विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

श्रीमंत रा.रा. महाराज लखुजीराजे जाधवराव

श्रीमंत रा.रा. महाराज लखुजीराजे जाधवराव

स्वराज्याचा पाया खांदणाऱ्या लखुजी उर्फ लक्ष्मणसिंह जाधवराव यांचा जन्म महाराज विठोजी राजे साहेब आणि ठाकराईराणी सरकारांच्या पोटी झाला. विठोजी राजे निजामशाहीत बडे सरदार होते.‌‌ त्यांच्याकडे सिंदखेडराजा येथील पंचहजारी देशमुखी वतन होते.
#जाधवराव...
सिंदखेडचे जाधवराव श्रीकृष्णाच्या यदुकुळातील चंद्रवंशी आहेत. अजिंक्य देवगिरीवर राज्य करणाऱ्या समृद्ध यादव राया रामदेवराय जाधव (यादव) यांचा अल्लाउद्दीन खिलजीने छळाने पाडाव केल्यावर जाधव महाराष्ट्रभर विखुरले गेले. त्यातीलच एक शाखा सिंदखेडराजा येथे स्थाईक झाली.
#महाराज_लखुजीराजे_जाधवराव...
राजेंनी आपल्या कर्तृत्वावर दहाहजारी मनसब, अठ्ठाविस महाल आणि बावन्न चावड्यांचे वतन मिळवले. त्या काळी मुस्लिम राजवटीत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असणारे ते एकमेव राजे होते. इतिहासकारांच्या मते मालोजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले हे देखील जाधवरावांकडे सरदार होते. महाराजांचे हे यश अनेकांना पहावत नव्हते. एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असुन देखिल देवगिरीचे रक्त त्यांना शांत बसु देत नव्हते. त्यांनी अनेक वेळा योग्य संधी साधून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला पण अनेकदा मराठा सरदारांनीच साथ न दिल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी हिच शिकवण आपली मुले दत्ताजीराजे, अचलोजीराजे, राघोजीराजे, बहादुरजीराजे आणि जिजाबाई यांच्याही मनात रुजवली. त्यात पत्नी म्हाळसाबाई राणीसरकारांनी त्यांना मोलाची साथ दिली.
त्यातच पुढे देवगिरीवर झालेल्या खंडागळे हत्ती प्रकरणात दत्ताजीराजेंचा संभाजीने खून केला. चिडलेल्या लखुजीराजेंनी एका घावात शहाजीबंधु संभाजीचा वध केला. परीणामत: राजेंनी निजामशाही सोडली. मलिक अंबर ह्या सेनापतीच्या सांगण्यावरून निजामशहाने माफी मागण्याचे नाटक करुन २५ जुलै १६२९ रोजी राजेंना देवगिरीवर बोलवून घेतले आणि कपटाने महाराजाधिराज श्रीमंत लखुजीराजे, महाराज अचलोजीराजे, महाराज राघोजीराजे आणि महाराजकुमार यशवंतराजे यांचा खून केला. देवगिरीचा दरबार त्यांच्याच सम्राटांच्या रक्ताने अभिषिक्त झाला.
शोकांतिका अशी की स्वराज्याची मेक रोवणाऱ्या ह्या रणधुरंधर सेनानीला आज आपला इतिहास विसरत चालला आहे.
||•|| जयोस्तु जाधवराव ||•||
© स्वप्नील महेंद्र जाधवराव
#श्रीमंत_महाराजाधिराज_रा_रा_लखुजीराजे_जाधवराव
#श्रीमंत_महाराज_रा_रा_दत्ताजीराजे_जाधवराव
#श्रीमंत_महाराज_रा_रा_अचलोजीराजे_जाधवराव
#श्रीमंत_महाराज_रा_रा_राघोजीराजे_जाधवराव
#श्रीमंत_महाराज_रा_रा_बहादूरजीराजे_जाधवराव
#श्रीमंत_महाराजकुमार_रा_रा_यशवंतराजे_जाधवराव
|| श्रीमंत राजमान्य राजश्री महाराज जाधवराव, भुईंज संस्थान ||

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...