विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

श्रीमंत सरदार रायाजीराव जाधवराव यांची समाधी

#घुमट
#एक_दुर्लक्षित_इतिहास...
अगदी लहानपणापासून ही वास्तू गावातल्या मुख्य चौकात बघतोय. याबद्दल अनेक दंतकथा आणि भयकथा देखील ऐकल्या होत्या. अनेक लोक तिथे जायला सुद्धा घाबरतात. पण बाबांनी शिकवल होतं, तिथे नेहमी कुर्निसात घालायचा. म्हणून नेहमीच एक कुतुहल वाटायचे की ही वास्तू नेमकी काय आहे.
त्यापैकी एक कथा अशी की घुमट म्हणजे एक शिव मंदिर आहे. आणि जेव्हा अफजल खान वाई वर चालून आला तेव्हा त्याने मंदिराची नासधूस करू नये म्हणून गावातील जाधवराव स्त्रीयांकडून मंदिराला मशिदीचा आकार देण्यात आला. जाधवरावांच्या स्त्रियांचे शौर्य तर इतिहासात सर्वश्रृत आहे. ज्या अफजल खानाला बडे बडे सरदार घाबरत होते त्याच्या सैन्याला तळघरात कोंडून मारण्याची हिम्मत जाधवरावांच्या स्त्रियांनी दाखवली होती. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच ही कथा सर्वत्र पसरली.
मधुनच ही वास्तू म्हणजे एक बौद्ध विहार आहे असे कानावर पडले आणि मग ह्या वास्तूची खरी ओळख जगाला करून देणे किती गरजेचे आहे हे प्रकर्षाने जाणवले.

#खरा_इतिहास....
घुमट म्हणजे
२५ फेब्रुवारी १७२८ रोजी नाशिकमधिल पालखेड जवळील निपाणी प्रदेशात झालेल्या धुमश्चक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरन आले. परिणामतः २८ फेब्रुवारीला निजाम नाक धरून मराठ्यांना शरण आला. जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून ही प्रशस्त छत्री/समाधी गावाच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली.
घुमट अजूनही सुस्थितीत आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ती वास्तू सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते. प्रवेशद्वारावर अत्यंत दुर्मिळ असे सशस्त्र गणेश तर उजव्या बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे. आतमध्ये व्दिलिंगी शिवलिंग आणि सपत्नीक सशस्त्र वीराची मुर्ती आहे‌ यावरुन रायाजीरावांच्या पत्नी देखील सती गेल्या असाव्यात असा अंदाज बांधता येतो. आतमधून गुंबत/शिखरावर जाणारा एक मार्ग आहे.
आज आपणच आपला इतिहास विसरतोय. इतका मोठा सांस्कृतिक वारसा आज दुर्लक्षित होतोय त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. सहजच एकदा या वास्तूस आवश्य भेट द्यावी आणि शिवकालीन वास्तुसौंदर्याचा आनंद घ्यावा.







श्रीमंत सरदार रायाजीराव जाधवराव यांची समाधी होय. भारतीय इतिहासातील गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी "पालखेडची लढाई". पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैद्राबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला. या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छ.शाहूंचे विश्वासु म्हणून सहभागी झाले होते.
© स्वप्नील महेंद्र जाधवराव.
#दुर्लक्षित_इतिहास #श्रीमंत_जाधवराव
#साहेब_ए_जादून_राय_दखनी. #रायाजीराव
#श्रीमंत_भुईंज_संस्थान. #भटकंती

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...