचा चंद्र त्याचा बुध. या बुध आणि इला यांच्या वंशास चंद्र उर्फ सोमवंश म्हणतात. यांच्यापासून ४४ व्या पिढीत ययाती चा जन्म झाला होता.
यादवांच्या अनेक शाखा निर्माण झाल्या ज्यांनी संपूर्ण भारतवर्षावर राज्य केले. यादवांची ५६ कुळे प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांना ५६ कोटी यादव असेही म्हणतात. यांपैकी एका शाखेत ५५व्या पिढीत कौरव पांडव तर दुसऱ्या शाखेत ५८व्या पिढीत कंस, तर द्रौपदी ४९ व्या पिढीत जन्मली. ५७ व्या पिढीत श्रीकृष्णाने अवतार घेतला हा श्रीकृष्णाचा वंश यादवांचा प्रमुख वंश आहे. मराठ्यांच्या ९६ कुळांमध्ये यादव हे जाधवराव/जाधव या नावाने तर राजपूतांच्या ३६ कुळांमध्ये जादौन आणि यदुवंश अशा दोन शाखांमध्ये आहेत.
यादव मुळचे मथुरेचे अधिपती होते. श्रीकृष्णाच्या काळात कंस वधानंतर मथुरेवर जरासंध आणि कालभवन यांनी केलेल्या दुहेरी आक्रमनामुळे कृष्णाने राजधानी द्वारकेस हलवली. गांधारीच्या शापाप्रमाणे यादवांमधे आपापसात संघर्ष होवून बऱ्याच शाखा नाश पावल्या. कृष्ण आणि रुक्मिणीचा मुलगा प्रद्दुम्न त्याची दोन मुले अनिरुद्ध आणि वज्र पैकी वज्रापासून भाती वंश सुरु झाला. अनिरुद्धचा पुत्र वज्रने सत्ताविस्तार गुजरात ते खानदेश पर्यंत केला. त्याचा मुलगा प्रतिबाहु आणि त्याचा पुत्र सुबाहुने आपले राज्य चार मुलांमध्ये वाटून दिले यातील सर्वात धाकटा मुलगा दृढप्रहारने इ.स.७४५ मधे दक्षिणेत प्रवेश केला (हेमाद्री व्रतखंड).
९ व्या शतकाच्या पूर्वार्धात यादवांची राजधानी चंद्रादित्यापूरच्या चांदवड, जि.नाशिक इथे होती. दृढप्रहारचा मुलगा सेऊनचंद्र याने सेऊनपुर नावाचे नवे शहर वसवून आपली राजधानी तेथे हलवली त्याच्या राज्यास सेऊनदेश म्हणत यात आजचा खानदेश (धुळे, जळगाव, नंदुरबार), नगर, औरंगाबाद इ. प्रदेश येत.
तिथुन पुढचा वंश असा धडिप्पा१-भिल्लम१- राजगी उर्फ श्रीराम- बादुगी उर्फ वडिंग१
हा वडिंगराजा राष्ट्रकुट राजा कृष्ण चा सामंत होता. याचा पुत्र दुसऱ्या भिल्लमाने सार्वभौमत्वासाठी चालुक्यांसोबत जाण्याचे ठरवले. त्याचा पुत्र अर्जुन त्याचा वेसुगी आणि त्याचा पुत्र भिल्लम ३ याचा विवाह तैल चालुक्यराजा अहमावल्लाच्या बहिणीशी झाला. या भिल्लमाने इ.स. १०२६ प्रवरेच्या काठचे कळस गाव दान केल्याचा शिलालेख आहे. त्याचा मुलगा सेऊनचंद्र २ त्याचे पुत्र भिल्लम ४ आणि परमदेव. परमदेवाचा पुत्र मलुगी इ. राजे पुढे गादिवर आले.
मलुगीपुत्र अमरमलुगी, अमरगांगेय आणि भिल्लम ५ पैकी पाचव्या भिल्लमाने शौर्य, धडाडी आणि मुस्तद्दीपणाने यादवांना सार्वभौमत्व प्राप्त करून दिले. इ.स.११८४ ला सोलापूरच्या कलचुरी सम्राटाचा पराभव करुन कृष्णेपलिकडे राज्यविस्तार केला आणि आपली राजधानी देवगिरीला नेली. स्वत:ला सम्राट म्हणुन घोषित करत ११८७ मध्ये स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतला. इथुनच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात यादवांचा एकछत्री अंमल सुरु झाला.
© स्वप्नील महेंद्र जाधवराव.
#यदुवंश #चंद्रवंशी
#श्रीमंत_जाधवराव #शहान्नवकुळी_मराठे
#छत्तिसकुळी_राजपूत. #साहेब_ए_जादूनराय_दखनी

No comments:
Post a Comment